Join us  

प्रजासत्ताक दिन परेडमध्ये २५० हून अधिक महिलांचा मोटारसायकल स्टंट, पाहा डोळे दिपवणारे दृश्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2024 2:48 PM

Republic day 2024 more than 250 female defense personnel perform stunts on motorcycle : यानिमित्ताने महिलांमधील शौर्य आणि दृढ निश्चय यांचे दर्शन घडले.

भारताने यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली येथील राजपथावरील परेड सर्वांचे लक्ष वेधून घेणारी असते. ही परेड प्रत्यक्ष पाहण्यासाठी अनेक जण देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. यावेळी विविध प्रात्यक्षिके खरंच अनुभवण्यासारखी असतात. जगभरातही टेलिव्हीजनवर याचे थेट प्रक्षेपण होत असल्याने आपण ही परेड घरात बसून अनुभवू शकतो. या परेडमध्ये सैन्यदलाकडून विविध प्रकराचे सादरीकरण केले जाते. यंदा या सादरीकरणात सैन्य दलातील महिलांचा सहभाग ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट होती (Republic day 2024 more than 250 female defense personnel perform stunts on motorcycle). 

गेल्या काही वर्षात महिलांचा सैन्यातील सहभाग वाढत असून त्यांच्या शौर्याचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसते. यंदा २६ जानेवारीच्या परेड दरम्यान २५० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये भारतीय सैन्यदलातील सीआरपीएफ, बीएसएफ आणि एसएसबीमधील महिला होत्या. यावेळी या महिलांनी चंद्रयान, सर्वत्र सुरक्षा, अभिवदन आणि योगा यांबरोबरच इतरही बऱ्याच रचनांचे सादरीकरण केले. यानिमित्ताने महिलांमधील शौर्य आणि दृढ निश्चय यांचे दर्शन घडले. 

वायुसेनेने केलेल्या प्रात्यक्षिकांमध्येही महिलांचा सहभाग अतिशय कौतुकास्पद होता. फायटर स्ट्रीममधील ६ महिला पायलटांबरोबरच १५ महिला पायलटसनी वायुसेनेच्या विविध प्लॅटफॉर्मचे संचालन केले. आवाहन नावाच्या बँडमध्ये १०० हून जास्त महिलांनी विविध प्रकारचे तालयंत्र वाजवत आपल्यातील कलेचे सादरीकरण केले. रॉयल एनफील्डवर सैन्यातील महिला अधिकाऱ्यांनी केलेले स्टंट लक्षवेधक ठरले. याशिवाय यंदा तोफखाना रेजिमेंटच्या अधिकारी महिलाही पहिल्यांदाच सहभागी झाल्या. त्यामुळे महिला वर्गाचा वाढता सहभाग यंदा लक्षवेधक ठरला.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीप्रजासत्ताक दिन २०२४