Join us

Mira Nair : न्यू यॉर्कच्या नव्या महापौरांची कर्तबगार भारतीय आई, सिनेमातली खुरीखुरी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2025 13:25 IST

Mira Nair, zohran mamdani : भारतीय जगण्याचं चित्र जगासमोर उलगणाऱ्या दिग्दर्शक आणि यशस्वी लेकाची आई.

ठळक मुद्देजोहरान ममदानी निवडून येताच मीरा नायर यांनी आपला आनंद जोया अख्तरच्या शब्दात रिशेअर केला.  "Zohran, you beauty."

गेल्या वर्षभरात जगाने एका तरुण नेत्याचा उदय पाहिला आहे. आज तोच नेता न्यू यॉर्क या अमेरिेकेतल्या शहराचा, आर्थिक राजधानीचा महापौर म्हणून निवडून आला आहे. निवडून येताच धूम गाणं वाजलं, त्यानं नेहरुंचा उल्लेख केला. आपली भारतीय मुळं तो अभिमानानं मिरवतो आहे. आणि अर्थातच चर्चेत आहे त्याची आई मीरा नायर. जोहरान ममदानी यांची आई!

ममदानी यांच्या प्रचारकाळात त्या आनंदानं स्वत:ची ओळख “producer of the candidate” अशी करुन देत होत्या. आज त्यांचा मुलगा न्यूयॉर्क शहराचा महापौर झाला आहे. मीरा नायर यांची ही नवी ओळख. पण मीरा नायर या नावामागे कर्तबगारी आणि अत्यंत सृजनशील वाटचालीचं यश आहे. ममदानी न्यूयॉर्क शहराचे पहिले मुस्लिम आणि दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत तरुण महापौर ठरले आहेत. मीरा नायर त्यांची आई, त्यांनीMonsoon Wedding पासून The Namesake पर्यंत, अनेक गाजलेले सिनेमे दिग्दर्शिक केले. त्यांच्या सिनेमाने भारतीय ओळख आणि स्थलांतरितांच्या अनुभवाचे सार नेहमीच अचूक मांडले. 

मीरा नायर यांचा प्रभाव स्पष्टपणे केवळ चित्रपटापुरता मर्यादित नाही. स्थलांतरांचे सुखदु:ख, आयडेंटिटी आणि चिकाटी यावरआधारित त्यांची गोष्ट सांगण्याची शैली कायम एक खास जगणं मांडत होती. आज त्या जगण्यानं जागतिक पटलावर एक नवीन भाष्य केलं आहे.'सलाम बॉम्बे!' (1988), 'मिसिसिपी मसाला' (1991), 'मान्सून वेडिंग' (2001), 'द नेमसेक' (2006) आणि 'ए सुटेबल बॉय' (2020) यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपटांचे दिग्दर्शन मीरा नायर यांनी केले आहे.'सलाम बॉम्बे!' या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते.जोहरान ममदानी निवडून येताच मीरा नायर यांनी आपला आनंद जोया अख्तरच्या शब्दात रिशेअर केला.  "Zohran, you beauty."

 

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Nair: Proud mother of New York's Indian-origin Mayor.

Web Summary : Mira Nair, acclaimed filmmaker, celebrates her son Zohran Mamdani's historic election as New York City's mayor. Known for films like 'Monsoon Wedding,' Nair's work often explores themes of identity and migration, now mirrored in her son's global success.
टॅग्स :America Electionमीरा नायरअमेरिकाडोनाल्ड ट्रम्प