भारतात अनेक गृहउद्योग चालतात.(India Style Fashion Week) गावोगावी महिलांसाठी स्व-उत्पन्नाचे साधन पुरवण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. महिला बचत गटासारख्या संधी महिलांना देऊन त्यांना सक्षम बनवणे गरजेचे आहे.(India Style Fashion Week) परावलंबनातून मुक्त होण्यासाठी काम करून पैसे कमवणे हा एकच मार्ग आहे. आणि गावोगावी महिलांच्या हाती असलेल्या कौशल्याला प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्या अतिशय उत्तम दर्जाचं काम करू शकतात. तशाच एका कामाची ही गोष्ट.
उषा सिलाई स्कूल ही संस्था गृहिणींना शिवणकामाचे शिक्षण देते आणि कामही देते. भारतभर त्यांच्या शाखा आहे. चिकनकारी, कांथा, हे पारंपरिक कशिदाकाम करायला शिकवले जाते. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, २०२४ या वर्षाचा समारोप या शाळेतील गृहिणींसाठी फारच आनंददायी ठरला. त्यांना एक अशी संधी मिळाली जिचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता.(India Style Fashion Week) या महिलांना इंडिया स्टाइल फॅशन वीक या कार्यक्रमात फॅशन क्षेत्रातील दिग्गजांसमोर कला सादर करायची संधी मिळाली. उषा सिलाई स्कूल मधील दहा गृहिणींना कपडे शिवायला सांगण्यात आले होते आणि ते कपडे कार्यक्रमात मॉडेल्सना घालायला देण्यात आले.