Lokmat Sakhi >Inspirational > गृहिणींना मिळाली सुवर्ण संधी, थेट इंडिया स्टाइक फॅशन वीकमध्ये झळकले त्यांनी शिवलेले कपडे!

गृहिणींना मिळाली सुवर्ण संधी, थेट इंडिया स्टाइक फॅशन वीकमध्ये झळकले त्यांनी शिवलेले कपडे!

India Style Fashion Week : हातातल्या कौशल्याला योग्य प्रशिक्षणाची साथ मिळाली तर महिला काय करू शकतात, याचंच हे उदाहरण.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 16:28 IST2025-01-03T16:24:11+5:302025-01-03T16:28:40+5:30

India Style Fashion Week : हातातल्या कौशल्याला योग्य प्रशिक्षणाची साथ मिळाली तर महिला काय करू शकतात, याचंच हे उदाहरण.

India Style Fashion Week | गृहिणींना मिळाली सुवर्ण संधी, थेट इंडिया स्टाइक फॅशन वीकमध्ये झळकले त्यांनी शिवलेले कपडे!

गृहिणींना मिळाली सुवर्ण संधी, थेट इंडिया स्टाइक फॅशन वीकमध्ये झळकले त्यांनी शिवलेले कपडे!

भारतात अनेक गृहउद्योग चालतात.(India Style Fashion Week) गावोगावी महिलांसाठी स्व-उत्पन्नाचे साधन पुरवण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. महिला बचत गटासारख्या संधी महिलांना देऊन त्यांना सक्षम बनवणे गरजेचे आहे.(India Style Fashion Week) परावलंबनातून मुक्त होण्यासाठी काम करून पैसे कमवणे हा एकच मार्ग आहे. आणि गावोगावी महिलांच्या हाती असलेल्या कौशल्याला प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्या अतिशय उत्तम दर्जाचं काम करू शकतात. तशाच एका कामाची ही गोष्ट.

उषा सिलाई स्कूल ही संस्था गृहिणींना शिवणकामाचे शिक्षण देते आणि कामही देते. भारतभर त्यांच्या शाखा आहे. चिकनकारी, कांथा, हे पारंपरिक कशिदाकाम करायला शिकवले जाते. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, २०२४ या वर्षाचा समारोप या शाळेतील गृहिणींसाठी फारच आनंददायी ठरला. त्यांना एक अशी संधी मिळाली जिचा त्यांनी कधीच विचार केला नव्हता.(India Style Fashion Week) या महिलांना इंडिया स्टाइल फॅशन वीक या कार्यक्रमात फॅशन क्षेत्रातील दिग्गजांसमोर कला सादर करायची संधी मिळाली. उषा सिलाई स्कूल मधील दहा गृहिणींना कपडे शिवायला सांगण्यात आले होते आणि ते कपडे कार्यक्रमात मॉडेल्सना घालायला देण्यात आले. 


या गृहिणी शाळेत जाऊन लहान मोठे साधे कपडे शिवतात. रोजच्या वापराचे कपडे शिवण्यापासून, विकण्यापर्यंत सर्व कामे या महिलाच करतात. हे काम करत असताना अचानक एवढी मोठी संधी मिळाल्याने या गृहिणी भारावून गेल्या. संधीचे सोने त्यांनी करून दाखवले. फॅशन वीकच्या आयोजकांनी या महिलांना ऑनलाईन मार्गदर्शन करून त्यांना मदत केली. एवढेच नाही तर आयोजकांनी दोन प्रशिक्षक दोन महिन्यांसाठी नेमले होते. या प्रशिक्षकांनी निवडल्या गेलेल्या दहा महिलांना पूर्ण मार्गदर्शन केले. एका छोट्या गृहउद्योगाच्या शोधात आलेल्या गृहिणींना भारतातील सर्वात मोठ्या फॅशन शो मध्ये कला प्रदर्शन करायची अमूल्य संधी मिळाली. गृहिणींना अशाच योग्य संधींची गरज असते. या कार्यक्रमाला अनेक मोठे कलाकार उपस्थित होते.  
 

 

Web Title: India Style Fashion Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.