Join us  

Falguni Nayar The Nykaa : पन्नाशीत बिझनेस सुरू करून श्रीमंतांच्या पंक्तीत बसल्या; नायर ताईंचा बिझनेस सुरू करणाऱ्या महिलांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 5:09 PM

Falguni Nayar The Nykaa : .  नायकाचा आयपीओ शेअर बाजारात येताच फाल्गुनी यांची संपत्ती ६.५ अब्ज डॉलरवर पोहोचली. यामुळे फाल्गुनी देशातील सर्वात श्रीमंत  महिला ठरल्या.

(Image Credit- Mint, business-standard.com)

प्रसिद्ध सौदर्यं उत्पादन ब्रॅण्ड (Nykaa) नायकाचा आयपीओ शेअर बाजारात येताच कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर (Falguni Nayar) देश आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत सामील झाल्या. शेअर बाजारात येताच नायकाच्या शेअरच्या मूल्यात ९० टक्के तेजी नोंदवली गेली. नायकामध्ये फाल्गुनी यांचा निम्मा हिस्सा आहे.  नायकाचा आयपीओ शेअर बाजारात येताच फाल्गुनी यांची संपत्ती ६.५ अब्ज डॉलरवर पोहोचली. यामुळे फाल्गुनी देशातील सर्वात श्रीमंत  महिला ठरल्या. ब्ल्यूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या आकड्यांवरून ही माहिती समोर आली. (Newest female billionaire Falguni Nayar offers some advice for other women founders) 

नायका शेअर बाजारात लिस्ट होताच कंपनीचं बाजार भांडवल १ लाख कोटींच्या पुढे गेलं. इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा अनुभव असलेल्या फाल्गुनी नायर यांनी २०१२ मध्ये नायकाची सुरुवात केली. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत नायकाचं ऍप ५.५८ कोटी लोकांनी डाऊनलोड केलं. "महिलांनी त्यांच्या जीवनातील वेगळेपण स्वत: वर येऊ देणे आवश्यक आहे. मला आशा आहे की माझ्यासारख्या आणखी स्त्रिया स्वतःसाठी स्वप्न पाहण्याचे धाडस करतील." असं फाल्गुनी नायर यांनी ट्रेडिंग डेब्यूनंतर एका मुलाखतीत सांगितले. 

पुढे त्या असं म्हणाल्या की, “भारत ही एक मोठी बाजारपेठ बनणार आहे. भारतीय अधिक गोष्टींची आकांक्षा बाळगतील, त्यांची खर्च करण्याची क्षमता वाढेल आणि ते जीवनशैली ब्रँड आणि सेवांवर अधिकाधिक खर्च करतील. आणि आता नायका चांगल्या ठिकाणी आहे. पुढे खूप संधी आहेत. १.३ अब्ज लोकसंख्येच्या देशात पुरुषही मेकअप आणि ग्रूमिंग उत्पादनांवर खर्च करू लागले आहेत. आम्ही भारतातील एक अतिशय मोठ्या सौंदर्य आणि फॅशन ई-कॉमर्स मार्केटची ओळख मिळण्यासाठी ही कंपनी तयार केली आहे.''

नायर यांनी  बँकिंग क्षेत्रात  काम करत असताना IPO प्रक्रियेद्वारे उद्योजकांना मार्गदर्शन केल्यानंतर, 2012 मध्ये Nykaa NSE 6.54% ही ई-कॉमर्स साईट चालवणारी कंपनी स्थापन केली. तेव्हा, बहुतेक भारतीय महिलांनी शेजारच्या मॉम-अँड-पॉप स्टोअर मधून (एकाच कुटुंबातील सदस्यांच्या मालकीचे आणि ऑपरेट केलेले एक लहान किरकोळ स्टोअर ) मेकअप आणि हेअर केअर उत्पादने विकत घेतली जिथे त्यांना जास्त चॉईस करायला अधिक वाव नव्हता. टेस्टिंगसुद्धा करू शकत नव्हत्या. 

त्यांनी ग्राहकांना उच्च श्रेणीतील सौंदर्य प्रसाधनांवर सहज ऑनलाइन सवलत देण्याची संधी पाहिली.  नायका स्टार्टअप ग्लॅमरस बॉलीवूड अभिनेते आणि सेलिब्रिटींच्या डेमो व्हिडिओसह आणि 70 पेक्षा जास्त मोठ्या स्टोअर्ससह ऑनलाइन विक्री वाढवत, देशातील आघाडीच्या सौंदर्य प्रसाधन विक्रेत्यामध्ये विकसित झाले आहे. 

नायका हा संस्कृतपासून बनलेल्या नायिका या शब्दापासून तयार झाला आहे. भारतीय त्वचेता पोत, त्वचेचा प्रकार आणि स्थानिक हवामानानुसार एक्सफोलिएशन क्रीम, वधूच्या मेकअपसाठी आवश्यक वस्तू आणि शेकडो शेड्सच्या लिपस्टिक, फाउंडेशन आणि नेल कलरची उत्पादन नायकाद्वारे विकली जातात.  त्या सांगतात की, ''बक्षीसाचा आकार काय आहे, ते कसं आहे यानं फरक पडत नाही. मला जे करायला आवडते ते केल्यानंतर मला बक्षीस मिळणं ही मुख्य गोष्ट आहे. शेअरच्या किमती हा बोनस आहे.''

टॅग्स :महिलाव्यवसाय