Join us  

शाबास.. सलाम तुला! ॲसिड ॲटॅकमध्ये दृष्टी गमावणाऱ्या तरुणीची जिद्द, सीबीएसई परीक्षेत मिळवले ९५% मार्क..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2023 12:18 PM

CBSE 10th result 2023 acid attack survivor and peons daughter Score 95 Percent : मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करु शकता

आपला एखादा लहान अपघात झाला किंवा आजारी पडलो की आपल्याला ती खूप मोठी गोष्ट वाटते. त्या गोष्टीचा बाऊ करुन आपण कोणत्याही गोष्टीसाठी हे कारण पुढे अगदी सहज पुढे करतो. पण ॲसिड ॲटॅक झाल्यावर त्यात डोळे गमावलेल्या तरुणीने दहावीच्या परीक्षेत थोडेथोडके नाही तर तब्बल ९५ टक्के मार्क मिळवले आहेत. चंदीगडमधील इन्स्टीट्यूट ऑफ ब्लाईंड मधील कफी या तरुणीने हे यश संपादन केले आहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी कफीवर तिच्या शेजाऱ्यांनी काही कारणाने तिच्यावर ॲसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात तिचा चेहरा, डोळे, हात यांच्यावर गंभीर परीणाम झाला. इतके सगळे झाल्यावरही तिने आणि तिच्या परीवाराने हार न मानता ते लढत राहीले (CBSE 10th result 2023 acid attack survivor and peons daughter Score 95 Percent). 

ॲसिड हल्ला झाल्यावर ज्यांनी हल्ला केला होता त्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अवघ्या २ वर्षात हे तिघे कारागृहातून सुटले. मात्र त्यांनी केलेला गुन्हा आणि हल्ला मला थांबवू शकला नाही असे कफी अतिशय आत्मविश्वासाने सांगते. आपले आई-वडील आणि शिक्षकांच्या मदतीमुळेच आपल्याला हे यश मिळाल्याचे ती सांगते. तिला मोठेपणी शासकीय सेवेत अधिकारी व्हायचे असल्याचे ती सांगते. आयएएस अधिकारी होऊन मला माझ्या परीवाराचे नाव उंच करायचे असल्याचे ती म्हणते. मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करु शकता, मग त्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही हेच यातून दिसून येते. 

इतक्या प्रतिकूल परीस्थितीत अभ्यास करणे आणि इतके चांगले गुण मिळवणे ही अजिबातच सोपी गोष्ट नाही. मात्र कफीने ते करुन दाखवले. कफीचे कुटुंब तिच्या शिक्षणासाठी चंदीगडमध्ये राहते. तर तिचे वडील हरीयाणा सचिवालयात शिपाई म्हणून काम करतात. व्हिडिओ आणि मल्टीमिडीयामुळे यांमुळे १० वीच्या परीक्षेत दृष्टी नसताना यश मिळवणे शक्य झाल्याचे कफी सांगते. एकूण काय तर विपरीत परिस्थितीत मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कफीने मिळवलेले यश हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसीबीएसई परीक्षा