Join us  

ग्रॅण्डमास्टर प्रज्ञानंदची बहीण वैशीलीही होणार ग्रॅण्डमास्टर, लेकरांसाठी आईनं उपसले कष्ट - दोन्ही मुलं बुद्धिबळात अव्वल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2023 5:34 PM

Vidit Gujrathi, Vaishali R claim titles at FIDE Grand Swiss chess event; seal spots at Candidates tournament : भारताला आर प्रज्ञानंद व त्याची बहीण वैशाली यांसारखे बुद्धिबळातील दोन अव्वल हिरे लाभले आहेत, त्यांच्या परिश्रमाची गोष्ट..

बुद्धिबळ हा अस्सल भारतीय खेळ असूनही विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्यापूर्वी आणि नंतर कोणताही भारतीय बुद्धिबळपटू या खेळात जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करून फार मोठी कामगिरी करू शकलेला नाही. मात्र, चेन्नईच्या केवळ १६ वर्षीय बुद्धिबळपटूने तब्बल ५ वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या मॅग्नस कार्लसनचा ‘ऑनलाइन एअरथिंग मास्टर्स’ स्पर्धेत काळ्या प्याद्यांसह खेळून पराभव करण्याचा चमत्कार केला आणि अवघ्या बुद्धिबळ क्षेत्राचे डोळे विस्फारले. या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व स्तरातून प्रज्ञानंदावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. आता सध्या प्रज्ञानंदची बहीण व भारताची आर वैशाली हिने FIDE ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत माजी विश्वविजेत्या बल्गेरियाच्या अँटोनेटा स्टेपनोव्हा हिचा पराभव करण्यात यश मिळविले. कारकिर्दीतील सर्वात मोठी स्पर्धा खेळणाऱ्या वैशालीने या प्रक्रियेत तिची चौथी 'ग्रँडमास्टर नॉर्म'ही पूर्ण केली. ही कामगिरी करणारी ती भारताची तिसरी महिला होण्यासाठी तिला फक्त सात रेटिंग गुणांची गरज आहे(His sister moves to challenge the world chess champion after Praggnanandhaa).

मुलांनी सतत भुणभुण करु नये म्हणून पालक मुलांना टी.व्ही बघायला सांगतात किंवा त्यांच्या हातात मोबाईल देतात. या सवयींचे लहान मुलांवर किती दुष्परिणाम होत आहेत. हे सर्वजण जाणून आहेत. असे असले तरीही या दोन्ही सवयींपासून दूर राहावे म्हणून बुद्धिबळाच्या प्रशिक्षण वर्गात या दोन्ही मुलांचे आईवडिलांनी नाव नोंदविले. त्यामुळेच भारताला आर प्रज्ञानंद व त्याची बहीण वैशाली यांसारखे बुद्धिबळातील दोन अव्वल हिरे लाभले आहेत(After R Praggnanandhaa, his sister Vaishali moves to challenge world chess champion).    

प्रज्ञानंदची बहीण वैशालीही आहे अव्वल बुद्धिबळपटू... 

प्रज्ञानंदाने त्याच्या न कळत्या वयापासूनच बुद्धिबळाची कास धरली. त्याची बहीण वैशाली हिच्याकडून त्याला बुद्धिबळाचे प्राथमिक धडे मिळाले. वैशाली बुद्धिबळाकडे कशी वळाली याचा किस्साही रंजक आणि सुजाण पालकांसाठी उद्बोधकही आहे. वैशालीला लहानपणी टिव्हीवर कार्टून फिल्म्स बघत बसण्याची आवड होती. ती तासंतास टिव्हीसमोरच बसून असायची. त्यामुळे तिचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तिची आई आणि वडलांनी तिला बुद्धिबळाच्या प्रशिक्षण वर्गात पाठवले. तिला हा खेळ भावला आणि ही आवड तिच्यामुळे तिच्या भावातही रुजली. त्यांच्या आई-बाबांचा हा निर्णय अत्यंत अचूक ठरला. वैशालीही आज ग्रँड मास्टर आहे आणि प्रज्ञानंदाचा पराक्रम तर आपल्या नजरेसमोरच आहे. 

लेक जगभरात बुद्धिबळात जिंकताना पाहून साधीभोळी आई रडू लागली.. पाहा तो अभिमानाचा क्षण

घसघशीत पगार, कार्पोरेट जॉब, ब्राइट करिअर ‘तिनं’ सोडलं आणि.. करिअरचं वाटोळं झालं की भलं?

बुद्धिबळात तरबेज असलेल्या तामिळनाडू मधील प्रज्ञानंद व वैशाली या दोन्ही भावंडांना सतत टी.व्ही, मोबाईल बघत बसणे यांसारख्या वाईट सवय लागू नयेत म्हणून त्यांच्या पालकांनी त्यांना बुद्धिबळ शिकवण्याचा निर्णय घेतला. आई - वडिलांनी या दोन्ही भावंडांना बी . रमेश यांसारख्या अनुभवी बुद्धिबळ प्रशिक्षकाकडे शिकण्यास पाठवले. त्यामुळे या भावंडांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण झाली नसती तर ते मोठे नवलच होते. अर्थात त्यांच्या आईवडिलांना याचे श्रेय द्यावे लागेल. लहान मुलांमधील प्रावीण्य ओळखण्याची आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत रमेश यांच्यासारखा दुसरा प्रशिक्षक मिळणार नाही. हे सोन्यासारखे खेळाडू मिळाल्यानंतरही प्रशिक्षक रमेश यांनी हातचे काही राखून न ठेवता, या दोन्ही भावंडांना भरपूर ज्ञान दिले आहे. सुरुवातीच्या काळात वैशालीचा धाकटा भाऊ म्हणूनच प्रज्ञानंदची ओळख होती. मात्र आता या दोन्ही भावंडांनी केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर आपला स्वतंत्र्य ठसा उमटविला आहे. प्रज्ञानंदची बहीण वैशाली हिने सुरुवातीपासूनच आपल्या बुद्धिबळाच्या करिअरमध्ये आश्चर्यकारक विजय मिळवले आहेत. 

दोन्ही मुलांसाठी आईवडिलांचे कौतुकाचे शब्द... 

आपल्या दोन्ही मुलांनी बुद्धिबळाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केल्याचा आनंद तर निश्चितपणे आहेच. मात्र, ते खेळाचा मनसोक्त आनंद घेत आहेत याचा आम्हाला अधिक आनंद आहे, असे ते नमूद करतात. त्यांची आई नागलक्ष्मी या दोघांसोबत विविध ठिकाणच्या स्पर्धांसाठी त्यांच्याबरोबर जातात. माझ्या मुलांच्या कर्तृत्वाचे श्रेय माझ्या पत्नीला जाते. ती त्यांना स्पर्धांसाठी घेऊन जाते आणि प्रेरणा देते. ती दोघांची खूप काळजी घेते, असे ते कृतज्ञतेने सांगतात. वडील रमेश बाबू एका सहकारी बँकेत नोकरी करतात, त्यामुळे घरची सगळी जबाबदारी तसेच या दोन्ही भावंडांच्या करिअरची जबाबदारी देखील त्याची आई नागलक्ष्मी या समर्थपणे सांभाळतात. परदेशातील खाद्यपदार्थांचा आपल्या मुलांना विशेष त्रास होऊ नये म्हणून त्या सतत काळजी घेत असतात. विश्वचषक स्पर्धेतही प्रज्ञानंदला कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्या स्वतः इंडक्शन स्टोव्ह आणि २ ते ३ भांडी घेऊन गेल्या होत्या. प्रज्ञानंदाने बुद्धिबळाच्या क्षेत्रात स्वतःच स्वतःचा मार्ग तयार केला आणि सन २०१८ मध्ये त्याने वयाच्या केवळ १० व्या वर्षी प्रतिष्ठित ग्रँडमास्टर पदवी मिळवली. तो देशातील सर्वात लहान वयातला आणि जगातील आतापर्यंतचा दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर ठरला.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी