Join us  

‘ताज’मधली २६/११ ची ती रात्र.. लेखिका रजिता कुलकर्णी सांगतात, त्यादिवशी अनुभवलेला भयंकर थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 3:29 PM

बँकर रजिता कुलकर्णी-बग्गा (rajita kulkarni) यांचे ‘द अननोन एज’ हे पुस्तक नुकतंच प्रसिध्द झालं. जगण्यातली उमेद आणि संघर्ष यांचा सुंदर प्रवास त्या मांडतात, २६/११ च्या ताजवरच्या दहशतवादी हल्ल्यात प्रत्यक्ष अनुभवलेल्या रात्रीसह.. (The Unknown Edge)

ठळक मुद्देरजिता कुलकर्णी जगण्यातली अनिश्चितता आणि त्यातली उमेद उलगडून सांगतात.

‘स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं की आपल्या आयुष्यात कधी असं काहीतरी घडेल. पण २६/११ नावाचा दिवस उजाडला आणि त्या रात्री भलतंच अघटीत घडलं. त्याकाळात मी खरंतर फार बिझी होते. मात्र जर्मनीहून माझी एक मैत्रीण आली होती. जर्मनीची संसद सदस्य, वर्ल्ड फोरम फॉर बिझनेस एथिक्स या फोरममध्ये आम्ही एकत्र काम केलं होतं. त्या मुंबईत होत्या तर त्यांना भेटायला म्हणून आम्ही त्या सायंकाळी हॉटेल ताजला गेलो. निवांत गप्पा मारण्याचा मूड होता आणि एकदम मोठे आवाज यायला लागले. त्या सायंकाळी ताजमध्ये काही लग्नसोहळेही होते, आधी वाटलं मोठे फटाके असावेत. आणि तेवढ्यात आम्हाला मोबाइलवर चौकशीला फोन यायला लागले की, तुम्ही सुरक्षित आहात ना आणि मग कळलं की, ताजवर दहशतवादी हल्ला झाला आहे. आणि आपला जीव धोक्यात आहे. पहाटे उशीरा आम्हाला तिथून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. आम्ही वाचलो पण तो पुर्नजन्मच होता. नव्यानं मिळालं त्यादिवशी आयुष्य, आणि कृतज्ञ वाटावं जगण्याविषयी असे क्षणही वाट्याला आले..आता इतकी वर्षे झाली, मी नव्या जगण्याविषयी कृतज्ञ आहे!' -रजीता कुलकर्णी बग्गा सांगत असतात. २६/११ चा हा थरार आणि आयुष्य घडवणाऱ्या, जगण्याला आकार देणाऱ्या गोष्टींचं सूत्र घेऊन जगण्याचीच गोष्ट सांगणारं त्यांचं ‘द अननोन एज’ (The Unknown Edge) हे पुस्तक नुकतंच प्रसिध्द झालं आहे. 

रजीता कुलकर्णी बग्गा वर्ल्ड फोरम फॉर एथिक्स इन बिझनेस या ब्रसेल्सस्थित संस्थेच्या अध्यक्ष आहेत. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षकही. यशस्वी बँकर म्हणून काम करताना कार्पोरेट जग, व्यवस्थापन आणि मेडिटेशन याविषयातील त्या तज्ज्ञ आहेत. लीडरशिप एक्सलन्स याविषयावरही त्या वर्कशॉप घेतात. जगभर प्रवास करताना ‘पाझिटिव्ह जगण्याचं’ सूत्र घेऊन त्या जगण्याची मांडणी करतात. २६/११ आणि त्यांचं पुस्तक यानिमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारल्या.रजिता कुलकर्णी सांगतात, मॅनेजमेण्ट-लीडरशीप याविषयावर मी ब्लाॅग लिहित होते. बऱ्याच वर्षांपासून मी प्रवास करते. माझं लेखन अनेकांना आवडतं, त्यातली साधी गोष्ट अनेकांना आवडली. आत्मविश्वास, उमेद, आशा आणि पॉझिटिव्हिटी देणाऱ्या गोष्टी मी सांगत होते. माझे गुरुजी श्री. श्री. रविशंकरही म्हणाले पुस्तक लिही. पण कामाच्या सगळ्या धावपळीत ते मागे राहत होते. त्यात कोरोना महामारी आणि लॉकडाऊनचे दिवस आले. माझे बाबाही सतत विचारत होते की कधी तू पुस्तक पूर्ण करणार? एरव्ही मलाही जगण्याची, वेळेची किंमत कळते पण ते काम मागेच राहिलं. आता वाटतं मी खूप वेळ लावला लिहायला. दरम्यान माझ्या बाबांना कार्डियाक अटॅक आला. आणि आता असं वाटतं की, त्यांना माझं पुस्तक पूर्ण झालेलं पाहता यायला हवं होतं. हे पुस्तक अशाच जगण्यात नेमकं काय महत्त्वाचं, काय उमेदीचं, आपण आपली ऊर्जा कशात उपयोगी आणणार हेच सारं प्रसंग, घटना, व्यक्ती यांच्या माध्यमातून सांगत आहे. तोच हा माझा प्रवास आहे. मला एवढंच वाटतं की, आपण जर आशावादी असलो, आपण कृतज्ञ असलो तर जगणं आपल्यालाही आशा आणि उमेद देतं. आता मुश्किल दिवस असले तरी ते सरतील असं वाटणं महत्त्वाचं. कोरोनाकाळात साऱ्या जगानंच ते अनुभवलं. नुसतं शरीर फिट असून उपयोग नाही, मनही सुदृढ हवं आणि मन सुदृढ असलं आणि शरीर धडधाकट नसलं तरी कामं होणार नाही. दोन्ही हवं. त्यासाठी मेडिटेशन, व्यायाम, मानसिक शांतता हे सारं महत्त्वाचं आहे. ती साधना करणंही आवश्यक आहेच.’रजिता कुलकर्णी जगण्यातली अनिश्चितता आणि त्यातली उमेद अशी उलगडून सांगतात.

चार गोष्टी महत्त्वाच्या

रजिता कुलकर्णी बग्गा सांगतात, नव्या आव्हानात्मक काळात जगताना चार गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं.

 साधनाकर्मसिध्दांत आपण मानतो, जे आहे जे वाट्याला आलं आहे ते स्वीकारता यायला हवं. ते केलं तर मनालाही थोडी विश्रांती मिळते. मेडिटेशन आणि जगण्यावरचा फोकस, साधना ही फार महत्त्वाची गोष्ट.सेवाजगणं म्हणजे नुसतं घेणं आणि अपेक्षा नव्हे. आपल्या भवतालाला देणं, सेवा करणं, आपल्याकडे जे आहे ते वाटता येणंही गरजेचं आहे. आपल्याकडे खूप आहे पण ज्याकडे काहीच नाही त्याला मदतीचा हात देणं हे आपलं कर्तव्यच आहे. ती सेवा ताकद देते.

संघ-सत्संगआपले मित्र कोण, आपण कोणासोबत राहतो. आपल्याभोवतीची माणसं आपल्याला उमेद देतात की मागे खेचतात. त्यांच्या पॉझिटिव्ह जगण्याचा आपल्या उन्नतीवर पण परिणाम होतो. त्यामुळे आपली सोबत, सत्संगही, उत्तम संगतही गरजेची.

सायलेन्स-मौनआम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये मौन असणं, अंर्तमुख होणं याचीही ताकद सांगतो. मौन ऊर्जा देतं, ती ऊर्जा आपल्याला जगणं अधिक सुंदर करायला बळ देते.

टॅग्स :26/11 दहशतवादी हल्लाप्रेरणादायक गोष्टी