Healthy rainy season | आरोग्य सांभाळणारी पावसाळ्यातली ऋतुचर्या

आरोग्य सांभाळणारी पावसाळ्यातली ऋतुचर्या

- डॉ. बालाजी तांबे 

भारतात सहा ऋतूंपैकी श्रावण, भाद्रपद हे दोन महिने वर्षा¬तूमध्ये मोजले जातात. या ऋतूतच बहुतांश पाऊस यावा, अशी योजना असली तरी सध्या वातावरणात होणा-या बदलांमुळे ¬तू मागे-पुढे होत राहतात, अर्थात याच काळात पाऊस बरसेल असं होताना दिसत नाही. संपूर्ण विश्व पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं होत. या पाचांमध्ये मध्यभागी आहे तेज-अग्नी. मनुष्यमात्रसकट पृथ्वीवरची सर्व अस्तित्वं पंचमहाभूतांपासूनच बनलेली असतात. पृथ्वीवर राहाणारे सर्व प्राणिमात्र, आपण माणसंसुद्धा, पृथ्वीतत्त्वाचा गुण अधिक प्रमाणात घेऊन असतो.  पृथ्वीपासून उत्पन्न झालेली संपत्ती म्हणजे हिरवी वनसृष्टी. प्राणिमात्रंच्या अस्तित्वासाठी अन्न जबाबदार असतं. अर्थात अन्नापासूनच सर्व काही तयार होतं. पृथ्वी आणि जल ही जोडी आहे, तसेच आकाश आणि वायू ही दुसरी जोडी आहे. म्हणजे पृथ्वी आणि जल या एकाच नाण्याच्या दोन बाजू, आणि वायू व आकाश यापण एकाच नाण्याच्या दोन बाजू. पृथ्वी व जल हे खालच्या दक्षिण बाजूस आणि वायू व आकाश वर उत्तर बाजूस असतात. खालून वर आणि वरून खाली असा त्यांचा प्रवाह चालू राहतो. आणि मध्यभागी असतो अग्नी-सूर्य. मनुष्य जर पंचमहाभूतांपासून तयार झालेला असला तर त्याच्या शरीरातील संतुलनाचा संबंध निश्चितच बाहेरच्या वातावरणातील पंचमहाभूतांशी जोडलेला असणार. त्यामुळे वातावरण बदलल्यावर शरीराचं संतुलन सांभाळण्यासाठी आहार-विहाराची काळजी घ्यावी लागते. दमटपणापासून वाचण्यासाठी 
 वर्षा ऋतूचे दोन महिनेच नव्हे, तर वर्षा¬तूनंतर येणा:या शरद ऋतूतही बहुतेक वेळा पाऊस सुरू असतो. तेव्हा पावसाळ्याच्या या चार महिन्यांमध्ये जर शरीरातील पंचमहाभूतांचं संतुलन साधलं तर यानंतर येणा-या तेजाच्या सणाचा, दिवाळीचा नीट आनंद घेता येतो.
 पावसाळ्यात वातावरणात दमटपणा वाढतो, गार वारे वाहतात, शेतात, नद्यांत-तलावांत पाण्याचा साठा होऊ लागतो. पावसानं शरीर भिजलं तर लगेच पुसणं, विशेषत: केस नीट कोरडे करणं आवश्यक असतं, कोरडे कपडे घालणं आवश्यक असतं. धुतलेले कपडे या ऋतूत लवकर आणि नीट वाळत नाहीत, तेव्हा या ऋ तूत अधिक प्रमाणात कपडे लागू शकतात हे लक्षात घेऊन तशी व्यवस्था आधीच करणं आवश्यक असतं. या ऋतूत लहान बाळाचे कपडे धुपवून घेणं आवश्यक असतं. 
 पाण्यातून चालल्यामुळे पाय अधिक प्रमाणात ओले राहिल्यामुळे चिखल्या होण्याचा संभव असतो, त्यासाठी लावायचे मलम वगैरे तयार ठेवणं आवश्यक असतं.
 या ऋतूत वातावरणात बारीक-बारीक किडे मोठय़ा प्रमाणावर तयार होतात. सरपटणा-या   प्राण्यांना ओलाव्यामुळे बाहेर जागा न मिळाल्यामुळे  हे प्राणी बाल्कनीत, ओसरीवर वा घरात येण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा चालताना सावधानता बाळगणं आवश्यक असतं. या सर्वाना घरात यायला अटकाव करण्यासाठी घरात धूप करण्याची आवश्यकता असते. ओवा, गुग्गुळ, देवदार, वावडिंग, चंदन वगैरे द्रव्यांचं मिश्रण बनवून याचा धूप सर्व घरभर  दिवसातून दोन वेळा, कमीत कमी संध्याकाळी, करणं आवश्यक असतं.

 
पावसाळ्यातला आहार नियम
उन्हाळ्यात झाडांची सुगंधी फुलं देण्याची, गोड फळं देण्याची कार्यक्षमता जास्त असते, पावसाळ्यात ही कार्यक्षमता कमी असते. याच नियमानुसार पावसाळ्यात मनुष्याचे अन्नपचन नीट होत नाही हे लक्षात घेऊन पावसाळ्यात घेतल्या जाणा:या आहारावर बारीक लक्ष ठेवणं आवश्यक असतं. अर्थात वात वाढवणा:या गोष्टी पावसाळ्यात न खाणं हे ओघानंच येतं. याचबरोबर या कालावधीत मेंदूमध्ये हलनचलन वाढलेली असल्यामुळे मनुष्याचं मन आणि इंद्रिय भटकणं शक्य असतं. मनाला आणि भटकणा:या इंद्रियांना शांत ठेवण्यासाठी या कालावधीत ध्यान-ध्यारणा, श्रद्धा-भक्ती वाढण्याच्या हेतूनं भारतीय परंपरेत उपाययोजना सांगितलेल्या असतात. या ऋतूत आहाराचं नियोजन करताना त्याची चव, रस-वीर्य-गुण-विपाक या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.
 पावसाळ्यात मधुर, आंबट आणि खारट चवीचे पदार्थ खाणं योग्य असतं. मधुर रस वात शमवतो, पित्त कमी करतो आणि ताकदही वाढवतो. पचायला जड पडणार नाही असे मधुर चवीचे पदार्थ पावसाळ्यात खाणो योग्य असतात. 
 स्वयंपाक करताना पदार्थाना आंबटपणा आणण्यासाठी कोकम, लिंबू, डाळिंब, आवळा, ताक वगैरे पदार्थ वापरता येतात. गरम पाण्यात लिंबू पिळून आणि साखर टाकून बनवलेले पेय, कोकम सार, डाळिंबाचा रस, आवळ्याचं सरबत, जेवणानंतर आले-जिरे लावलेले ताक यासारखे आंबट पदार्थ पावसाळ्यात घेणं चांगले होय. 
 पावसाळ्यात मधसेवनही फायदेशीर ठरतं. सकाळी उठल्यावर कपभर पाण्यात मध घालून घेणं चांगलं असतं. भाकरी, पोळीसह मध खाता येतो. शरीरातील अतिरिक्त क्लेदाचे पचन होण्यासाठी मध उपयोगी ठरतो. 
  रोजचा चहा करताना त्यात तुळशीची पानं, गवती चहा, सुंठ वगैरे टाकणं फायद्याचं ठरतं. 
 पावसाळ्यात अशीही भूक कमी झालेली असते, त्यामुळे या ऋतूत नेहमीइतका आहार न ठेवता चार घास कमी खाणं श्रेयस्कर असतं. जेवण गरम आणि ताजं असावं. संध्याकाळच्या जेवणात कढी-भात, मुगाची खिचडी, सूप वगैरे हलका आहार घेता येऊ शकतो अशा प्रकारे आहारावर नियोजन करून चांगली भूक लागल्याशिवाय न खाणं हा नियम पाळणं हिताचं ठरतं. 
 प्यायचं पाणी उकळून घेतलेलं, त्यातल्या त्यात सुवर्णसिद्ध केलेलं तसेच विशेष वनस्पतींबरोबर उकळलेलं असावं. जेवताना असं सिद्ध केलेलं पाणी गरम असतानाच प्यावं आणि  एरवीही कोमट असतानाच प्यावं. पावसाळ्यात असं उकळलेलं पाणी पिण्यानं जंतुसंसर्गापासून मनुष्याला दूर राहता येतं.

-----------------------------------------------------

पावसाळ्यात वात वाढतो कारण..
वर्षा ऋतूपूर्वी येणा-या ग्रीष्म ऋतूमुळे बाहेरचं वातावरण तापतं. त्यामुळे पृथ्वीवरील ओढे, नद्या, समुद्र यांचे पाणी वाफेच्या रूपानं वर जातं, मनुष्याच्या शरीरातील कफ शांत होतो आणि कोरडेपणामुळे वात वाढतो. वर्षा¬तूत बाहेर वातप्रकोप होतो तसेच शरीरातही वातदोष रोगाचे कारण ठरतो. त्यामुळे सांधेदुखी वगैरे अनुभव येतातच. पावसामुळे वातावरणात थंडपणा जाणवतो, तोही वातदोष वाढण्यास कारण ठरतो. गरम जमिनीवर पावसाचं पाणी पडल्यानंतर त्या पाण्यामध्ये आम्लांश येतो आणि शरीरातही पित्त साठायला सुरुवात होते. पावसाळ्यात सूर्यप्रकाश पृथ्वीर्पयत न पोहोचल्यामुळे वातावरणातील उष्णता कमी होते आणि पाचकाग्नीची क्षमता कमी होते.

(लेखक ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत)

balajitambe@gmail.com

 

 

Web Title: Healthy rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.