lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > प्रेग्नन्सीमध्ये वजनाचा आकडा  पटपट का वाढतो?

प्रेग्नन्सीमध्ये वजनाचा आकडा  पटपट का वाढतो?

गरोदरपणात स्त्रियांचं वजन वाढण्यामागे फक्त पोटात बाळ वाढत असतं हे एकच कारण आहे असं नाही. यामागे अनेक गोष्टी आहेत. त्या समजून घेणं गरजेचं आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:21 PM2021-03-16T16:21:37+5:302021-03-16T16:26:31+5:30

गरोदरपणात स्त्रियांचं वजन वाढण्यामागे फक्त पोटात बाळ वाढत असतं हे एकच कारण आहे असं नाही. यामागे अनेक गोष्टी आहेत. त्या समजून घेणं गरजेचं आहे. 

Why does weight gain increase so much in pregnancy narikaa ? | प्रेग्नन्सीमध्ये वजनाचा आकडा  पटपट का वाढतो?

प्रेग्नन्सीमध्ये वजनाचा आकडा  पटपट का वाढतो?

Highlights- गरोदरपणात सगळ्याच स्त्रियांचं वजन वाढतं. ही अतिशय सामान्य बाब आहे.- गरोदरपणात वजन हे वाढणारच. ते तुम्ही टाळू शकत नाही. पण वजन वाढल्यानंतरही तुम्ही सुदृढ कसं राहू शकता हे समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे.- गरोदरपणात तुमचं वजन बॉडी मास इंडेक्स नुसार असलं पाहिजे. लठ्ठपणा आणि कमी वजन दोन्ही गोष्टी बाळ आणि आईसाठी चांगल्या नाहीत.

गरोदरपणात सगळ्याच स्त्रियांचं वजन वाढतं. ही अतिशय सामान्य बाब आहे. गरोदरपणात  स्त्रीचं  वजन वाढतं  कारण तिला स्वतःबरोबर बाळाचंही पोषण करायचं असतं. योग्य आहार, व्यायाम, नियमित चालणं या गोष्टी केल्या तर बाळंतपणानंतर वजन पूर्ववत होऊ शकतं.

गरोदरपणात  वजन का वाढतं?
स्त्रियांचं वजन वाढण्यामागे फक्त पोटात बाळ वाढत असतं हे एकच कारण आहे असं नाही. बाळाबरोबर आईच्या शरीरातले स्नायू, पेशीही वाढत असतात. शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं. वार तयार होते. गर्भाशयाचा आणि स्तनांचा आकार वाढतो. सर्वसाधारणपणे एका गरोदरपणात स्त्रीचं वजन ११ ते १५ किलो वाढतं. जुळी असतील किंवा शरीरातल्या पाण्याचं प्रमाण वाढलं तरीही वजन वाढू शकतं. वजन वाढल्यामुळे हातापायांवर आणि ओटीपोटाच्या आजूबाजूच्या त्वचेवरही सूज येते.

 

वजनापेक्षाही सुदृढता महत्त्वाची

गरोदरपणात वजन हे वाढणारच. ते तुम्ही टाळू शकत नाही. पण वजन वाढल्यानंतरही तुम्ही सुदृढ कसं राहू शकता हे समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे.

१) पोषक आणि योग्य आहार केला पाहिजे. ज्यात फळं, भाज्या, धान्य, सामिष आणि लो फॅट डेअरी पदार्थ असतील.
२) खूप साखर आणि तेल, तूप असलेले पदार्थ आणि पेयं शक्यतो टाळली पाहिजेत.
३) रोज थोडा तरी व्यायाम झालाच पाहिजे.
४) जे काही, जेव्हा केव्हा खाल ते स्वच्छ जागी, चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या चवीचं आहे ना हे नक्की बघा.
५) तुमच्या आहारात  फॉलीक ऍसिड, आयोडीन, कॅल्शिअम आणि प्रथिनं हे घटक असलेच पाहिजेत. हे पोषक घटक शरीरात गेल्यामुळे बाळंतपण तर सोपं होईलच पण बाळालाही सगळी पोषणमुल्यं मिळू शकतील.
६) भरपूर पातळ पदार्थांचं सेवन करा. अनेकजणींना उलट्यांचा त्रास होतो, ज्यामुळे  डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या काळात शरीरात निरनिराळ्या माध्यमातून द्रव पदार्थ जात राहणं गरजेचं आहे.


७) भरपूर पाणी प्यायला. भाज्या/ फळांचे रस घेऊ शकता. पण एरिएटेड आणि इस्न्थेटिक ज्यूस मात्र टाळायला हवीत. 
८) हलका व्यायाम करा. यात, चालणं, पोहोणं, योग यांचा समावेश करता येऊ शकतो. रोज कमीतकमी ३० मिनिटं व्यायामाला द्या.
९) व्यायामामुळे शरीर ताजतवानं राहातच पण मनही प्रसन्न राहतं.
१०) शरीर आणि मन दोन्ही शांत, सुदृढ असेल तर बाळाला त्याचा सगळ्यात जास्त उपयोग होऊ शकतो.
११) तुमचं वजन बॉडी मास इंडेक्स नुसार असलं पाहिजे. लठ्ठपणा आणि कमी वजन दोन्ही गोष्टी बाळ आणि आईसाठी चांगल्या नाहीत.
चांगली जीवनशैली असणं अतिशय गरजेचं आहे. अगदी बाळासाठी प्रयत्न सुरु करता तेव्हापासूनच जीवनशैलीकडे लक्ष दिल पाहिजे. किंवा 'बाळासाठी आता चान्स घेऊया ' हा विचार मनात येतो खरंतर तेव्हापासूनच जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्यायला हवं !
तुमचे स्त्रीरोग तज्ज्ञ तुम्हाला जे मार्गदर्शन करतील त्याकडे लक्ष द्या. योग्य आहार घ्या, आहाराचं नियोजन दिलं असेल तर ते सांभाळा. तुमचं आणि तुमच्या बाळाचं स्वास्थ्य जपा.

विशेष आभार: डॉ. सचिन दलाल 
(MD, DNB, FCPS, DGO)

Web Title: Why does weight gain increase so much in pregnancy narikaa ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.