Lokmat Sakhi >Health >Pregnancy > गरोदरपणात सेक्स ? समज आणि गैरसमज; नेमकं काय खरं आणि सुरक्षित ?

गरोदरपणात सेक्स ? समज आणि गैरसमज; नेमकं काय खरं आणि सुरक्षित ?

संकोच वाटून कायम मनात ठेवला जाणारा प्रश्न. पण या प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर मिळवलं नाही तर चुका होण्याच्या आणि त्याचा आईच्या आणि गर्भाच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 01:50 PM2021-05-17T13:50:09+5:302021-05-17T15:16:24+5:30

संकोच वाटून कायम मनात ठेवला जाणारा प्रश्न. पण या प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर मिळवलं नाही तर चुका होण्याच्या आणि त्याचा आईच्या आणि गर्भाच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

Should have sex during pregnancy or not and what happens if do? | गरोदरपणात सेक्स ? समज आणि गैरसमज; नेमकं काय खरं आणि सुरक्षित ?

गरोदरपणात सेक्स ? समज आणि गैरसमज; नेमकं काय खरं आणि सुरक्षित ?

Highlights जर तुमचं गरोदरपण निरोगी असेल , त्यात काही समस्या नसतील तर तुम्ही नियमित सेक्स करू शकता.बाळ गर्भाशयात ओटीपोट आणि स्नायूंच्या भिंतीआड सुरक्षित असतं.जर तुमची प्रेग्नन्सी धोकादायक परिस्थितीतून जात असेल तर मात्र सेक्स न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

जोडप्यांना अनेकदा हा प्रश्न पडलेला असतो की गरोदरपणाच्या काळात सेक्स करावा की नाही? बहुतेकवेळा जन्माला येणाऱ्या बळावर याचा काही परिणाम होणार नाही? ना ? ही काळजी त्यांना असते. या लेखाच्या माध्यमातून जोडप्यांना पडणाऱ्या मूलभूत प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आहे.

जर तुमचं गरोदरपण निरोगी असेल , त्यात काही समस्या नसतील तर  तुम्ही नियमित सेक्स करू शकता. शारीरिक संबंधाचा पोटातल्या बाळावर काहीही परिणाम होत नाही. कारण ते बाळ गर्भाशयात ओटीपोट आणि स्नायूंच्या भिंतीआड सुरक्षित असतं. गर्भाशयातील ऍम्नीऑटिक सॅकमुळे बाळाला आधार मिळतो. एक प्रकारचा सपोर्ट मिळतो ज्यामुळे कुठल्याही धक्क्यांचा त्रास बाळाला होत नाही.

अर्थात काही डॉक्टरांच्या मते प्रेग्नन्सीच्या शेवटल्या काही आठवड्यात सेक्स करू नये. कारण, पुरूषांच्या वीर्यामध्ये प्रोस्टाग्लान्डिन नावाचं एक हार्मोन असतं, ज्यामुळे कळा चालू होण्याची शक्यता असते.

 

प्रेग्नन्सीच्या दरम्यान  तेव्हा सेक्स करू नये…

१) जर तुमची प्रेग्नन्सी धोकादायक परिस्थितीतून जात असेल.

२) गर्भपाताची शक्यता असेल किंवा पूर्वी गर्भपात झाला असेल.

३) स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेक्स करू नका असं सुचवलं असेल.

४) गर्भधारणेच्या ३७ आठवड्यांनंतरच कळा चालू होण्याची ज्याला प्री टर्म लेबर म्हटलं जातं, त्याची शक्यता असेल तर.

५) ओटी पोटात दुखत असेल, योनीमार्गातून रक्तस्त्राव होत असेल किंवा इतर स्त्राव (डिस्चार्ज) होत असेल तर.

६) गर्भ पिशवी लीक झाली असेल किंवा फाटली असेल तर..

७) गर्भाशय ग्रीवा लवकर खुली झाली असेल तर…

८) गर्भवेष्टन किंवा वार गर्भाशयाच्या खूप खाली असेल तर..

९) जुळं किंवा तिळं होणार असेल तर..

१०) आणि जर तुमच्या डॉक्टरांनी सेक्स करू नका असा सल्ला दिला असेल तर डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे. त्याचप्रमाणे शारीरिक संबंध ठेवायचे नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध ज्यातून ऑरगॅसम येतो असे संबंध ठेवायचे नाहीत

काही स्त्रियांना गरोदरपणात सेक्स करण्याची इच्छाच मुळात निर्माण होत नाही. तर काही स्त्रियांना वरचेवर ही इच्छा निर्माण होते. या काळात सुरक्षित शारीरिक संबंधच ठेवले गेले पाहिजेत. कुठलेही लैंगिक आजार होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. कारण गरोदरपणात असे आजार अजूनच किचकट होऊन बसण्याची शक्यता असते.

याकाळात सेक्स करताना नेहमीपेक्षा वेगळी पोझिशन्स तुम्हाला सोयीची वाटू शकतात. पण अशी कुठलीही नवी पोझिशन्स करताना तुमच्या पोटावर आणि बाळावर अकारण दाब येणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे.

विशेष आभार: डॉ. सुधा टंडन (M.D., D.G.O.)

Web Title: Should have sex during pregnancy or not and what happens if do?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.