>आरोग्य >गरोदरपण > नको तपासण्या आणि नको दवाखाना! गरोदरपणात डॉक्टरकडे जाताना ‘कोरोना’ इन्फेक्शन होण्याची भीती वाटतेय?

नको तपासण्या आणि नको दवाखाना! गरोदरपणात डॉक्टरकडे जाताना ‘कोरोना’ इन्फेक्शन होण्याची भीती वाटतेय?

कोरोनाकाळातलं गरोदरपण ही जोखीम वाटणं साहजिकच आहे. एरव्हीही बाळांतपण म्हणजे दुसरा जन्मच, आता याकाळात अधिक खबरदारी घेण्याची त्यात जबाबदारी आहे.   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:13 PM2021-09-18T16:13:49+5:302021-09-18T16:35:43+5:30

कोरोनाकाळातलं गरोदरपण ही जोखीम वाटणं साहजिकच आहे. एरव्हीही बाळांतपण म्हणजे दुसरा जन्मच, आता याकाळात अधिक खबरदारी घेण्याची त्यात जबाबदारी आहे.   

corona infection and pregnancy, check up-precautions you need to take | नको तपासण्या आणि नको दवाखाना! गरोदरपणात डॉक्टरकडे जाताना ‘कोरोना’ इन्फेक्शन होण्याची भीती वाटतेय?

नको तपासण्या आणि नको दवाखाना! गरोदरपणात डॉक्टरकडे जाताना ‘कोरोना’ इन्फेक्शन होण्याची भीती वाटतेय?

Next
Highlightsतुम्ही जितकी काळजी घ्याल तितकी आई व बाळाला नुकसान होण्याची शक्यता कमी होते.

कोवीड-१९ ही महामारी सुरु झाल्यापासून आपल्या आरोग्यव्यवस्थेवर खूप ताण आहे. इतर पेशंट्सच्या संख्येत कोरोना झालेल्या आणि लक्षणं दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या पेशंट्सची भर पडली आहे. मात्र त्यातही गरोदर जोडप्यांवर सगळ्यात जास्त ताण आहे. त्यांना गरोदरपणाच्या एरवीच्या ताणासकट महामारीच्या काळात बाळ सुखरूप जन्माला घालण्याचंही टेन्शन आहे. गरोदरपणातील अनेक तपासण्या आणि चाचण्यांना त्याचा फटका बसला आहे. दवाखान्यात नियमित तपासणीसाठी जायचे तरी अनेकींना अजूनही धास्ती वाटतेच आहे. तर न घाबरता याकाळात काय काळजी घ्यायची?

कोराेनाकाळ आणि गरोदरपणात घ्यायची काळजी

मृत्युदर कमीत कमी ठेवण्यासाठी आईसह नवजात बाळांचं आरोग्य सांभाळणारी आरोग्य यंत्रणा अत्यंत महत्वाची असते. तुम्ही जेव्हा गरोदरपणातील तपासण्यांसाठी आणि बाळंतपणासाठी दवाखान्यात जाल तेव्हा मास्क वापरा आणि शारीरिक अंतर पाळा. बहुतेक सगळ्या वैद्यकीय आस्थापना आणि इस्पितळांनी लोक भेटायला येण्यावर बंदी घातलेली आहे. आईला झालेला संसर्ग बाळाला जन्माच्या आधी होण्याची शक्यता खूपच कमी असते. मात्र जन्माला आल्यानंतर त्यांना संसर्ग होऊ शकतो. तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांशी संपर्कात राहून इस्पितळाच्या लेटेस्ट पॉलिसी समजून घेतल्या पाहिजेत.

गरोदरमातांनी काय विशेष काळजी घ्यावी?

गरोदर महिलांना संसर्गाचा धोका इतरांपेक्षा जास्त नसला तरी त्यांना श्वसनाचा संसर्ग होण्याची शक्यता मात्र जास्त असते. झालेला संसर्ग प्लॅसेंटामार्फत बाळापर्यंत पोचतो का हे माहिती नसल्याने तुम्हाला व बाळाला संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणं हाच सर्वोत्तम उपाय आहे. सर्व गरोदर महिलांनी शक्यतो घरी आणि सुरक्षित राहून पुढील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

१. सकस अन्न घ्या आणि श्वसनाचे व्यायाम करा.

२. घाबरून जाऊ नका.

३. घरातील बाहेर पडणाऱ्या सदस्यांपासून घरातल्या घरातही शारीरिक अंतर पाळा.

४. बाहेरील वस्तू किंवा पृष्ठभागाला स्पर्श केल्यावर तुमचे हात साबणाने स्वच्छ धुवा

५. घरी आणलेल्या सर्व वस्तू सॅनिटाईझ करून घ्या.

६. हात वारंवार धुवा/सॅनिटाईझ करा.

७. अस्वच्छ हाताने चेहेऱ्याला स्पर्श करणं टाळा.

डॉक्टरांकडे जाताना.. 

तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने कमी वेळा तपासणीसाठी जा. १२, २०, २८ आणि ३६व्या आठवड्यात तपासणी असू शकते.

ताप, खोकला किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर लक्षणं कमी झाल्यानंतर ७ दिवसांपर्यंत तपासणीसाठी जाऊ नका.

घरातल्या कोणाला कोव्हीड-१९ ची बाधा झाल्याची शंका असेल तर त्यापुढील १४ दिवस तपासणीसाठी जाऊ नका.

तपासणीसाठी प्रत्यक्ष केंद्रावर न जाता अनेक शंका फोनवर सोडवता येऊ शकतात.

तुमच्या लोह आणि जीवनसत्त्वांच्या गोळ्या न विसरता घ्या आणि भरपूर पाणी व इतर द्रवपदार्थ घ्या.

अनावश्यक सोनोग्राफी व इतर तपासण्या टाळा

तुम्हाला स्वतःला कोवीड- १९ झालेला असेल तरी घाबरून जाऊ नका.  योग्य ते उपचार घ्या.

गरोदर रुग्णांना एक्स रे आणि सीटी स्कॅन सारख्या तपासण्या सांगितल्या जाऊ शकतात. अशा वेळी त्यामुळे गर्भाला इजा पोचणार नाही याची काळजी घ्या.

थोडक्यात सांगायचं तर स्वच्छता पाळणे, पुरेसा पोषक आहार आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगिकारली तर तुम्हाला कमीत कमी वेळा तपासणीसाठी जायला लागेल. तुम्ही जितकी काळजी घ्याल तितकी आई व बाळाला नुकसान होण्याची शक्यता कमी होते.

तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी विशेष आभार

डॉ. मीना सामंत  (MBBS, MD, DNB, MRCOG)

Web Title: corona infection and pregnancy, check up-precautions you need to take

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

शाळा सुरु झाल्या पण पुन्हा शाळेत जाताना मुलांना कोणत्या गोष्टींची भीती वाटतेय? - Marathi News | School started, corona unlock, but what do the children fear when they go back to school? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळा सुरु झाल्या पण पुन्हा शाळेत जाताना मुलांना कोणत्या गोष्टींची भीती वाटतेय?

शाळा सुरु होत आहेत, ऑनलाईन-ऑफलाईन चक्रही सुरु आहे, पण या साऱ्यात मुलांच्या जगात काय घडलं-बिघडलं? त्यांचे प्रश्न मोठ्यांना कळतील? ...

आपण गरोदर आहोत हे महिलेला कळतच नाही; असं होऊ शकतं का? काय आहेत कारणं? - Marathi News | A woman can be pregnant and not know it? what is cryptic pregnancy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपण गरोदर आहोत हे महिलेला कळतच नाही; असं होऊ शकतं का? काय आहेत कारणं?

नागपूरमध्ये लग्नानंतर १७ वर्षांनी एका महिलेला मूल झाले, मात्र आपण गरोदर आहोत याची तिला कल्पनाही नव्हती. जगात आजवर अशा घटना घडलेल्या आहेत. हा चमत्कार की यामागे काही वैद्यकीय, शास्त्रीय कारणंही असतात? ...

२० आठवड्यांनंतर गर्भपात,  न्यायालयात जाण्याची गरज नाही; आता डॉक्टरच घेणार निर्णय.. - Marathi News | Abortion after 20 weeks, no need to go to court; Now the doctor will decide. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२० आठवड्यांनंतर गर्भपात,  न्यायालयात जाण्याची गरज नाही; आता डॉक्टरच घेणार निर्णय..

२० ते २४ आठवड्यांवरील गर्भपात : २४ आठवड्यांवरील गर्भपाताची प्रकरणे मेडिकल बोर्डासमोर, न्यायालयात जाण्याची गरज नाही. ...

गरोदरपणातल्या हार्मोन्स बदलांचा डोळ्यांवर होतो परीणाम ! गरोदरपणात डोळे सांभाळा.. - Marathi News | Hormonal changes in pregnancy affect the eyes! Take care of your eyes during pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणातल्या हार्मोन्स बदलांचा डोळ्यांवर होतो परीणाम ! गरोदरपणात डोळे सांभाळा..

गरोदरपण ही बाईसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची अवस्था असते. यामध्ये शरीरात होणारे बदल समजून घेऊन त्यानुसार योग्य ती काळजी घ्यायला हवी, पाहूयात गरोदरपणातील डोळ्यांच्या समस्यांविषयी... ...

काय यार, डोक्याचा चिवडा झाला; असं वाटतं? आज पाडवा, झटकाच मरगळ, हे घ्या उपाय! - Marathi News | corona, lockdown and boring life, how to get rid of boredom, start new life in this Diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय यार, डोक्याचा चिवडा झाला; असं वाटतं? आज पाडवा, झटकाच मरगळ, हे घ्या उपाय!

दिवाळी आली. घरातली जळमटं काढताना स्वत:ला विचारू की गेली दीड वर्ष आपलं आयुष्य जे निरर्थक घरबंद झालं, त्याचं काय करता येईल? ...