lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणजे काय ? मासिक पाळीत ‘हे’ पॅड्स वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण...

ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणजे काय ? मासिक पाळीत ‘हे’ पॅड्स वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण...

Organic Pads vs Regular Pads, Which Is Better? : सॅनिटरी पॅड्स मासिक पाळीत कोणते वापरले जातात आणि त्यामुळे शरीराला काय फायदे तोटे होतात, हे समजून घेतलं पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2023 07:27 PM2023-07-27T19:27:39+5:302023-07-27T19:48:00+5:30

Organic Pads vs Regular Pads, Which Is Better? : सॅनिटरी पॅड्स मासिक पाळीत कोणते वापरले जातात आणि त्यामुळे शरीराला काय फायदे तोटे होतात, हे समजून घेतलं पाहिजे

Why Use Organic Pads? 5 Reasons to Choose Organic and Natural Pads. | ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणजे काय ? मासिक पाळीत ‘हे’ पॅड्स वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण...

ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणजे काय ? मासिक पाळीत ‘हे’ पॅड्स वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण...

दर महिन्याला येणारी मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. मासिक पाळी दरम्यान पॅडचा वापर करणे हे आलेच. पूर्वीच्या काळात स्त्रिया मासिक पाळीतील रक्तस्त्राव शोषून घेण्यासाठी कापडाचा वापर करत असत. परंतु काळ बदलल्याने कापडाऐवजी पॅडचा वापर होऊ लागला. नियमित पॅड वापरल्यामुळे रोगाचा धोका कमी झाला, तसेच ते वापरणे अधिक सोपे झाले आहे. परंतु सध्याचा काळात प्लास्टिक पॅडच्या वापरामुळे स्त्रियांना त्याच्या अनेक समस्या होऊ लागल्या आहेत. तसेच प्लास्टिक पॅडच्या वापरामुळे पर्यावरणावरही त्याचा वाईट परिणाम होऊ लागला. 

बदलत्या काळानुसार प्लास्टिक पॅडची जागा ऑरगॅनिक सॅनिटरी पॅडने घेतली. या ऑरगॅनिक सॅनिटरी पॅडच्या वापराने पर्यावरणाचा अतिरिक्त अपव्यय थांबवता येईल. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते अधिक फायदेशीर मानले जाते. याबद्दल ऑरा स्पेशालिटी क्लिनिक (गुडगाव) च्या संचालिका आणि क्लाउड नाईन हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार, डॉक्टर डॉ. रितू सेठी, यांनी ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्स वापरण्याचे काही फायदे सांगितले आहे, ते पाहूयात(Why Use Organic Pads? 5 Reasons to Choose Organic and Natural Pads).

ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्स कशापासून बनवले जातात ? 

ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्स यामध्ये नैसर्गिक गोष्टींचा शोषक म्हणून वापर केला जातो. उदा, बांबूपासून, केळीच्या पानांपासून तयार केलेले फायबर, मका किंवा पाम स्टार्च किंवा सेंद्रिय कापूस यापासून बनवलेले पॅड्स. हे पूर्णत: पर्यावरणपूरक असतात. सेंद्रिय कापसापासून बनवलेले कापड यात वापरले जातात. हे पॅड्स पुन्हा-पुन्हा वापरण्यायोग्य असतात. असे पॅड्स ३ ते ५ वर्ष चालतात. फक्त हे पॅड्स स्वच्छ धुतल्यानंतर कडक उन्हात वाळवणं गरजेचं असतं.

मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ? आरोग्य आणि हायजिन सांभाळा...

मासिक पाळीत डाग पडण्याची भीती, पॅड लिक होते? ५ सोपे उपाय, बिंधास्त व्हा...

ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्स वापरण्याचे फायदे :- 

 १. ऑर्गेनिक सॅनिटरी पॅड्स केमिकल्स विरहित असतात :- ऑरगॅनिक पॅड सामान्यतः सेंद्रिय कापूस आणि इतर वनस्पती-आधारित तंतूंसारख्या नैसर्गिक पदार्थांपासून बनवले जातात. यामध्ये हानिकारक रसायने, प्लास्टिक, सुगंध किंवा कृत्रिम गोष्टी यांचा वापर केला जात नाही, ज्यामुळे त्वचेला नुकसान होत नाही. दुसरीकडे, प्लास्टिकच्या पॅडमध्ये अधिक रसायनांचा वापर केला जातो. तसेच त्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. 

२. संसर्गाचा धोका होण्याची भीती नाही :- नियमित पॅडचा वापर केल्याने बर्‍याच स्त्रियांना प्रायव्हेट पार्टच्या जागी खाज येणे, जळजळ होणे  आणि यामुळे  चिडचिड होते. तर ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे त्वचा रिलॅक्स राहते आणि कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी होत नाही.

मासिक पाळीत खूप पोट दुखते? करा ४ उपाय, पोटदुखी होईल कमी... 

३. दीर्घकाळ टिकून राहते :- ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड वापरल्याने आपल्या त्वचेला श्वास घेणे सोपे जाते, याचबरोबर प्रायव्हेट पार्ट दीर्घकाळ ओला न रहाता कोरडा ठेवण्यास मदत होते, यामुळे हे बॅक्टेरियाच्या वाढीची शक्यता देखील कमी करते, जे मासिक पाळीच्या समस्या आणि संक्रमण टाळण्यास मदत करू शकते.

पिरिएड ट्रॅकर अ‍ॅप्स काय असतात? खरंच त्यांचा उपयोग करुन पाळीच्या दिवसात योग्य काळजी घेता येते का?

४. बायोडिग्रेडेबल आहेत :- ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड पूर्णपणे बायोडिग्रेडेबल असतात, जे पर्यावरणासाठी देखील फायदेशीर असतात. दुसरीकडे, प्लास्टिक सॅनिटरी पॅड्सचे जैवविघटन होण्यास बराच वेळ लागू शकतो, जे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून देखील हानिकारक आहे. 

५. निरोगी आणि आर्थिक :- ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड हे नियमित आणि प्लास्टिक पॅड्सपेक्षा जास्त फायदेशीर मानले जातात. त्यांचा वापर करून रोग पसरण्याचा धोका उद्भवत नाही. त्याचवेळी, ते आर्थिकदृष्ट्या देखील अतिशय स्वस्त आहेत. एकदा खरेदी केल्यानंतर, आपण ते बऱ्याच काळासाठी वापरू शकता. ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड देखील स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहेत. जर आपल्याला प्लास्टिक पॅड वापरण्यात समस्या येत असल्यास, आपण हे  ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड वापरू शकता.

Web Title: Why Use Organic Pads? 5 Reasons to Choose Organic and Natural Pads.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.