मुली वयात आल्या की त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात. असंतुलित हार्मोन्स, चिडचिडपणा, तारुण्य, चेहऱ्यावर केस येणे आणि मासिक पाळी.(irregular periods home remedy) मासिक पाळीचे हे चक्र प्रत्येक महिन्याच्या २८ दिवसांनंतर येते. या पाच दिवसांत महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. (scanty periods natural cure)
पाळी येण्यापूर्वी ते ५ दिवसांपर्यंत आपल्याला अनेक वेदना सहन कराव्या लागतात.(light periods causes and solution) ओटी पोटीत दुखणे, पाय, कंबरदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात.(menstrual cramps relief drink) इतकेच नाही तर पाळी येण्यापूर्वीच अनेकदा लघवीमार्फत काही प्रमाणात रक्त जाते.(homemade drink for period pain) पाळी आल्यानंतर रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. पाळी आल्यावर अचानकमध्येच ती थांबते. कित्येकदा रक्ताचा रंग बदलतो.(natural remedy for irregular menstruation) अशावेळी नेमक काय करावं हे आपल्याला सुचत नाही. डॉक्टरांशी बोलाव का? असा प्रश्न आपल्याला वारंवार सतावतो. मानसिकदृष्ट्या आपण अधिक अस्वस्थ होतो. (how to treat light periods naturally at home)
PCOS मुळे महिलांना होतात गंभीर आजार, रिसर्चचा धक्कादायक खुलासा-स्वत:ची तब्येत आधी सांभाळा
बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, सततचा ताण आणि अपुरी झोप याचा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे मासिक पाळीचे चक्र देखील बिघडते. मासिक पाळी उशिरा येणे, रक्तप्रवाह व्यवस्थित न होणे याची अनेक कारणे असतात. परंतु आहारतज्ज्ञ लिमा महाजन यांनी याविषयीवर आपले मत मांडले आहे. त्या म्हणतात की मासिक पाळीवरच्या समस्यांवर अनेक उपाय आहेत जे मागच्या कितीतरी पिढ्यांपासून वापरले जाताय. त्याचा वापर केल्यास आपल्याला आराम मिळेल, जाणून घेऊया याविषयी.
1. कमी रक्तस्त्राव किंवा मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर तीळ आणि गुळाचे पाणी प्या. चमचाभर तीळ भाजून घ्या. कपभर कोमट पाण्यात चमचाभर गूळ आणि तीळ घालून मिक्स करा. पाळी येण्यापूर्वी आठवडाभर हा उपाय करा.
2. अनियमित मासिक पाळीसाठी दालचिनीचा चहा फायदेशीर ठरेल. कपभर पाण्यात लहान दालचिनीचा तुकडा घालून १० मिनिटे पाणी उकळून घ्या. गाळून रोज प्या. दालचिनी रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करते. तसेच अनियमित पाळीपासून सुटका करते.
3. जास्त रक्तस्त्राव किंवा गाठी पडत असेल तर चमचाभर धने २ कप पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यानंतर हे पाणी मासिक पाळी आल्यावर प्या. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होईल.
4. पाळी उशिरा येणे किंवा मेनोपॉजचा त्रास होत असेल तर आपण अळीव खायला हवे. १ चमचा अळीव रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी दूध किंवा पाण्यात मिसळून खा. यामुळे मासिक पाळी नियमित येण्यास मदत होईल.