Join us   

आसाममधल्या तेजपूर विद्यापीठाचा आगळावेगळा निर्णय, विद्यार्थिनींना मिळणार मासिक पाळीची सुटी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2023 8:49 PM

Assam: Menstrual Leave For Female Students, Tezpur University Takes A Progressive Step : महिलांना शाळा, कॉलेजात, ऑफिसात मासिक पाळीच्या त्या दिवसात रजा द्यावी की देऊ नये हा वादाचा मुद्दा असतानाच, आसाममधील तेजपूर विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे...

मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याशी संबंधित अतिशय नाजूक विषय असतो. या काळात महिलांना शारीरिक आरामाची अतिशय जास्त गरज असते. महिलांच्या शरीरात होणारे बदल आणि यामुळे त्यांना होणारा त्रास या मुद्द्यावर गेल्या काही वर्षांमध्ये खुलेपणानं बोललं जात आहे. मासिक पाळी हा विषय आता न्यूनगंडाचा किंवा लाजिरवाणे वाटावे असा राहिलेला नसला तरीही मासिक पाळीदरम्यान मिळणाऱ्या सुट्टीबाबतचा वाद मात्र अजूनही कायम दिसत आहे. अशी परिस्थिती असतानाच, आसाममधील तेजपूर विद्यापीठाने एक प्रगतीशील पाऊल उचलले आहे(Assam: Menstrual Leave For Female Students, Tezpur University Takes A Progressive Step).

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये मुलीना प्रचंड वेदनांना तोंड द्यावे लागते त्या काळात त्यांना आराम मिळावा म्हणून खास मासिक पाळीच्या सुट्टीचा हा निर्णय घेण्यात आला होता. मासिक पाळीच्या कठीण दिवसांमध्ये मुलींना आराम मिळावा हा त्यामागचा हेतू आहे(Assam: Menstrual Leave For Female Students, Tezpur University Takes A Progressive Step).

मासिक पाळीच्या दिवसांतील सुट्टीच्या निर्णयाबाबत... 

मासिक पाळी हा अनेकांसाठी भावनिक उलथापालथीचा काळ असतो. या काळात मुलींना विशेषत: विद्यार्थिनींना त्यांच्या सर्व त्रासांची चांगलीच जाणीव होत असते. मासिक पाळीदरम्यान महिला - विद्यार्थिनींना येणाऱ्या मानसिक आणि शारीरिक अडचणी लक्षात घेऊन आसाम मधील तेजपूर विद्यापीठांमध्ये मासिक पाळी दरम्यान सुट्टी लागू करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेली आहेत. 

मासिक पाळीच्या ४ दिवसात आंघोळ करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची ? आरोग्य आणि हायजिन सांभाळा...

ऑरगॅनिक सॅनिटरी पॅड्स म्हणजे काय ? मासिक पाळीत ‘हे’ पॅड्स वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण...

तेजपूर विद्यापीठ, शिक्षण मंत्रालय आणि महिला आणि बाल विकास मंत्रालय, सरकारच्या निर्देशानुसार, दिनांक १६ ऑगस्ट २०२३ रोजी, किमान ७५ % वर्ग उपस्थितीत २% शिथिलता देऊन महिला विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळीची रजा लागू करण्याचा मोठा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महिन्याच्या त्या काळात मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांना ओळखून महिला विद्यार्थ्यांना सहाय्यक आणि सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यसोशल व्हायरल