Lokmat Sakhi >Health >Menopause > मेनोपॉजनंतरही मोठ्या प्रमाणात अचानक कधीतरी रक्तस्त्रावाचा त्रास होतोय?

मेनोपॉजनंतरही मोठ्या प्रमाणात अचानक कधीतरी रक्तस्त्रावाचा त्रास होतोय?

मेनोपॉज- रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव जाऊ देच, पण हा काळ उलटल्यानंतर स्पॉटिंग होणं हे ही नॉर्मल नव्हे. तसं झालं तर  ताबडतोब डॉक्टर गाठून योग्य ते निदान करून घेणं उत्तम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:35 PM2021-05-04T16:35:29+5:302021-05-04T16:58:25+5:30

मेनोपॉज- रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव जाऊ देच, पण हा काळ उलटल्यानंतर स्पॉटिंग होणं हे ही नॉर्मल नव्हे. तसं झालं तर  ताबडतोब डॉक्टर गाठून योग्य ते निदान करून घेणं उत्तम.

Bleeding after menopause? This can be serious narikaa! | मेनोपॉजनंतरही मोठ्या प्रमाणात अचानक कधीतरी रक्तस्त्रावाचा त्रास होतोय?

मेनोपॉजनंतरही मोठ्या प्रमाणात अचानक कधीतरी रक्तस्त्रावाचा त्रास होतोय?

Highlightsपाळी जायच्या दरम्यान हार्मोन्समध्ये झालेल्या उलथापालथीमुळं गर्भाशयाचं श्‍लेष्म किंवा अस्तर पातळ-नाजूक होतं किंवा एकदम दाट होतं. त्यातूनही स्पॉट्स येण्याची शक्यता असते.काहीवेळेस हार्मोनल थेरपीनंतर किंवा रक्त पातळ करणार्‍या औषधांचा परिणाम म्हणून रक्तस्राव होतो. त्यामुळं हे उपचार घेतल्यावर डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार काळजीनं वागणं आवश्यक आहे.सर्व्हायकल कॅन्सर, एंडोमेट्रिअल कॅन्सर, योनीचा कॅन्सर अशा कारणांमुळं रक्तस्रावाचा धोका असतो.

मेनोपॉज, रजोनिवृत्ती झाली म्हणजे स्त्रीचं गर्भधारणेचं चक्र संपलं असं मानतात. त्यामुळं पुन्हा रक्तस्राव अपेक्षित नसतो. साधारणपणे जी शेवटची पाळी आपण मानतो त्यानंतर जवळपास बारा महिने सलग पाळी आली नाही की रजोनिवृत्तीवर शिक्कामोर्तब होतं. रक्तस्राव जाऊ देच, पण हा काळ उलटल्यानंतर स्पॉटिंग होणं हे ही नॉर्मल नव्हे. तसं झालं तर तुम्ही ताबडतोब डॉक्टर गाठून योग्य ते निदान करून घेणं उत्तम.

मेनोपॉज झाल्यावरही रक्तस्राव का? 

युटेराइन पॉलीप्स (बुळबुळित ग्रोथ)

गर्भाशयाच्या नलिकेलगत आणि भिंतीवर पेशींची ओव्हरग्रोथ होणं म्हणजे युटेराइन पॉलीप्स. गर्भाशयाच्या आतील भिंतीवर ही वाढ झालेली असते, पण ग्रोथ जास्त असेल तर ती गर्भाशयाच्या पोकळीतही वाढू लागते. गर्भाशय किंवा गर्भाशयाच्या मुखापाशी, सर्व्हिक्समध्ये असणार्‍या या अनैसर्गिक पेशींच्या वाढीमुळं पाळीचा काळ संपल्यानंतरही रक्तस्राव होण्याची शक्यता असते.
हे पॉलीप्स म्हणजे कॅन्सर होण्याचं लक्षण नव्हे, तरीही यातून रक्तस्राव होतोय हे पक्कं झालं की ते काढून टाकणं चांगलं. कधीकधी कॅन्सरची शक्यता पॉलीप्समुळं बळावते हे ही खरंय. डी अ‍ॅन्ड सी म्हणजे डायलेशन अ‍ॅन्ड करेटेज पद्धतीनं ही ग्रोथ काढली जाते. गर्भाशयाचं मुख किंवा ग्रीवेचं प्रसरण करून हिस्टोरोस्कॉपी केली जाते. योनीमार्गातून सर्जिकल सिझरनं पॉलीप्स खरडून काढले जातात.

एंडोमेट्रियम (गर्भाशयाला असलेले श्‍लेष्म) पातळ किंवा दाट होणं 
पाळी जायच्या दरम्यान हार्मोन्समध्ये झालेल्या उलथापालथीमुळं गर्भाशयाचं श्‍लेष्म किंवा अस्तर पातळ-नाजूक होतं किंवा एकदम दाट होतं. त्यातूनही स्पॉट्स येण्याची शक्यता असते.
एंडोमेट्रियम बदल फारच असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं जरूरीचं. कारण ही वाढ कॅन्सरकडे वाटचाल करणारी ठरू शकते. हिस्टरोस्कोपीमुळं गर्भाशयाचं श्‍लेष्मिक अस्तर जर जरूरीपेक्षा जास्त दाट झालं असेल तर खरडून काढलं जातं. अर्थात असे बदल होताहेत हे लक्षात येताच हार्मोनल थेरपी करवून घेण्यानं पुढचा धोकादायक प्रवास टाळता येऊ शकतो. एरवी तेच करण्याचं रूटिन आहे.

योनीपटल पातळ होणे 
पाळी जाण्याच्या काळात होणार्‍या हार्मोनल बदलांपैकी एक महत्त्वाचा बदल होतो तो म्हणजे इस्ट्रोजेनची पातळी खालावते. त्यामुळेच योनीपटलात (व्हजायनल वॉलम) बदल होतात. त्यातून रक्तस्राव होऊ शकतो. हार्मोनल थेरपीमुळं योनीपटलाची स्थिती पूर्ववत निरोगी होऊ शकते.

कॅन्सर
पुनरूत्पादनक्षम अवयवांना होणारा कॅन्सर रक्तस्रावाचं कारण ठरू शकतो. सर्व्हायकल कॅन्सर, एंडोमेट्रिअल कॅन्सर, योनीचा कॅन्सर अशा कारणांमुळं रक्तस्रावाचा धोका असतो. हिस्टेरेक्टोमी आणि त्यानंतर जरूरीप्रमाणे केमो व रेडिओथेरपीची सायकल्स एंडोमेट्रिअल, सर्व्हायकल कॅन्सर हाताळता येतात. मात्र यावेळी होणार्‍या सर्जरीत गर्भाशय आणि सर्व्हिक्स काढून टाकावे लागतात. कधी ओव्हरीज किंवा बीज वाहून नेणारी फॅलोपियन ट्यूबही काढून टाकणं भाग पडतं.

औषधोपचाराचे दुष्पपरिणाम
काहीवेळेस हार्मोनल थेरपीनंतर किंवा रक्त पातळ करणार्‍या औषधांचा परिणाम म्हणून रक्तस्राव होतो. त्यामुळं हे उपचार घेतल्यावर डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार काळजीनं वागणं आवश्यक आहे. मात्र सगळी काळजी घेऊनही रक्तस्राव चालूच असेल तर डॉक्टर्स औषधं बदलून देऊ शकतात. त्यांना वेळेवर रिपोर्ट देणं मात्र करायला हवं.

लैंगिक संबंधांमधून होणारे आजार
क्लॅमिडिया, प्रमेह (विशिष्ट तर्‍हेचा दाह) आणि नागिणीसारखा त्वचारोग लैंगिक संबंधातून पसरणारे (सेक्सच्युअली ट्रान्समिटेड डिसीज) मानले जातात. यापैकी काहीही त्रास असेल तर रक्तस्राव होण्याची शक्यता असते. या आजारांवर ताबडतोब उपचार करणं जरूरीचं असतं. सगळ्या नाजूक अवयवांची संपूर्ण स्वच्छता राखणं अतिशय गरजेचं असतं.
हे लक्षात घ्यायला हवं की रजोनिवृत्तीनंतरचा रक्तस्राव ही गोष्ट गंभीर असू शकते. योग्य डॉक्टरांकडे जाऊन, व्यवस्थित तपासण्या करून निदान होणं आणि ताबडतोब उपचार सुरू होणं गरजेचं असतं.
---

Web Title: Bleeding after menopause? This can be serious narikaa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.