Join us

कॅन्सरमुळे ऐन तारुण्यात मृत्यू होणाऱ्या महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त, ४ कारणं-जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2025 14:43 IST

Women die of cancer at a young age at a higher rate than men, 4 reasons : घरात स्वत:ला महिलाही दुय्यम मानतात, आजार झाला तरी लपवतात किंवा अनेकींना योग्य उपचारही मिळत नाहीत

कर्करोगाचे वाढते प्रमाण फार चिंताजनक आहे. कर्करोगाच्या आकडेवारीत ५०.७ %  महिला रुग्ण आहेत.(Women die of cancer at a young age at a higher rate than men, 4 reasons) महिलांमध्ये तीन पैकी एका महिलेला कर्करोग होतो अशी सरासरी आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनकच आहे.  महिला कर्करोग रूग्णांचा मृत्यूदर जास्त आहे. कर्करोगाने तरुण वयातच महिलांचा मृत्यू होतो. (Women die of cancer at a young age at a higher rate than men, 4 reasons)याची कारणे काय असू शकतात? ते जाणून घेऊया.

१.  महिलांचा मृत्यूदर जास्त असण्याचे मुख्य कारण म्हणजे माहितीचा अभाव.(Women die of cancer at a young age at a higher rate than men, 4 reasons) बऱ्याच महिलांना कॅन्सर झाल्याचे कळेपर्यंत कॅन्सरने चौथी-पाचवी स्टेज गाठली असते. मग त्यांचे उपचार करणे फार कठीण होऊन जाते. तो पर्यंत कॅन्सर पसरलेला असतो. जर महिलांना कॅन्सरची लक्षणे माहिती असतील, तर तो लवकर डीटेक्ट होऊ शकतो. लवकर कळल्यास तो पसरण्याआधी बरा करता येतो. पुरूषांपेक्षा अज्ञानाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे. असे 'द लॅन्सेट  कॅन्सर कमिशन'ने सांगितले आहे. 

२. 'स्क्रोल डॉट इन' या पेजवर 'कर्करोग सल्लागार वंदना महाजन' यांनी त्यांचे अनुभव सांगितले. त्यांनी सांगितले की, लिंगभेदामुळेही महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मुलीवर एवढा खर्च करण्यासाठी कुटुंबातील लोक तयार होत नाहीत. उपचारांच्या अभावाने मग मृत्यू होतो.  

३. बरेचदा शारीरिक त्रास फार उशीरा सुरू होतो. महिलांना दुखणं खुप जास्त झाल्याशिवाय डॉक्टरांकडे जाण्याची गरज वाटत नाही. त्या दुर्लक्ष करत राहतात. साधं दुखणं आहे वगैरे बोलून सोडून देतात. कॅन्सर असल्याचे कळल्यानंतरही पैशांचा विचार करून उपचार घेण्यासाठी उशीर करतात. त्यामुळे मग वेळ हातातून निघून जाते. महिला स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करतात.

४. भारत पितृप्रधान देश आहे. त्यामुळे घरातील स्त्री बरेचदा स्वत:च्या समस्या सांगायला घाबरते. स्वत:च्या अवयवांबद्दल नवऱ्याशी मन मोकळेपणाने त्या बोलत नाहीत. त्यामुळे ती आजार आहे, हे चेहर्‍यावर दिसून येईपर्यंत कोणालाही तिच्या दुखण्याची जाणीव होत नाही.

असेही बरेचदा घडते की, कर्करोगाचे उपचार महाग असल्याने महिला उपचार घेत नाहीत. कॅन्सर झाल्याचे कळल्यावर त्या मनाने खचतात. कॅन्सरशी लढण्यासाठी इच्छाशक्ती भरपूर मजबूत असायला हवी. प्रोसेस फार त्रासदायक असते. पूर्ण परिवार त्या दिंव्यातून जातो. अशावेळी समोर आलेल्या दुखण्याला सामोरं जाणं सोपं नाही. सतत मेडिकल चेकअप महिलांनी करून घेतले पाहिजेत. ते टाळून चालणार नाही.        

टॅग्स : कॅन्सर जनजागृतीमहिलास्तनाचा कर्करोगकर्करोग