Join us   

तरुणांचे हृदय कमकुवत होतंय? तज्ज्ञ सांगतात ६ कारणं, बघा तुमचं हार्ट धडधाकट आहे का...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 1:39 PM

What's Behind the Rise in Heart Attacks Among Young People? तरुणांनो हृदय सांभाळा! या ६ कारणांमुळे वाढते हृदयाच्या संबंधित आजाराचा धोका..

सध्या हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण लोकांमध्ये वाढत चाललं आहे. शरीराने तंदुरुस्त असलेल्या व्यक्तींना देखील हृदयविकाराचे झटके येत आहे. ज्यामुळे त्यांचा कमी वयात मृत्यू होत आहे. कोरोना या वैश्विक महामारीनंतर लोकांमध्ये हृदय विकाराचे प्रमाण वाढत चाललं आहे. ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण सध्या तरुण वयात लोकांमध्ये हृदयाच्या संबंधित आजार का उद्भवत आहे? तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू का होत आहे?

या संबंधित रीवा या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. व्ही.डी. त्रिपाठी सांगतात, ''सध्या अनेक तरुण आणि वयस्कर लोकांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने होत आहे. कोणाचा जागीच, कोणाचा रुग्णालयात नेत असताना, तर कोणाचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू होत आहे. पण अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढत चालले आहे, व कोणती मुख्य कारणे आहेत ते पाहूयात''(What's Behind the Rise in Heart Attacks Among Young People?).

ताणतणाव घेणे

जास्त ताण घेणे हे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. अलीकडच्या काळात तरुणांमध्ये तणाव वाढला आहे. आर्थिक, कौटुंबिक कारणे, कुटुंबात मृत्यू, वेळेचा अभाव किंवा इतर कारणांमुळे तणाव वाढला आहे. जे हृदयविकाराचे प्रमुख कारण आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तणावामुळे हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

थायरॉईडमुळे वजन वाढत चाललंय? प्या मसूर डाळीचे पौष्टिक सूप, बघा वजनात घट

पुरेशी झोप न घेणे

पुरेशी झोप न घेतल्यामुळे हृदयाच्या संबंधित समस्या वाढत चालली आहे. आजकाल तरुणांमध्ये मोबाईलचा वापर, जास्त ताण किंवा इतर कारणांमुळे पुरेशी झोप मिळत नाही. झोपेच्या अभावामुळे हृदयची चालना व्यवस्थित होत नाही. ज्यामुळे हृदयच्या संबंधित आजारांमध्ये वाढ होते.

योग्य आहार न घेणे

आजची तरुणाई सकस आहार घेत नाही. तरुण वर्ग सध्या फास्ट फूडच्या आहारी जात आहे. बाजारातील तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढते. यासह लट्ठपणाचीही समस्या वाढते.

तरुण जोडप्यांमध्ये वाढते आहे वंध्यत्वाची समस्या, ५ गोष्टी बाळ हवे तर लक्षात ठेवा..

अनुवांशिक कारणे

कुटुंबातील एखाद्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असेल, तर इतर सदस्यांनी अधिक काळजी घ्यावी. हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण आनुवंशिकता आहे. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबातील कोणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असेल तर, स्वतःची विशेष काळजी घ्या. चेकअप करत राहा.

३० मिनिटांत करा ४ सोपे व्यायाम, परफेक्ट फिगरचं स्वप्न होईल पूर्ण- कॅलरी बर्न झटपट

व्यायामाचा अतिरेक

सध्या रोज व्यायाम करणारे तंदुरुस्त लोकही हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत. व्यायाम आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र अतिव्यायामामुळे हृदयावर ताण पडतो, ज्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे बेसिक लेव्हलवर व्यायाम करा. जास्त तास व्यायाम करू नका.

इतर आजारांमुळेही येतो हृदयविकाराचा झटका

असे अनेक रोग आहेत ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आदी आजारांमुळेही हृदयविकाराचा झटका येतो. अति धूम्रपानामुळेही हृदयाच्या संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता निर्माण होते.

टॅग्स : हृदयविकाराचा झटकाहृदयरोगलाइफस्टाइल