Join us   

दात स्वच्छ घासले तरी पिवळेच दिसतात? चमचाभर हळदीत मिसळून लावा '१' खास तेल, दात चमकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2024 6:12 PM

How to whiten your teeth with common kitchen ingredients : दातांवर पिवळा चिकट थर, स्वच्छ दात हवे तर खास उपाय ; हळद आणि..

चमकदार दात कोणाला नाही आवडत (Teeth Whiten). पण कालांतराने दात पिवळे होतातच. दात पांढरेशुभ्र करण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो (Cleaning Tips). शिवाय नियमित दातही घासतो. पण ब्रशने दात घासूनही, दातांवरचा पिवळा थर निघत नाही. शिवाय हिरड्याही काळपट दिसतात. ब्रश केल्यानंतरही दातांचा पिवळेपणा निघत नसल्यावर, आपण शेवटचा पर्याय म्हणून डेण्टिस्टकडे जाऊन स्वच्छ करतो. पण हा पर्याय खर्चिक आहे, शिवाय पुन्हा दातांचा पिवळेपणा वाढत जातो. पण जर आपल्याला डेण्टिस्टकडे न जाता, घरच्या घरी दात स्वच्छ करायचं असेल तर. नोएडास्थित 'कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक'चे संचालक कपिल त्यागी यांनी हळदीचा सांगितलेला उपाय करून पाहा.

यासंदर्भात, तज्ज्ञ सांगतात, 'हळद हा आयुर्वेदात वापरला जाणारा मसाला आहे. त्यात कर्क्यूमिन नावाचा घटक असतो, जो दाहक-विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखला जातो. आपण याच्या वापराने दात देखील स्वच्छ करू शकता'(How to whiten your teeth with common kitchen ingredients).

दातांवर येईल चमक

हळदीमध्ये नैसर्गिक दात पांढरे करण्याचे गुणधर्म आहेत. जे अन्नपदार्थ, पेये आणि धूम्रपानामुळे होणारे डाग काढून टाकण्यास मदत करतात. याशिवाय, हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्म, हिरड्यांची सूज कमी करण्यास आणि तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म

कुंडीतल्या कडीपत्त्याची वाढ खुंटली? मातीत मिसळा तांदुळाचे खत - हिरव्यागार पानांनी बहरेल रोप

हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे तोंडात बॅक्टेरियाची वाढ रोखतात. ज्यामुळे प्लेक आणि पोकळीचा धोका कमी होतो. शिवाय इतर टूथपेस्टच्या तुलनेत दात अधिक स्वच्छ होतात.

दात स्वच्छ करण्यासाठी हळदीचा वापर कसा करावा?

- दात स्वच्छ करण्यासाठी आपण टूथपेस्टऐवजी हळदीचा वापर करू शकता.

ना लाटणे- ना तेलाचा एक थेंब, तिप्पट फुलणारे मैद्याचे पापड करण्याची सोपी कृती; टिकतील महिनाभर

- यासाठी एका वाटीत हळद पावडर, खोबरेल तेल आणि थोडं पाणी घालून मिक्स करा.

- टूथब्रश आधी पाण्याने ओला करा. हळदीच्या पेस्टमध्ये बुडवून दातांवर लावून घासा. 

- ३ ते ५ मिनिट तसेच राहूद्या. नंतर पाण्याने गुळण्या करा.

टॅग्स : स्वच्छता टिप्सहेल्थ टिप्स