सध्याच्या डिजिटल युगात ८ ते १० तास लॅपटॉपसमोर बसून काम करणं किंवा तासनतास मोबाईलमध्ये मान खाली घालून पाहणं हे रोजचे झाले आहे. पण या सवयीमुळे आपल्या शरीराचे नुकसान होते. जेव्हा आपण सतत पुढे झुकून काम करतो, तेव्हा आपले खांदे हळूहळू पुढच्या बाजूला वळू लागतात.(Improve posture) ज्यामुळे पाठीच्या वरच्या मणक्याला एक प्रकारचा बाक येतो. या स्थितीला हंचबॅक किंवा टेक्स्ट नेक असं म्हटलं जातं. या समस्येमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. (Body posture correction) झुकलेल्या खांद्यांमुळे छातीचे स्नायू आखडले जातात, ज्यामुळे श्वसन प्रक्रियेत अडथळा येतो आणि शरीराला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो.(Rounded shoulders fix) ज्यामुळे काम करताना थकवा येणे, मान आणि पाठीत सतत कळ उठणे यांसारख्या समस्या उद्भवतात. योग्य वेळी याकडे लक्ष दिले नाही, तर मणक्यावर भार येतो, ज्यामुळे आपल्याला पाठदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. पण रोज जर आपण १५ मिनिटे व्यायाम केला तर आपली बॉडीपोश्चर सुधारण्यास मदत होईल. यासाठी व्यायाम कसा करायला हवा पाहूया.
मी अब्सेंट बाप होतो, मुले मोठी झाली पण मी.. ! राम कपूरने सांगितली खंत, बापाची अस्वस्थ गोष्ट
1. भुजंगासन हे आपल्या पाठीच्या कणाला लवचिकता देते आणि झुकलेले खांदे मागे खेचण्यास मदत करते. हे आसन करताना पोटावर झोपा, हाताचे तळवे छातीजवळ ठेवा आणि हळूहळू शरीराचा पुढचा भाग वर उचलून आकाशाकडे पाहा. यामुळे छातीचे स्नायू विस्तारतात आणि पाठीचा बाक कमी होतो.
2. कॅट काऊ स्ट्रेच हे मणक्याच्या हालचालीसाठी सगळ्यात चांगले आसन आहे. यासाठी आपल्याला गुडघ्यांवर आणि हातांवर उभे राहा. श्वास घेताना पाठ खाली वाकवा आणि डोके वर करा, श्वास सोडताना पाठ वर उचला आणि हनुवटी छातीला लावा. यामुळे पाठीतील जडपणा दूर होतो.
3. ऑफिसमध्ये किंवा घरी कधीही करता येणारा हा सोपा व्यायाम चेस्ट ओपनर ऑन वॉल. हा व्यायाम करताना भिंतीच्या कोपऱ्यात उभे राहा. एक हात भिंतीवर सरळ ठेवा आणि शरीर विरुद्ध दिशेला फिरवा. या स्ट्रेचिंगमुळे स्नायू मोकळे होण्यास मदत होते.
4. खांद्यांच्या मागच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी डब्ल्यू. आणि वाय स्ट्रेच करा. यासाठी भिंतीला पाठ लावून उभे राहा. हात वर करून इंग्रजी 'Y' आकार करा, नंतर कोपर खाली खेचून 'W' आकार करा. हे करताना खांद्याची हाडे जोडली जातील. यामुळे खांद्यांचा आकार सुधारतो.
Web Summary : Prolonged sitting causes hunched shoulders and back pain. Simple exercises like Bhujangasana, Cat-Cow stretch, chest openers, and W-Y stretches can improve posture and alleviate discomfort with just 15 minutes daily.
Web Summary : लंबे समय तक बैठने से कंधे झुक जाते हैं और पीठ में दर्द होता है। भुजंगासन, कैट-काउ स्ट्रेच, चेस्ट ओपनर और डब्ल्यू-वाई स्ट्रेच जैसे सरल व्यायाम आसन को बेहतर बना सकते हैं और रोजाना सिर्फ 15 मिनट में असुविधा को कम कर सकते हैं।