आई-वडील होण्याची प्रचंड इच्छा असूनही अपयशी ठरणार्या जोडप्यांसाठी IVF हे एक वरदानच आहे. अर्थात अजूनही ही ट्रिटमेंट करण्यासाठी लोक पटकन तयार होत नाहीत. मात्र या ट्रिटमेंटचे महत्व आणि इतरही माहिती देण्याचे काम अनेक तज्ज्ञ करत आहेत. फक्त महिलेचे शरीर सशक्त असून चालत नाही. (There is nothing wrong with undergoing IVF treatment, it is a blessing, Change your mindset, special advice from experts, mental health )त्यासाठी जोडप्याची मानसिकताही फार गरजेची असते. त्यामुळे जोडप्यांशी संवाद साधणाचे काम तज्ज्ञ करतात. मानसोपचार तज्ज्ञ, IVF स्पेशालिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ असे सगळेच या ट्रिटमेंट बद्दल योग्य माहिती देऊन जोडप्याला योग्य मार्गदर्शन करतात. असेच काम सध्या इंदिरा IVF सेंटर पुणे येथे कार्यरत असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भाग्यश्री पाटील करत आहेत. त्यांनी लोकमत सखीशी संवाद साधताना फार मोलाची माहिती सांगितली.
IVF ची गरज असणे म्हणजे आपल्यातच दोष आहे, असा समज अनेकांचा असतो. त्याचा वेगळा मानसिक त्रास स्त्री-पुरुष दोघांनाही होतो. मुळात असे वाटून घेण्याचे काही कारण नसले तरी ते वाटणे सहाजिकच आहे. सतत तसेच वाटून घेऊन स्वतःला कोसण्यापेक्षा विश्वासातल्या तज्ज्ञकडे जाऊन एकदा सल्लामसलत करा. त्याचा नक्कीच फायदा होतो. डॉ. भाग्यश्री सांगतात, महिलांच्या अंडाशयातील अंडी ही बँक बॅलेंससारखी असतात. एकदा तयार होतात आणि मग कमी कमी होत जातात. एका ठराविक वयानंतर ती तयार होत नाहीत. त्यामुळे वय जास्त असलेल्या मुलींना गर्भधारणा पटकन होत नाही. शिक्षण, नोकरी बाकी आयुष्यामुळे उशीला आई होण्याचा विचार करणाऱ्या अनेक महिला असतात. आजकाल अशा महिलांसाठी विज्ञानाने फार चांगला मार्ग दिला आहे, तो म्हणजे एग्जफ्रिजिंग. वेळीच अंडी साठवून ठेवता येतात. नंतर जेव्हा तुम्ही आई व्हायला तयार होता तेव्हा ही अंडी पुन्हा तुमच्या शरीरात घालता येतात. हा पर्याय महिलांसाठी नक्कीच फायद्याचा आहे.
महिलांना गर्भधारणा होत नसेल तर त्यामागे अनेक कारणे असतात. शेवटी हा निसर्ग आहे. यात कोणाची काही चूक नाही. मात्र जर आपल्या काही सवयींमुळे शरीराची हानी होत असेल तर त्या सवयी सोडण्याचा सल्ला आम्ही देतो असेही तज्ज्ञ म्हणाल्या. जसे की जीवनशैली बदलणे, आहार बदलणे मुख्य म्हणजे व्यसन सोडणे. व्यसनांमुळे गर्भधारणेत फार अडथळे येतात. स्त्री-पुरुष दोघांनीही हे लक्षात ठेवायला हवे. थायरॉईड, PCOD, PCOS या त्रासांचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळेही गर्भधारणेत अडथळे येतात. या विषयी जोडप्यांनी तज्ज्ञांशी मनमोकळेपणने बोलणे फार गरजेचे आहे.