फर्टिलिटीचा प्रश्न आजकाल अनेक जोडप्यांना छळतात. इच्छा आहे पण मूल न होणे, गर्भधारणेत अडचण, वारंवार गर्भपात अशा समस्या छळतात. त्यानंतर अनेकजण वैद्यकीय सल्ल्याने आयव्हीएफचा निर्णय घेतात. ( World IVF Day 2025) IVF ट्रिटमेंटद्वारे पालकत्व मिळवता येते. मात्र गर्भधारणेत येणाऱ्या अडचणींसह एका महत्वाच्या मुद्द्यावरही सनशाईन फर्टीलिटी ॲण्ड आयव्हीएफ सेंटरच्या मेडीकल डायरेक्टर डॉ. अमिती अग्रवाल यांनी लोकमत सखीशी संवाद साधला आहे.
डॉ. अमिती अग्रवाल सांगतात, जीवनसत्व डीची महिलांमध्ये असणारी कमतरता आणि गर्भधारणा यांचा संबंध. फार सामान्य गोष्टी असतात ज्या आपण दुर्लक्षित करतो. मात्र त्यांचा परिणाम वाईट असू शकतो. PCOS सारखे त्रास असणाऱ्या महिलांमध्ये व्हिटामिन डी ची कमतरता असणे अगदीच सामान्य आहे. (Health and Fertility, What is the relationship between vitamin D and pregnancy? IVF experts say, what is important to do for the baby)मासिक पाळीचे संतुलन राखण्यासाठीही जीवनसत्त्व 'डी' गरजेचे असते. शरीरातील हे सत्व कमी झाल्यामुळे सगळ्याच प्रक्रिया कमकुवत होतात. त्यामुळे गर्भधारणेसाठीही त्रास होतो. व्हिटामिन डी कमी असल्यामुळे गर्भाशयाची अंतर्गत रचना योग्य होत नाही.
जीवनसत्त्व डी कमी असल्यामुळे गर्भपात, बाळाचे वजन फारच कमी, प्रीक्लॅम्पसिया (BPचा त्रास) असे त्रासही होतात. फक्त महिलाच नाही तर पुरुषांमध्येही जीवनसत्त्व 'डी' कमी असल्यास स्पर्म आणि टेस्टोस्टेरोन यावर परिणाम होतो. त्यामुळेही गर्भधारणेत अडथळा येतो.
ही समस्या असतानाही IVF यशस्वी होऊ शकते. मात्र योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे. IVF चा सक्सेस रेट आधी १५ ते २० टक्के होता. मात्र सध्या तोच जवळपास ६० ते ६५ टक्के आहे. मात्र शरीरातील जीवनसत्त्वांची पातळी योग्य राहण्यासाठी योग्य आहार, उपचार करायला हवे.गर्भधारणेवेळी ही कमतरता फार त्रासदायक ठरते. तसे होऊ नये म्हणूनही काळजी घ्यायला हवी.