>आरोग्य >वयात येताना > ब्रेसियर वापरण्याचे आरोग्यविषयक फायदे कोणते? ब्रा वापरण्यासंदर्भात शास्त्रीय माहिती काय सांगते..

ब्रेसियर वापरण्याचे आरोग्यविषयक फायदे कोणते? ब्रा वापरण्यासंदर्भात शास्त्रीय माहिती काय सांगते..

हेमांगी कवीच्या ब्राई-बुब्ज आणि ब्रा या पोस्टनंतर समाजमाध्यमात ब्रा वापरण्यासंदर्भात बरीच उलटसुलट चर्चा झाली, मात्र ब्रेसियर वापरण्यामागचं शास्त्रीय सत्य काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 01:10 PM2021-07-15T13:10:54+5:302021-07-15T13:49:20+5:30

हेमांगी कवीच्या ब्राई-बुब्ज आणि ब्रा या पोस्टनंतर समाजमाध्यमात ब्रा वापरण्यासंदर्भात बरीच उलटसुलट चर्चा झाली, मात्र ब्रेसियर वापरण्यामागचं शास्त्रीय सत्य काय?

What are the health benefits of wearing a bra? what is the advantages for health? | ब्रेसियर वापरण्याचे आरोग्यविषयक फायदे कोणते? ब्रा वापरण्यासंदर्भात शास्त्रीय माहिती काय सांगते..

ब्रेसियर वापरण्याचे आरोग्यविषयक फायदे कोणते? ब्रा वापरण्यासंदर्भात शास्त्रीय माहिती काय सांगते..

Next
Highlightsआपल्या सगळ्यांनाच घरी आल्यावर घरचे कपडे घालून खूप छान आणि सुटसुटीत वाटतं म्हणून तेच कपडे घालून आपण बाहेर तर नाही ना जात?

डॉ. शिल्पा चिटणीस जोशी

सोशल मीडियात ब्रा या विषयावर परवापासून उडालेल्या धुराळ्यामुळे बऱ्याच जणी ब्रेसीयरच्या वापराबाबत बुचकळ्यात पडल्या आहेत. त्यांच्या शंका दूर करण्यासाठी हा लेखप्रपंच.
ब्रेसीयर वापरण्याचे फायदे..

१.स्तन हा मेद पेशींनी बनलेला अवयव आहे.त्यात आधार देणाऱ्या काही लिगमेंट्स असतात पण त्या खूप बळकट नसतात. विशेष करून एकदा स्तनाचा आकार वाढला की बाहेरून वेगळा आधार गरजेचा असतो. गरोदरपणात व स्तनपान चालू असताना हा आधार न मिळाल्यास स्तन ओघळू शकतात . आणि एकदा ओघळले की त्यानंतर प्लास्टिक सर्जरी शिवाय दुसरा उपाय करता येत नाही.
२.स्तनांना नीट आधार न मिळाल्यास स्तनदुखी सुरू होते. ही स्त्रियांमध्ये नेहेमीच आढळणारी समस्या आहे. यामध्ये योग्य मापाची ब्रा वापरणे आवश्यक आहे.
खेळाडू स्त्रियांनी स्पोर्ट्स ब्रा वापरणे हितकारक आहे.
ब्रेसीयर च्या वापरामुळे स्त्रीचे पोस्चर म्हणजे उभे राहणे आणि बसणे याची पद्धत सुधारते. पाठीचा कणा सरळ राहण्यास मदत होते आणि त्यामुळे पाठीची आणि मानेची दुखणी कमी होऊ शकतात.

 

३.ब्रेसियरची निवड
९५% भारतीय स्त्रिया चुकीची ब्रा वापरतात असं लक्षात आले आहे. साधारणपणे कुठलाही विचार न करता अंदाजाने साईझ ठरवून मिळेल ती ब्रेसियर विकत घेण्याचा स्त्रियांचा कल आहे. हे स्तनाच्या आरोग्याच्या दृष्टीने सुध्दा चुकीचे आहे. ब्रा निवडण्यासाठी तीन साधे नियम आहेत.
१)कप साईझ निवडताना कप मोकळाही राहू नये तसेच ब्रेस्ट कोंबून बसवली जाऊ नये. कप साईझ A, B, C, D, E ट्रायल करून घ्यावेत.
२) ब्राचे खांद्यावरचे पट्टे त्वचेत रुतु नयेत तसेच निसटून येतील इतके सैलही नसावेत.
३)ब्राचे ३०, ३२, ३४ हे साईझेस ब्रेस्टच्या खालच्या भागाचे असतात. त्याचीपण व्यवस्थित ट्रायल घ्यावी. स्त्रीला श्वास व्यवस्थित घेता यायला हवा व कुठलेही वळ छातीवर पडू नयेत.
ब्रेसीयर चं मुख्य काम ब्रेस्ट ना योग्य तोआधार देणं हे असतं. काही जणी हेच विसरतात आणि खूप सैल ब्रा घालतात.ब्रेस्ट चा आकार सुदौल दिसावा यासाठी ब्रा चे पट्टे ऍडजस्ट करणं गरजेचं आहे.
४.मानवी शरीरात अनेक आकार प्रकार असतात.प्रत्येक स्त्रीला सुदौल स्तन असतीलच असं नाही.अशा वेळी ब्रेसीयर मुळे स्तनाचा आकार आणि उभार चांगला दिसल्यामुळे स्त्रीला नक्कीच आत्मविश्वास निर्माण होतो हे नाकारता येणार नाही.
५.ब्रेसीयर रात्री झोपताना नक्कीच काढून ठेवावी.तसेच सैल झालेल्या ब्रेसीयर वेळेवर बदलणे पण आवश्यक आहे.
६.दिवसा ब्रेसीयर वापरताना जर आवळल्याचा फील येत असेल आणि खूप अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुमचा ब्रा साईझ चुकला आहे असं समजायला हरकत नाही.
७.ब्रेसीयर मुळे काही जणींना त्रास होत असेल तर ब्रा ची निवड योग्य रीतीने करणे किंवा त्याही पेक्षा महत्वाचे स्तन संबंधी काही समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जाणे उत्तम.
अजून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वजनावर नियंत्रण असेल तर स्तनाच्या समस्या कमी होतात .लठ्ठपणामुळे बोजड झालेल्या स्तनांना ब्रा चा आधार अत्यंत गरजेचा असतो.
८.आपल्या सगळ्यांनाच घरी आल्यावर घरचे कपडे घालून खूप छान आणि सुटसुटीत वाटतं म्हणून तेच कपडे घालून आपण बाहेर तर नाही ना जात? काही गोष्टी समाजात वापरताना स्त्री आणि पुरुष दोघांनाही पाळाव्यात लागतात. उद्या पुरुष शर्टाची सगळी बटणं उघडी टाकून किंवा बरं वाटतंय म्हणून छोट्या शॉर्टस घालून हिंडायला लागले तर चालेल का ? स्त्री काय किंवा पुरुष काय समजुतीने वागण्यातच शहाणपणा आहे असं वाटतं मला..तुम्हाला काय वाटतं?


(लेखिका पुणेस्थित स्त्री रोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: What are the health benefits of wearing a bra? what is the advantages for health?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

रात्री एकांतात तरूण मुली गुगलवर काय सर्च करतात? तरुण मुलींना इंटरनेटवर बघायला आवडतात ४ गोष्टी... - Marathi News | Young ladies/ women searches these 4 things on google privately at night | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री एकांतात तरूण मुली गुगलवर काय सर्च करतात? तरुण मुलींना इंटरनेटवर बघायला आवडतात ४ गोष्टी...

Google search: गुगलने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला असून त्यामध्ये तरूण मुलींना इंटरनेटवर (internet) काय सर्च करायला  आवडतं हे सांगितलं आहे...  ...

चाळिशीनंतर अचानक का सुटतं महिलांचं पोट? तज्ज्ञ सांगतात २ कारणं.. - Marathi News | Why belly fat increases after the age of 40 in women? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चाळिशीनंतर अचानक का सुटतं महिलांचं पोट? तज्ज्ञ सांगतात २ कारणं..

Fitness tips: व्यायाम, डाएट या सगळ्या गोष्टी नियमितपणे सुरू असतात. पण तरीही अनेक जणींनी तिशी- पस्तिशी ओलांडली की त्याचं पोट सुटू लागतं (Belly fat).. असं का होतं? ...

सायना सिंधुला जमलं नाही, ते 16 वर्षांच्या तसनीम मीरने करुन दाखवलं.. पाहा नंबर वन कमाल   - Marathi News | Saina Sindhu didn't get along, 16 year old Tasneem Mir did it .. see number one max | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सायना सिंधुला जमलं नाही, ते 16 वर्षांच्या तसनीम मीरने करुन दाखवलं.. पाहा नंबर वन कमाल  

आज महिला बॅडमिंटन म्हटलं , की सायना, सिंधू यांची नावं आधी घेतली जातात. पण सायना, सिंधूलाही 19 वर्षांखालील वयोगटात खेळताना जे जमलं नाही ते तसनीम हिने करुन दाखवलं आहे. 19 वर्षांखालील जागतिक बॅडमिंटन खेळाडुंच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी तसनीम ही भ ...

Cervical cancer : गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत देतात बायकांमध्ये जाणवणारी 'ही' लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय - Marathi News | Cervical cancer : Don’t ignore these symptoms of cervical cancer and Basic Information About Cervical Cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरचे संकेत देतात साधी वाटणारी 'ही' लक्षणं; त्रासदायक आजार टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा

Cervical Cancer : अनेकजणी सामान्य आजार अंगावर काढत, लक्षणं लपवतात आणि जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढतो. ...

केरळातले गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय - Marathi News | Kerala's - kumbalangi become-India’s-first-sanitary-napkin-free-village, Menstrual cup use is new option. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केरळातले गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

सॅनिटरी नॅपकिन वापरणं कापडापेक्षा सुखकर असलं तरी वापरानंतर विल्हेवाट लावणं हा अजून एक प्रश्न आहे, त्यावर उपाय शोधत मेन्स्ट्रुअल कपचा वापर करण्याची योजना या गावात राबवण्यात आली. (kerala's-kumbalangi become-India’s-first-sanitary-napkin-free-village) ...

तामिळनाडू सरकार देणार नोकरीतून ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना ‘सेकंड करिअर संधी'! मात्र... - Marathi News | ‘Second Career!’ women who have taken a break from jobs, Tamil Nadu government new policy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तामिळनाडू सरकार देणार नोकरीतून ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना ‘सेकंड करिअर संधी'! मात्र...

नोकरीतून ब्रेक घेतला की पुन्हा काम सुरु करताना अनेकींना अडचणी येतात, दुसऱ्या संधीसाठी झगडावं लागतं असं का? ...