Lokmat Sakhi >Health >Adolescence > टीनएज प्रेगन्सी घातकच, पण समजा घसरलाच पाय तर..

टीनएज प्रेगन्सी घातकच, पण समजा घसरलाच पाय तर..

किशोर वयातील गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मूत्रपिंडावर (किडनी) ताण येऊन काहीवेळा परिस्थिती जीवघेणी बनू शकते. उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह आणि इतर दीर्घकालीन आजार मागे लागण्याचीही शक्यता असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 03:54 PM2021-04-13T15:54:31+5:302021-04-13T16:30:21+5:30

किशोर वयातील गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मूत्रपिंडावर (किडनी) ताण येऊन काहीवेळा परिस्थिती जीवघेणी बनू शकते. उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह आणि इतर दीर्घकालीन आजार मागे लागण्याचीही शक्यता असते.

Teenage pregnancy is dangerous for mother and baby ... it is better to avoid it ... but what to do if it happens? ? | टीनएज प्रेगन्सी घातकच, पण समजा घसरलाच पाय तर..

टीनएज प्रेगन्सी घातकच, पण समजा घसरलाच पाय तर..

Highlightsएखादी मुलगी किशोर वयात गरोदर राहिली तर सगळ्यात पहिली आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तिला योग्य ते वैद्यकीय उपचार मिळायला हवेत.लहान वयात गरोदरपण आलं तर बाळ वेळेआधीच (प्रीमॅचुअर) जन्माला येणं किंवा कुपोषित बाळाचा जन्म होणंही शक्य असतं.किशोर वयातील गरोदरपण टाळता येऊ शकतं. ते टाळण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे लहान वयात शारीरिक संबंध टाळले पाहिजेत.

एखादी मुलगी जर वय वर्ष २० च्या आधी गरोदर राहिली तर त्याला टीनएज प्रेग्नन्सी म्हटलं जातं. टीनएज प्रेगनन्सी बाळ आणि आई दोघांच्या दृष्टीनं योग्य नसते. त्याचप्रमाणे किशोर वयात लैंगिक संबंध ठेवणंही योग्य नाही. पण जर मुलगी  गरोदर राहिलीच तर किशोर वयातील आईवर आणि बाळावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे समजून घेतलं पाहिजे.

किशोर वयातील गरोदरपणाचे परिणाम :
किशोर वयातील गरोदरपणात उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मूत्रपिंडावर (किडनी) ताण येऊन काहीवेळा परिस्थिती जीवघेणी बनू शकते. उच्च रक्तदाबाबरोबरच मधुमेह आणि इतर दीर्घकालीन आजार मागे लागण्याचीही शक्यता असते.
लहान वयात गरोदरपण आलं तर बाळ वेळेआधीच (प्रीमॅचुअर) जन्माला येणं किंवा कुपोषित बाळाचा जन्म होणंही शक्य असतं. याचा परिणाम म्हणजे बाळाच्या शरीराची/ अवयवांची अपुरी वाढ होते. ३७ आठवड्यांआधी जर बाळाचा जन्म झाला तर अपूर्ण वाढ झालेलं बाळ जन्माला येण्याची शक्यता दाट असते. यातल्या काही समस्या जन्मानंतरही तयार होऊ शकतात आणि आयुष्यभर टिकून राहू शकतात. आयुष्यभरासाठी आजार बाळाच्या मागे लागू शकतात. मेंदू आणि हृदयावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. श्वास घ्यायला, स्तनपान करायला त्रास होणं, कॉग्नेटिव्ह म्हणजे आकलनाशी निगडित कौशल्यं विकसित न होणं अशाही समस्या उद्भवू शकतात. बाळ बाळंतपणात दगावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
किशोर वयातील गरोदरपणात मुलींना काहीवेळा मानसिक ताणतणावांना सामोरं जावं लागू शकतं. कुटुंबीय आणि मित्रपरिवारासमोर जायची लाज वाटू शकते. ज्यामधून नैराश्य येऊ शकतं आणि या सगळ्याचा बाळाच्या वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

किशोर वयातील गरोदरपणात काय आणि कशी काळजी घेतली पाहिजे?
एखादी मुलगी किशोर वयात गरोदर राहिली तर सगळ्यात पहिली आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तिला योग्य ते वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. स्त्रीरोगतज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे. या काळात कशी काळजी घ्यायची, काय खायचं, काय टाळायचं या गोष्टी स्त्री रोगतज्ञ व्यवस्थित समजावून देऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागलं पाहिजे म्हणजे मग गरोदरपण आणि बाळंतपण दोन्ही सुखकर होऊ शकतं.
खालील पैकी कुठलीही लक्षणं दिसली तर ताबडतोब क्टरशी संपर्क करून उपचार घेतले पाहिजेत.
१) योनीमार्गातून रक्तस्त्राव
२) योनीमार्गातून द्रव स्त्राव
३) सतत उलट्या होणं
४) ओटी पोटात दुखणं
५) अंधुक दिसणं
६) तीव्र डोकेदुखी
७) थंडी ताप
८) शुच्या जागेपाशी जळजळ किंवा वेदना
९) पायांवर सूज
 किशोर वयातील गरोदरपण टाळता येऊ शकतं. ते टाळण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे लहान वयात शारीरिक संबंध टाळले पाहिजेत. याशिवाय लैंगिक शिक्षण आणि गर्भ निरोधकं वापरूनही गरोदरपण टाळता येऊ शकतं. त्यातूनही जर किशोर वयात गरोदरपण आलंच तर ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती काळजी घेतलीपाहिजे.

तज्ज्ञ मार्गदर्शक : डॉ. सुप्रिया अरवारी
(एमडी डिजिओ)

Web Title: Teenage pregnancy is dangerous for mother and baby ... it is better to avoid it ... but what to do if it happens? ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.