lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Adolescence > पिअर प्रेशरचे टीनएजर बळी, वाचा वयात येताना ही दोस्ती काय काय करु शकते..

पिअर प्रेशरचे टीनएजर बळी, वाचा वयात येताना ही दोस्ती काय काय करु शकते..

आपण आपले मित्रमैत्रिणी काळजीपूर्वक निवडले पाहिजेत. कारण जसा आपला आपल्या मित्रमैत्रिणींवर प्रभाव असतो तसाच त्यांचाही आपल्यावर असतोच. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 03:20 PM2021-04-19T15:20:56+5:302021-04-19T15:44:43+5:30

आपण आपले मित्रमैत्रिणी काळजीपूर्वक निवडले पाहिजेत. कारण जसा आपला आपल्या मित्रमैत्रिणींवर प्रभाव असतो तसाच त्यांचाही आपल्यावर असतोच. 

Teenage friendships have peer pressure. But how to recognize the good and the bad? | पिअर प्रेशरचे टीनएजर बळी, वाचा वयात येताना ही दोस्ती काय काय करु शकते..

पिअर प्रेशरचे टीनएजर बळी, वाचा वयात येताना ही दोस्ती काय काय करु शकते..

Highlightsजर तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत असतील, त्यासाठी प्रेशराइज करत असतील तर याचा अर्थ एकच होतो, बॅड कंपनी.चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडणारे मित्र मैत्रिणी तातडीने बदलायला हवेत. या वयात आपल्यावर चटकन प्रभाव पडतो. त्यामुळे आपले मित्र मैत्रिणी निवडताना चुकीच्या प्रभावाखाली आपण निवडत नाहीयोतना हे बघितलंच पाहिजे.

टीनेजमध्ये आपल्याला खूप मित्रमैत्रिणी असावेत, आपला मोठ्ठा ग्रुप असावा असं सगळ्यांनाच वाटतं. तुम्हालाही ते वाटतच असेल. सोशल मीडियामुळे तर फ्रेंड सर्कल वाढवत नेणं सहज शक्यही आहे. पण आपण आपले मित्रमैत्रिणी काळजीपूर्वक निवडले पाहिजेत. कारण जसा आपला आपल्या मित्रमैत्रिणींवर प्रभाव असतो तसाच त्यांचाही आपल्यावर असतोच. वयात आल्यानंतर खऱ्या अर्थानं तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आकार यायला लागतो. अनेक गोष्टी नव्यानं समजत असतात, जाणवायला लागलेल्या असतात, आवडी निवडी तयार होत असतात. कुतूहल वाढलेलं असतं. करून बघावं, धोका पत्करावा, त्यात काय एवढं? असं सगळं वाटण्याचा हा काळ असतो.
म्हणूनच तुम्ही जे काही निर्णय घ्याल, जे काही निवडाल ते विचारपूर्वक निवडलं पाहिजे. निर्णय घेताना त्या गोष्टीची पुरेशी माहिती तुमच्याकडे असायला हवी. अर्धवट माहितीवर, ऐकीव माहितीवर किंवा इतर कुणीतरी सांगतंय म्हणून केलेल्या गोष्टी अंगाशी येण्याची शक्यता असतेच. तुम्ही तुमचा वेळ कुणाबरोबर घालवणार आहात याचाही नीट विचार केला पाहिजे.

मित्रपरिवार आणि समवयीन समुह

वर म्हटल्याप्रमाणे आपल्या मित्रपरिवाराचा आपल्यावर चांगला वाईट परिणाम होत असतो. प्रभाव चांगला असो की वाईट ‘पिअर प्रेशर’ असतंच. तुमचे मित्रमैत्रिणी कसे आहेत यावर प्रेशरचा चांगला उपयोग होईल की वाईट हे ठरतं. जर तुमचे मित्रमैत्रिणी तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडत असतील, त्यासाठी प्रेशराइज करत असतील तर याचा अर्थ एकच होतो, बॅड कंपनी. चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडणारे मित्र मैत्रिणी तातडीने बदलायला हवेत.

मैत्र जीवांचे

चांगल्या मैत्रीची काही उदाहरणं बघूया!

१) व्यायाम करायला  प्रोत्साहन देणारे.  

२) तुम्हाला आधार देऊन अभ्यासात मदत करणारे आणि अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे असं मानणारे.

३) सकस आणि समतोल आहार घ्यायला प्रोत्साहित करणारे.

४) समाजात वावरताना आपली जबाबदारी ओळखणारे आणि त्याविषयी जागरूक असणारे.

वाईट मैत्री

१) एकदा घेऊन बघ, काही होत नाही असं म्हणत, तंबाखू, दारू ड्रग्स घेण्यासाठी प्रेशर आणणारे.

२) अफेअर्स केलीच पाहिजेत, रोमँटिक रिलेशनशिप असलीच पाहिजेत असं म्हणत तुम्हाला बळजबरी डेटिंग करायला भाग पडणारे.

३) काही मित्रमैत्रिणींना इतरांवर शॉपिंगसंदर्भात दबाव आणण्याची सवय असते. हा ब्रँड असलाच पाहिजे, तो ब्रँड नाही म्हणजे डाऊन मार्केट वगैरे गप्पा मारत नकळत महागड्या शॉपिंगसाठी भाग पडणारे आणि चुकीच्या मनोरंजनासाठी भरीस पाडणारे.

आपली कुणाशीही मैत्री तेव्हाच होते जेव्हा, आपली त्या व्यक्तीशी नाळ जुळते. एकमेकांबरोबर एक सोयीची आणि समाधानाची भावना  तयार होते. विश्वास निर्माण होतो. गप्पा मारायला छान वाटतं तेव्हा चटकन मैत्री होते. अनेकदा मैत्री होते कारण आपले विचार सारखे असतात, आवडी निवडी सारख्या असतात.  मग मैत्र जुळतं. पण जेव्हा अशा मैत्रीत तुम्हाला तुमच्या सुरक्षित कोषातून खेचून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होतात. ज्या तुमच्या मनाला पटत नाहीयेत त्या तुम्हाला करायला भाग पाडलं जातं, त्यासाठी तुमच्यावर प्रेशर टाकलं जातं अशावेळी मात्र तुम्ही त्या मैत्रीचा पुर्नविचार केला पाहिजे. अशी मैत्री काही कामाची नसते जिथे एकमेकांच्या आवडी निवडीचा आदर केला जात नाही.
या वयात आपल्यावर चटकन प्रभाव पडतो. त्यामुळे आपले मित्र मैत्रिणी निवडताना चुकीच्या प्रभावाखाली आपण निवडत नाहीना हे बघितलंच पाहिजे.

तज्ञ मार्गदर्शक : डॉ. सुप्रिया आरवारी

(एमडी डिजिओ)

Web Title: Teenage friendships have peer pressure. But how to recognize the good and the bad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.