Lokmat Sakhi >Gardening > रोज कुंडीतल्या रोपांना ‘या’वेळी घाला पाणी, रोपं राहतील हिरवीगार-उन्हाळ्यात सुकणार नाहीत

रोज कुंडीतल्या रोपांना ‘या’वेळी घाला पाणी, रोपं राहतील हिरवीगार-उन्हाळ्यात सुकणार नाहीत

how to water plants in summer: summer gardening tips at home: balcony gardening in hot weather: अनेकदा आपण रोपटी सावलीत ठेवतो ज्यामुळे त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी किंवा सूर्यप्रकाश मिळाले नाही तर रोप सुकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 16:18 IST2025-05-06T16:17:34+5:302025-05-06T16:18:28+5:30

how to water plants in summer: summer gardening tips at home: balcony gardening in hot weather: अनेकदा आपण रोपटी सावलीत ठेवतो ज्यामुळे त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी किंवा सूर्यप्रकाश मिळाले नाही तर रोप सुकते.

which is right to water plant in summer season how to grow plant at balcony home know the gardening tips | रोज कुंडीतल्या रोपांना ‘या’वेळी घाला पाणी, रोपं राहतील हिरवीगार-उन्हाळ्यात सुकणार नाहीत

रोज कुंडीतल्या रोपांना ‘या’वेळी घाला पाणी, रोपं राहतील हिरवीगार-उन्हाळ्यात सुकणार नाहीत

उन्हाळ्यात आपल्याला झाडाची योग्य काळजी घ्यावी लागते. कडक उन्हामुळे झाडांवर परिणाम होतो.(how to water plants in summer) उन्हाळ्यात आपण अनेक रोप लावतो. यामध्ये तुळशी, मोगरा, कढीपत्ता, लिंबू, कोथिंबीर, टोमॅटो सारखी रोपटी लावली जातात.(summer gardening tips at home) या काळात झाडांना पालवी फुटते.(balcony gardening in hot weather) 
आपल्या पैकी अनेकांना घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत झाडे लावण्याची आवड असते.(best time to water plants in summer) काहीच नाही तर निदान रोजच्या वापरातील फळभाज्या किंवा सुगंधित फुलाचे झाड तरी आपल्या बाल्कनीत असायला हवे.(grow plants on balcony in summer) अनेकदा आपण रोपटी सावलीत ठेवतो ज्यामुळे त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी किंवा सूर्यप्रकाश मिळाले नाही तर रोप सुकते. झाडाला चुकीच्या वेळी पाणी दिल्याने ते सुकते. झाडाला दिवसांतून किती वेळा पाणी द्यायला हवे. सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी? झाडाची योग्य काळजी कशी घ्यावी? जाणून घेऊया. 

लालचुटूक टोमॅटोने बहरुन जाईल रोप! कुंडीत ३ खतं घाला- कुंडीतल्या रोपालाही येतील भरपूर टोमॅटो

झाडांना दुपारी किंवा सूर्यास्तानंतर पाणी दिले तर झाडांची पाने आणि मुळे जळू शकतात. यामुळे झाडाचे नुकसान होते. सूर्यास्तानंतर लगेच झाडांना पाणी देऊ नका.  झाडाची मुळे, माती आणि पाने थंड होण्यासाठी वेळ द्या. रोपांना पाणी देण्याची सगळ्यात चांगली वेळ सूर्योदयापूर्वीच आहे. या काळात माती थंड असते. 

सकाळी पाणी दिल्याने झाडांना दिवसभर उष्णता आणि सूर्यप्रकाश सहन करण्यासाठी चांगले आर्द्रता मिळते. सूर्योदयापूर्वी वनस्पतींना पाणी शोषण्यासाठीही चांगला वेळ मिळतो. सूर्यप्रकाशात माती गरम होते, त्यामुळे यावेळी झाडांना पाणी घातल्यास मुळांवर परिणाम होतो. 

">

कोणत्याही झाडांना पाणी देण्यापूर्वी त्याची योग्य माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे. काही रोपांना पाणी जास्त लागते तर काहींना कमी. रोपाला पाणी घालण्यापूर्वी त्याची माती तपासूण पाहा. पाणी घालताना ते खूप जास्त घालू नका. अनेकदा आपण १ ते २ बाटली झाडांना पाणी घालतो. ज्यामुळे पाणी कुंडीत तंबून राहाते.सूर्यप्रकाशामुळे पाणी गरम होऊन हळूहळू माती विरघळते. ज्याचा मूळांवर परिणाम होतो. त्यामुळे झाडांना पाणी घालण्याची योग्य वेळ ही सकाळची असते. 

 

Web Title: which is right to water plant in summer season how to grow plant at balcony home know the gardening tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.