Join us

घराच्या भिंतीत किंवा पाईपवर पिंपळाचं रोप उगवलंय? १ भन्नाट ट्रिक - त्रास होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 14:20 IST

How To Remove Peepal Plants Naturally From Roof Or Balcony Wall By Using Salt : Peepal Plant Sprouting From Your Roof Or Balcony Wall? Here’s a Natural Trick That Works Without Harmful Chemicals : How to Remove Peepal Tree from Wall : How to get rid of Peepal tree growing out of concrete in house : What is the best way to get rid of unwanted Peepal tree : वर्षानूवर्षे जगणारी ही महावृक्ष तोडून टाकणं योग्य नाहीच, पाहा खास उपाय...

आपण अनेकदा पाहतो की, आपल्या घराच्या बाहेरच्या भिंतींवर, पाईपवर पिंपळाचे छोटेसे रोप उगवलेले दिसते. आपल्या संस्कृतीत पिंपळ-वड या महावृक्षांची पूजा करण्याची (How to Remove Peepal Tree from Wall) परंपरा आहे. आपल्या इकोसिस्टिममध्येही त्यांना मोठे स्थान आहे. हे वृक्ष पूजनीयच आहेत. आपल्याकडच्या पक्षांसाठीही ही वृक्ष हक्काचा निवारा ठरतात(How To Remove Peepal Plants Naturally From Roof Or Balcony Wall By Using Salt).

त्यामुळेच पिंपळाचं झाड तोडू नये, उपटू नये, ॲसिड टाकून जाळू नयेत असं आपल्याकडे मानतात. मात्र दुसरीकडे पाइप किंवा भिंतीत ते उगवलं की घर गळण्याची, ओल येण्याची भीतीही वाटते. शहरी (What is the best way to get rid of unwanted Peepal tree) जगण्यातला हा विरोधाभासच आहे की आपण झाडं जगवत नाही, ती तोडण्याच विचार करतो. पण मग आपलं घरही गळू नये, पाइप फुटू नये म्हणून काय करता येईल?

पिंपळाच्या रोपाचं काय करायचं?

१. सगळ्यात सोपं म्हणजे ते रोप उपटून वृक्षप्रेमींना, ट्रेकिंग क्लबना देता येईल. असे आपल्याभोवती शेकडो लोक आहेत जे मोकळ्या जागी ही झाडं नेऊन लावतात, त्यांची निगा राखतात. त्यामुळे तसं करा आपलं रोज नीट कुंडीत किंवा प्लास्टिक पिशवीत काढून ते कुणाला तरी भेट द्या. 

ऐन पावसाळ्यात तुळशीला बुरशी आली, कीडही पडलं? कुंडीतल्या मातीत घाला फ्रिजमधील २ पदार्थ, बघा जादू...

घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

२. ते ही अगदीच शक्य झालं नाही तर निदान त्या झाडावर ॲसिड ओतून त्याला मारुन तरी टाकू नका. त्याऐवजी  आता १ लिटर गरम पाण्यात १ कप मीठ घालावे. आता हे सगळे मिश्रण एकत्रित हलवून त्याची थोडी जाडसर पेस्ट तयार करून घायवी. ही पेस्ट जितकी जास्त घट्ट, जाडसर असेल तितकीच ती उपयुक्त ठरेल. रोपाच्या मुळाशी ही पेस्ट घाला. त्यानं हे रोप हळूहळू सुकून जातं, पुन्हा तिथं दुसरं रोप येत नाही.

पावसाळ्यात डास - चिलटं - माशांचा भणभणाट? पाहा लसणाचा असरदार उपाय- घर पावसाळ्यातही वाटेल फ्रेश...

३. मात्र हा उपायही तसा रोपासाठी घातकच त्यामुळे त्यावर उपाय हाच की ते रोप नीट हळूच खुरपीने काढून घ्यावं, आणि मुळासह नीट उपटून कुणा वृक्षप्रेमींना, नर्सरीला भेट द्यावं. एक झाड जगवण्याचं पूण्य यानिमित्तानं पदरात पाडून घेतलेलं केव्हाही चांगलं. झाडं जगवणं नी वाढवणं हे आपलंही कर्तव्य आहेच.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरलहोम रेमेडीस्वच्छता टिप्सइनडोअर प्लाण्ट्स