'पाणी' हे जीवन आहे. पाण्याशिवाय या पृथ्वीवरील कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. कुठलाही सजीव जीव मग तो मनुष्य, प्राणी किंवा झाड असू दे, सगळ्यांना पाण्याची तितकीच गरज (Self Plant Watering Spikes) असते. पाणी नसेल तर आपले जीवन शून्य आहे. ज्याप्रमाणे आपण रोज पाणी पितो त्याचप्रमाणे झाडांना देखील दररोज पाणी घालावे लागते. झाडांना (Self Watering & Auto Watering System for Your House Plants) दररोज पाणी घातल्याने झाड ताजीतवानी, फ्रेश दिसतात. जर का आपण एक - दोन दिवस जरी झाडांना पाणी घातले नाही तर ही झाड कोमेजून जातात( Self Watering System for Plants).
बरेचदा आपण आपल्या घराच्या बाल्कनीत किंवा गॅलेरीत मोठ्या हौसेने झाड लावतो. या झाडांची आपण अगदी मुलांप्रमाणेच काळजी घेतो. या झाडांना वेळच्यावेळी योग्य प्रमाणांत खत, पाणी, सूर्यप्रकाश मिळाला तर ही झाड बहरुन येतात. काहीवेळा आपण सुट्टी निमित्त बाहेर फिरायला निघतो. अशावेळी आपल्याला चिंता लागून राहते ती झाडांना पाणी कोण घालणार ? परिवारातील सगळेचजण एकत्रित फिरायला निघाले की या झाडांकडे कोण लक्ष देणार असे होते. अशावेळी फिरायला बाहेर पडताना आपला अर्धा जीव त्या झाडांच्या काळजीने बेजार होतो. तसेच काहीवेळा आपण परत येईपर्यंत या झाडांना पाणी न मिळाल्याने काहीवेळा ती कोमेजून जातात. अशावेळी नेमके काय करावे हे सुचत नाही. जर आपण देखील सुट्टीनिमित्त बाहेर फिरायला जाणार असाल तर घरी असलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी एका खास उपकरणाचा वापर आपण करु शकतो. जेणेकरुन, आपण परत येईपर्यंत झाडांना व्यवस्थित पाणी मिळून ती आहेत तशीच फ्रेश राहतील.
'सेल्फ वॉटरिंग डिव्हाईस' हे जादुई उपकरण...
ट्रिपला गेल्यावर रोपांना पाणी कसं द्यायचं यासाठी आपण एका खास उपकरणाचा वापर करु शकतो. यासाठी आपल्याला घरातील जुन्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांची गरज लागणार आहे. जितकी रोपं तितक्या बाटल्या लागतील. आपण बाजारांत विकत मिळणाऱ्या 'सेल्फ वॉटरिंग डिव्हाईसचा' वापर करु शकता.
'सेल्फ वॉटरिंग डिव्हाईस' ही एक प्रकारची प्लॅस्टिकची तोटीच असते. आपण कोणत्याही बाटलीवर जसे बाटलीचे झाकण लावतो त्याचप्रकारे आपण ही तोटी कोणत्याही लहान तोंडाच्या बाटलीवर लावू शकतो. या तोटीला एक शंकू आकारासारखे तोंड असते. या शंकू आकाराच्या सर्वात टोकाकडील भाग हा टोकदार असतो. हा टोकदार भाग मातीत रोवून आपण कुंडीत ही पाण्याची बाटली उभी करु शकतो. त्याचबरोबर या तोटीच्या एका बाजूला गोलाकार फिरवता येईल असे छोटेसे झाकण आणि पाईप असतो.
आपल्याला पाण्याचा फ्लो कसा हवा, जास्त - कमी त्याप्रमाणे आपण हे झाकण सेट करुन ठेवू शकतो. सर्वात आधी बाटली पाण्याने भरून त्याला झाकणाच्या जागी हे 'सेल्फ वॉटरिंग डिव्हाईस' बसवून घ्यावे. त्यानंतर बाटली उलटी करुन त्या तोटीचा टोकदार भाग कुंडीतल्या मातीत रोवून घ्यावा. त्यानंतर बाजूचे झाकण फिरवून पाण्याचा फ्लो सेट करुन घ्यावा. बस्स झालं तुमचं काम, आता तुम्ही बिनधास्त कितीही दिवस फिरायला जाऊ शकता. रोपांना पाणी कोण घालणार याचे टेंन्शन विसरुन आपण फिरायला जाऊ शकतो.
तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...
स्वयंपाकाच्या गॅसची करा बचत, फक्त विकत आणा 'ही' वस्तू; गॅस लवकर संपणार नाही...
किंमत आणि रेटिंग
हे 'सेल्फ वॉटरिंग डिव्हाईस' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'सेल्फ वॉटरिंग डिव्हाईस' ला १.० इतके रेटिंग देण्यांत आले आहे. हे 'सेल्फ वॉटरिंग डिव्हाईस' १७५ रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत विकत मिळते. असे हे 'सेल्फ वॉटरिंग डिव्हाईस' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/4jAk898