आपल्या स्वयंपाकात कोथिंबीर हा रोज लागणारा आणि चव वाढवणारा महत्त्वाचा घटक आहे. पण बाजारातून आणलेली कोथिंबीर पटकन सुकते किंवा कधी ताजी मिळत नाही. तसेच महागही होत चालली आहे. म्हणूनच घरच्या घरी कुंडीत कोथिंबीर लावणे हा एक उत्तम आणि सोपा उपाय ठरतो. थोडीशी काळजी घेतली तर अगदी कमी जागेतही तुम्ही ताजी, सुगंधी कोथिंबीर सहज उगवू शकता. त्यासाठी फार काही कष्ट नाहीत अगदी सोपी पद्धत आहे.
कोथिंबीर लावण्यासाठी सर्वप्रथम योग्य कुंडी निवडणे गरजेचे आहे. मध्यम आकाराची, तळाला पाणी निघून जाण्यासाठी छिद्र असलेली कुंडी घ्या. (see how to grow tasty coriander at home , planting tips )पाणी साचून राहिल्यास मुळे कुजू शकतात, त्यामुळे ड्रेनेज व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर मातीची तयारी करा. बागेची माती, शेणखत किंवा कंपोस्ट आणि थोडी वाळू अशा मिश्रणात माती भुसभुशीत आणि सुपीक बनते, जी कोथिंबिरीसाठी योग्य असते.
कोथिंबीर लावण्यासाठी बाजारातून आणलेले धणे (coriander seeds) वापरू शकता. पण ते तसेच न पेरता हलकेसे दाबून दोन भागांत फोडले तर जास्त लवकर आणि चांगली कोथिंबीर येते. आता तयार केलेल्या मातीमध्ये हे बी पसरवून वरून हलकी माती टाका. खूप खोलवर बी पेरू नका, अन्यथा उगवायला वेळ लागतो.पाणी देताना हलक्या हाताने शिंपडा. माती नेहमी ओलसर राहील इतकेच पाणी द्या, जास्त पाणी देऊ नका. अति पाण्यानेही पिक खराब होते. कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळचे ऊन चांगले मिळेल. कोथिंबीरला हलकं ऊन आणि मध्यम तापमान आवडतं, त्यामुळे ती चांगली वाढते. कोथिंबीरीच्या दांड्या पेरुनही कोथिंबीर उगवता येते. फक्त कापणी छान करा आणि काळजी नीट घ्या.
साधारण ७ ते १० दिवसांत कोथिंबिरीची कोवळी पालवी दिसू लागते. या काळात माती कोरडी पडू देऊ नका. पोरं थोडी मोठी झाल्यावर अधूनमधून सेंद्रिय खत घातल्यास वाढ अधिक चांगली होते. सुमारे ३ ते ४ आठवड्यांत कोथिंबीर कापण्यासाठी तयार होते. कापताना मुळासकट न काढता वरचा भाग कापा, त्यामुळे पुन्हा नवीन पालवी येते.एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप दाट पेरणी टाळा. कोथिंबीरीला वाढण्यासाठी जागा मिळाली तर ती अधिक निरोगी राहतात.
तसेच कुंडी स्वच्छ आणि हवेशीर ठिकाणी ठेवल्यास कीड लागण्याची शक्यता कमी होते. घरच्या घरी कुंडीत कोथिंबीर लावणे हे केवळ सोपेच नाही, तर आनंददायीही आहे. आपल्या हाताने उगवलेली ताजी कोथिंबीर जेवणात वापरण्याचा आनंद काही वेगळाच असतो. थोड्या काळजीने तुम्ही वर्षभर ताजी कोथिंबीर मिळवू शकता.
Web Summary : Grow fresh coriander at home in pots with proper soil, drainage, and sunlight. Use split coriander seeds, water carefully, and harvest regularly for a continuous supply.
Web Summary : सही मिट्टी, जल निकासी और धूप से गमले में धनिया उगाएं। धनिया के बीज को विभाजित करें, सावधानी से पानी दें, और लगातार आपूर्ति के लिए नियमित रूप से कटाई करें।