Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > भाज्यांच्या सालीत दडलंय गुलाबाच्या सौंदर्याचं गुपित, रोपट्याला येतील भरपूर फुले, सोपा उपाय- उन्हाळ्यात रोप सुकणारही नाही

भाज्यांच्या सालीत दडलंय गुलाबाच्या सौंदर्याचं गुपित, रोपट्याला येतील भरपूर फुले, सोपा उपाय- उन्हाळ्यात रोप सुकणारही नाही

Gulabachya ropala phule yenyasathi upay: Unhalyat gulabachya ropachi kalji: से न खर्च करता केमिकल फ्री खतं कसे तयार करायचे पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2026 14:39 IST2026-03-22T14:39:13+5:302026-03-22T14:39:34+5:30

Gulabachya ropala phule yenyasathi upay: Unhalyat gulabachya ropachi kalji: से न खर्च करता केमिकल फ्री खतं कसे तयार करायचे पाहूया.

Rose plant care in summer Organic fertilizer from vegetable peels How to get more flowers on rose plant Using cow dung cakes for roses Homemade liquid fertilizer for plants | भाज्यांच्या सालीत दडलंय गुलाबाच्या सौंदर्याचं गुपित, रोपट्याला येतील भरपूर फुले, सोपा उपाय- उन्हाळ्यात रोप सुकणारही नाही

भाज्यांच्या सालीत दडलंय गुलाबाच्या सौंदर्याचं गुपित, रोपट्याला येतील भरपूर फुले, सोपा उपाय- उन्हाळ्यात रोप सुकणारही नाही

कडाक्याच्या उन्हात बागेतील नाजूक गुलाबाची रोप कोमेजून जाण्याची चिंता आपल्या प्रत्येकाला सतावते. हिवाळ्यात भरपूर फुले देणारे गुलाबाचे रोप उन्हाळा सुरु होताच सुकू लागते. पाने पिवळी पडतात आणि फुले देखील येत नाही. अशावेळी आपण अनेक रासायनिक खतांचा मारा करतो. (Best natural fertilizer for roses) उष्णतेमुळे रोप जळून जाण्याचा धोका देखील अधिक असतो. पण आपल्या स्वयंपाकघरात रोज कचरा समजून फेकल्या जाणाऱ्या भाज्या आणि फळांच्या सालींमध्ये गुलाबाच्या सौंदर्याचे खरे गुपित दडलेले आहे.(Kitchen waste gardening hacks)
भाज्यांच्या - फळांच्या साली आणि त्यात थोड्या प्रमाणात गोवरीचा (शेणकुटाचा) वापर करून आपण एक 'मॅजिक फर्टिलायझर' तयार करू शकतो. हे नैसर्गिक खत केवळ गुलाबाला आवश्यक पोषक घटक पुरवत नाही, तर उन्हाळ्यात मातीतील ओलावा टिकवून ठेवण्यासही मदत करते.(Homemade liquid fertilizer for plants) पैसे न खर्च करता केमिकल फ्री खतं कसे तयार करायचे पाहूया. 

तरुण आणि स्टायलिश दिसायचं तर ब्लाऊजच्या ‘या’ ५ नेकलाइन निवडा, चुकीच्या नेकलाइनमुळे तुम्ही दिसता म्हाताऱ्या

उन्हाळ्यात गुलाबाच्या रोपाची विशेष काळजी घ्यावी लागते. सूर्यप्रकाश आणि कोरडी हवा यामुळे रोपातील आर्द्रता कमी होते. अशा परिस्थितीत बाहेरील महागड्या खतांपेक्षा घरगुती सेंद्रिय खत अधिक प्रभावी ठरते. भाज्या-फळांच्या साली आणि गोवरीचे मिश्रण गुलाबाच्या रोपासाठी चांगले खत आहे. 

खत बनवण्याची सोपी पद्धत:
१. रोजच्या वापरातील बटाट्याची साले, केळीच्या साली, कांद्याची टरफले आणि वाळलेली फुले एका बादलीत जमा करा.
२. एक गोवरी घ्या आणि तिचे बारीक तुकडे करा. हे तुकडे त्या कचऱ्यात मिसळा. गोवरी मातीला थंड ठेवण्याचे काम करते.
३. जर आपल्याला लगेच रिझल्ट हवा असेल, तर या सर्व साली आणि गोवरीचे तुकडे घ्या. बादलीमध्ये पाणी घेऊन २-३ दिवस भिजत ठेवा. ३ दिवसांनंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्यात समप्रमाणात साधे पाणी मिसळून गुलाबाच्या मुळांना घाला.
४.आपण साली आणि गोवरीचे तुकडे उन्हात वाळवून त्याची पावडर करूनही मातीत मिसळू शकतो. रोपाची काळजी घेण्यासाठी आपण केळीची, संत्र्याची साले घालू शकतो.  केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे फुलांच्या वाढीस मदत करते, तर संत्र्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी आणि सूक्ष्म पोषक तत्वे असतात, जी जमिनीतील आम्लता संतुलित ठेवून झाडे हिरवीगार ठेवतात. या मिश्रणात एक चमचा लाकडाची राख घाला . राखेत कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात, जे वनस्पतींची मुळे मजबूत करतात. शिवाय, ती  नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करते, आणि वनस्पतींना मातीतील बुरशी व हानिकारक कीटकांपासून वाचवते.
५. जेव्हा फळांच्या साली खत म्हणून वापरल्या जातात , तेव्हा त्यांच्या गोडव्यामुळे कुंडीला मुंग्या लागतात. या मिश्रणात एक चमचा दालचिनीची पूड घाला. दालचिनीच्या सुगंधामुळे मुंग्या दूर राहतात.


उन्हाळ्यात गुलाबाची निगा राखण्याच्या टिप्स:

1. उन्हाळ्यात मातीवरील पाणी लवकर उडून जाते. यासाठी कुंडीतील मातीवर वाळलेली पाने किंवा गोवरीचा चुरा पसरा. यामुळे माती थंड राहते.

2. गुलाबाला नेहमी सकाळी लवकर किंवा सूर्यास्तानंतर पाणी द्या. दुपारी पाणी दिल्यास मुळे खराब होतात. 

3. कडक उन्हात गुलाबाची मोठी छाटणी करू नका. फक्त सुकलेली फुले आणि पाने हळूवारपणे काढून टाका.

 


Web Title : सब्जी के छिलकों में गुलाब की देखभाल का राज: फूलों के लिए आसान खाद

Web Summary : गुलाब के लिए प्राकृतिक खाद बनाने के लिए सब्जी और फलों के छिलकों को गोबर के साथ प्रयोग करें। यह घरेलू खाद आवश्यक पोषक तत्व प्रदान करती है और मिट्टी की नमी बनाए रखती है, जिससे स्वस्थ विकास और भरपूर फूल आते हैं, यहां तक कि गर्मियों में भी। आसान टिप्स गुलाब को गर्मी से बचाने में मदद करते हैं।

Web Title : Rose care secret in vegetable peels: easy fertilizer for blooms.

Web Summary : Use vegetable and fruit peels with cow dung to create a natural fertilizer for roses. This homemade fertilizer provides essential nutrients and retains soil moisture, promoting healthy growth and abundant blooms, even in summer. Simple tips help protect roses from heat.