Join us

थंडीत मनी प्लांटची मुळे कुजून खराब होतात? १ सिक्रेट पदार्थ, हिवाळ्यातही मनी प्लांट दिसेल तरतरीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2025 09:40 IST

Money Plant Care & Growth Tips With Epsom Salt : Use Epsom Salt In Money Plant & See The Magic : Epsom Salt for plants : हिवाळ्यात मनी प्लांटशाही संबंधित अनेक समस्या सतावतात, मग करून पाहा हा खास उपाय...

बहुतेक आपल्या सगळ्यांच्याच घरात किमान एक तरी मनी प्लांटचे रोपं असतेच. घरातील वातावरण फ्रेश राहावे, घराची शोभा वाढावी यांसारख्या अनेक कारणांसाठी घरात किंवा घराच्या बाल्कनीत - गार्डनमध्ये मनी प्लांट लावली जाते. बदामाच्या आकारातील पान असलेलं हे हिरवागार रोपं दिसायला फारच आकर्षक आणि सुंदर असत. थंडीच्या दिवसांत (Money Plant Care & Growth Tips With Epsom Salt) रोपांची जरा विशेष काळजी घ्यावी लागते. यातही जर मनी प्लांट (Use Epsom Salt In Money Plant & See The Magic) सारखे नाजूक रोपं असेल तर त्याची काळजी घेणं फारच गरजेचे असते. एरवी भरभर वाढणारा मनी प्लांट हिवाळ्यात मात्र अगदीच बेताने वाढतो. वातावरणातील गारठ्याने काहीवेळा मनी प्लांटची पानं  सुकतात, पानांची व्यवस्थित वाढ होत नाही तर कधी मूळ कुजतात. विशेष करून थंडीच्या दिवसांत मनी प्लांटशाही संबंधित अशा अनेक समस्या सतावतात. यामुळे रोपाचे नुकसान होऊ शकते. यामुळेच हिवाळ्यात मनी प्लांटची काळजी कशी घ्यावी तसेच अनेक समस्या निर्माण होऊ नये यासाठी काय उपाय करु शकतो ते पाहूयात(Epsom Salt for plants).

काहीजण मनी प्लांट मातीमध्ये कुंडीत लावतात, तर काहीजण बाटलीत पाणी भरून त्यात मनी प्लांट ठेवतात. परंतु हिवाळ्यात वातावरणातील गारठा आणि सतत पाण्यात असलेली मनी प्लांटची मूळ यामुळे हळूहळू ओलावा आणि गारठ्याने कुजून जातात. असे होऊ नये यासाठी आपण एप्सम सॉल्ट (Epsom Salt) म्हणजेच जाडे मीठ किंवा रॉक सॉल्टचा वापर करु शकतो. एप्सम सॉल्ट मनी प्लांटच्या रोपाला पोषक तत्व देण्यासोबतच मुळांना सडण्यापासून वाचवण्यासही मदत करते. 

मनी प्लांटसाठी एप्सम सॉल्टचा वापर कसा करावा ? 

मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही मनी प्लांट ज्या पाण्यात लावली आहे त्या पाण्यांत एप्सम सॉल्ट घालू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अर्धा चमचा एप्सम सॉल्ट घ्यावे लागेल. त्यात थोडी NPK पावडर मिसळा. हे मिश्रण पाण्यात घालून चांगले विरघळवून घ्या. काहीवेळासाठी हे मिश्रण सूर्यप्रकाशात ठेवा, जेणेकरून ते चांगले विरघळेल. आता हे पाणी मनी प्लांटच्या मुळांमध्ये टाका. या प्रक्रियेमुळे मनी प्लांटला आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात आणि त्याच्या वाढीस देखील गती मिळते. 

पुदिन्याची जुडी विकत आणण्यापेक्षा कुंडीत लावा छोटंसं हिरवंगार पुदिन्याचं रोप, ताजा पुदिना मिळेल घरच्याघरीच...

बरणीतील कॉफी सुकून गोळा झाली ? फेकून न देता, गार्डनिंगसाठी 'असा' करा वापर, रोपं येतील बहरुन...

मनी प्लांटच्या रोपांमध्ये एप्सम सॉल्ट घालण्याचे फायदे... 

१. बुरशी आणि जीवाणूंचा प्रतिबंध :- एप्सम सॉल्ट पाण्यात बुरशी आणि बॅक्टेरियाची वाढ होऊ देत नाही. यामुळे मनी प्लांटची मूळ खराब होत नाहीत. 

२. मनी प्लांटची वाढ :-एप्सम सॉल्टमध्ये असलेले मॅग्नेशियम आणि सल्फर मनी प्लांटची पाने आणि मुळांची चांगली वाढ होण्यास मदत करते. 

३. मुळांची ताकद :- यामुळे मुळे मजबूत होतात आणि सडण्यापासून संरक्षण होते.

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्स