आपल्या प्रत्येकाच्या बाल्कनीत मोगऱ्याचं रोप असतं. वेगवेगळ्या फुलांची रोप आपण आपल्या घराच्या अंगणात लावतो. रोपं फक्त लावत नाही तर त्याची काळजी देखील घेतो. उन्हाळा सुरु झाला की आपल्या बागेतही मोगऱ्याचा सुगंध दरवळावा असं प्रत्येकाला वाटतं.(How to save dying Mogra jasmine plant) पण अनेकदा रोपाला पानं येतात पण फुलचं येत नाही अशी अनेकांची तक्रार असते. मे महिना हा मोगऱ्याच्या फुलांसाठी चांगला असतो. पण कडाक्याच्या उन्हामुळे रोपाची पाने पिवळी पडून गळू लागतात, कळ्या येणे पूर्णपणे बंद होतात आणि झाड सुकून फक्त वाळलेल्या काड्या उरतात. (Secret fertilizer for heavy flowering in Jasmine)
अनेकदा आपण रोज पाणी घातलं तरी झाडाची अवस्था काही सुधारत नाही, त्यामुळे रोप मरते. जर आपल्याही कुंडीतील मोगरा असाच सुकला असेल तर महागड्या रासायनिक खतांऐवजी स्वयंपाकघरातील काही गोष्टी मातीत घातल्यास ८ दिवसांत मोगऱ्याला बहर येईल. मोगऱ्याच्या सुकलेल्या काड्यांवर पुन्हा नवीन हिरवीगार पाने येतील.(Mogra plant care in summer season)
मोगऱ्याच्या रोपाला उन्हाळ्यात बहर आणण्यासाठी सगळ्यात आधी रोपाची छाटणी करायला हवी. रोपावर ज्या काड्या पूर्णपणे वाळल्या आहेत, ज्यांवर एकही पान नाही, ते कापून घ्या. तसेच सुकलेली फुले आणि पिवळी पडलेली पाने काढून टाका. यामुळे रोपाला नवीन पालवी फुटण्यास मदत होईल.
मातीत घालण्यासाठी आपल्याला बोन मील, पोटाश आणि सीवीड ग्रॅन्युअल्स किंवा लिक्विड प्रत्येकी १ - १ चमचा घालाव लागेल. बोन मीलमध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फरस आणि कॅल्शियम असते. यामुळे मोगऱ्याच्या रोपाची मुळे मजबूत होतात आणि झाडाला नवीन फांद्या फुटतात. मोगऱ्याला मोठ्या आकाराची आणि भरपूर फुले येण्यासाठी पोटाश अत्यंत आवश्यक आहे. हे रोपाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि कळ्या गळण्याची समस्या थांबवते.
सीवीड ग्रॅन्युअल्स किंवा लिक्विड हा समुद्रातील वनस्पतींपासून बनवलेला एक नैसर्गिक अर्क आहे. यामध्ये सूक्ष्म पोषक घटक असतात, जे उन्हाळ्यात झाडाला लागणारी ताकद देतात ज्यामुळे पानांचा हिरवेगारपणा टिकून राहतो. कुंडीतील माती आधी खुरप्याच्या मदतीने २ इंच काढा. त्यात तिन्ही घटक मातीत व्यवस्थित मिक्स करा आणि वरुन थोडे पाणी घाला.
मे महिन्यात मोगऱ्याला दुपारी पाणी देण्याची चूक कधीही करु नका. सकाळी ७ च्या आधी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतरच भरपूर पाणी द्या. गच्चीवर किंवा बाल्कनीत दुपारचे कडक ऊन रोपावर पडत असल्यास रोपाला शेडमध्ये ठेवा. सकाळचे ४ ते ५ तासांचे ऊन मोगऱ्यासाठी पुरेसे असते.
Web Summary : Is your Mogra plant dying in summer? Prune dry branches, add bone meal, potash, and seaweed. Water in the morning or evening and provide shade from the harsh afternoon sun for a thriving plant.
Web Summary : क्या गर्मी में आपका मोगरा का पौधा मुरझा रहा है? सूखी शाखाओं को काटें, बोन मील, पोटाश और समुद्री शैवाल डालें। सुबह या शाम को पानी दें और तेज दोपहर की धूप से छाया प्रदान करें, जिससे पौधा पनपे।