भारतीय स्वयंपाकघरात हिरव्या मिरचीच वापर रोज केला जातो. तिखट-झणझणीत हिरवी मिरची जेवण बनवण्यासाठी लागेतच. हिरव्या मिरचीमुळे पदार्थांची चव देखील वाढते. तसेच हिरव्या मिरच्या खाण्याचे फायदे देखील अनेक आहेत. अनेकदा असं होते की बाजारातून आणलेल्या हिरव्या मिरच्या लगेच संपतात आणि ऐनवेळी मिरची आणण्यासाठी बाजारात जावं लागते.(Tips for flowering in chili plants) अशावेळी घरातच मिरचीचे रोप असेल तर ते खूप उपयोगी ठरते.
पण अनेकदा घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत एका छोट्या कुंडीत लावलेल्या मिरचीच्या रोपाला फळ येत नाही, अशी आपली तक्रार असते.(Kitchen gardening tips) आपण मेहनत करतो, पाणी घालतो, तरीही झाड फक्त वाढत राहतं पण फळच येत नाही. अनेकदा मिरच्यांना भरपूर फुले येतात. पण ही फुले योग्य वेळी काढल्यास रोपाला भरपूर मिरच्या येतील.(Home gardening in small spaces) पाहूया, मिरचीच्या रोपाला भरपूर मिरच्या येण्यासाठी नेमकं काय करावं.
ज्यावेळी मिरचीचे रोप उंच प्रमाणात वाढते. तेव्हा त्याला फूल येतात. याला गेटवे फ्लॉवर किंवा गेटवे चिली असं म्हणतात. ही फूल जर देठाच्या मुख्य भागी असतील तर काढून टाका. जेव्हा रोपाला फुले येतात, तेव्हा झाडाला नको त्या वेळी पाणी देणे टाळा. फुलांच्या काळात झाडाला अति पाणी दिल्यास फुले गळून पडतात. मातीचा वरचा थर पूर्णपणे कोरडा वाटल्यावरच पाणी द्यावे. या काळात झाडाच्या मुळांना ओलावा हवा, पण मातीचा चिखल करु नका. अनेकदा कुंडीतील रोपांना कीटक किंवा मधमाश्या मिळत नाहीत, त्यामुळे फुलांचे रूपांतर फळात होत नाही. यासाठी आपण हँड पॉलिनेशन करू शकतो. फुलांच्या काळात झाडाला हलकेच हलवा, जेणेकरून परागकण एका फुलावरून दुसऱ्या फुलावर पडतील. हे काम सकाळी केल्यास फायदा होईल.
रोपांची छाटणी करण्यासाठी पहिला बहर हा सगळ्यात चांगला असतो. यावेळी लहान फांद्या किंवा पाने हळूवारपणे छाटा. यामुळे झाडाची ऊर्जा वाया जात नाही तर ती रोपाला वाढवण्यास मदत करते. रोपाची मुळे मजबूत झाली की पानांना पोषण मिळून रोपाला मिरच्या येतात.
फुलांच्या काळात झाडाला पोटॅशियम आणि फॉस्फरसची अधिक गरज असते. बाजारातील खतांपेक्षा घरगुती केळ्याच्या सालीचे पाणी (Banana Peel Water) चांगले आहे. केळ्याच्या साली २-३ दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि ते पाणी गाळून रोपाला द्या. हे पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत समजले जाते. ज्यामुळे फुले गळत नाहीत आणि मिरच्यांची वाढ जोमाने होते.
मिरचीच्या रोपाला दिवसातून किमान ५ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपले रोप सावलीत असेल, तर फुले येऊनही फळे लागणार नाहीत. त्यामुळे रोपाला शक्य तितक्या सूर्यप्रकाशात ठेवा.
