आपल्यापैकी अनेकांना अंगणात किंवा बाल्कनी रोप लावण्याची हौस असते.(DIY natural fertilizer from household items) पण अनेकदा तुळस, गुलाब, मोगरा यांसारखी रोप लावली की, त्याची व्यवस्थित वाढ होत नाही. रोप जगत नाही तर याउलट ती लगेच सुकतात. या होम गार्डमध्ये गुलाब, तुळस आणि मोगरा आपल्या पाहायला मिळतो.( How to make organic fertilizer at home) गुलाबाचे प्रकारेही अनेक आहेत.(Simple gardening hacks for blooming roses)
आपल्या बाल्कनीत गुलाबाचे रोप लावल्यानंतर सुरुवातीला मस्त टपोरे गुलाब येतात पण अचानक गुलाबाला फुलं येणंच बंद होते.(Natural ways to boost rose flower growth) यामागे अनेक कारणे असू शकतात. गुलाबाचे रोप केवळ सुंदरच नाही तर आपल्या बाल्कनीला अधिक आकर्षक बनवते.(Best homemade fertilizers for flowering plants) त्याला अधिक काळ जगवण्यासाठी आणि फुलवण्यासाठी पोषण आवश्यक असते. पुरेशा प्रमाणात पाणी किंवा खत मिळाले नाही की, या झाला फुले येणे बंद होतात. ही समस्या टाळण्यासाठी रोपाला योग्य प्रकारे खत देणे महत्त्वाचे आहे. तसेच रासायनिक खताऐवजी नैसर्गिक खत वापरणे वनस्पतीच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.(Homemade fertilizers for beautiful garden flowers) गुलाबाच्या रोपासाठी घरीच खत बनवायचे असेल तर या सोप्या टिप्स पाहा.
तुळस सारखी सुकते? मातीत घाला 'हे' घरगुती खत, उन्हाळ्यातही तुळस सुकणार नाही
1. गांडूळ खत
गांडूळ खत हे कोणत्याही वनस्पतीसाठी नैसर्गिक खत मानले जाते. जे गांडुळाच्या मदतीने सेंद्रिय कचऱ्याचे विघटन करुन बनवतात. यात गुलाबाच्या रोपाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते. हे खत बनवण्यासाठी फळे आणि भाज्यांची साले, वाळलेली पाने आणि इतर सेंद्रिय कचऱ्याला एका खड्ड्यात किंवा कंटेनरमध्ये ठेवा. हे खत आठवड्याभरात तयार होईल.
2. शेणखत
शेणखत हे पारंपारिक नैसर्गिक खत आहे. हे करण्यासाठी शेण हवेशीर ठिकाणी सुकू द्या, नंतर पाण्यात मिसळवून गुलाबाच्या रोपाच्या मुळांजवळ घाला. शेणखतामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. जे वनस्पतीच्या वाढीस मदत करतात.
3. केळीची साल
अनेकदा आपण केळी खाऊन साल फेकून देतो. पण यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. जे गुलाबाच्या रोपासाठी फायदेशीर आहे. केळीची साले वाळवून त्याचा पावडर तयार करा. हे मातीत मिसळा. हे खत मुळांना मजबूत करुन फुले उमलण्यास अधिक मदत करेल.
4. अंड्याची टरफले
अंड्याच्या टरफल्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, जे झाडाची मुळे मजबूत करतात. अंड्याचे टरफले धुवून सुकवा, नंतर त्याची पावडर करा. ही पावडर गुलाबाच्या रोपाच्या मातीत मिसळा. हे खत रोपाला निरोगी ठेवण्यास मदत करेल.
5. चहाच्या पानांचे खत
चहाच्या पानांमध्ये नायट्रोजन आणि इतर पोषक घटक असतात जे वनस्पतीच्या वाढीसाठी फायदेशीर असतात. वापरलेली चहापत्ती गुलाबाच्या रोपाच्या मातीत मिसळा. या खतामुळे मातीची गुणवत्ता अधिक सुधारते.