हिवाळा किंवा थंडीचे दिवस झाडा - रोपांसाठी आव्हानात्मक ठरतात, विशेषतः कुंडीत लावलेल्या झाडांसाठी. खुल्या जमिनीतवर असलेल्या झाडांच्या तुलनेत कुंडीतील झाडांना तापमानातील बदल, थंड वारे आणि पाण्याचे नियोजन याचा जास्त परिणाम होतो. त्यामुळे या काळात झाडे कोमेजणे, पाने पिवळी पडणे, झडणे किंवा झाड वाढ थांबवणे असे त्रास दिसून येतात. (Just follow these 5 steps, the plants will bloom in winters as well, must try it )योग्य काळजी घेतली तर थंडीच्या दिवसांतही कुंडीतील झाडे ताजी आणि निरोगी ठेवता येतात.
थंडीमध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे थंड तापमानामुळे मुळांवर होणारा परिणाम. कुंडीतील मुळे थेट बाहेरच्या वातावरणाच्या संपर्कात असतात. मातीचे संरक्षण असले तरी कमीच पडते. रात्रीचे खूप कमी तापमान मुळांना त्रासदायक वाटते. त्यामुळे झाड पाणी आणि अन्नद्रव्ये नीट शोषू शकत नाही. यासाठी कुंड्या थेट थंड फरशीवर न ठेवता लाकडी पाट, वीट किंवा थर्माकोलवर ठेवाव्यात. शक्य असल्यास रात्री कुंड्या भिंतीलगत किंवा थोड्या आडोशाला ठेवाव्यात.
थंडीच्या दिवसांत अनेक जण उन्हाळ्यासारखेच पाणी देतात, पण हे झाडांसाठी घातक ठरू शकते. हिवाळ्यात झाडांची वाढ मंदावते, त्यामुळे पाण्याची गरज कमी असते. जास्त पाणी दिल्यास माती ओलसर राहते आणि मुळे कुजण्याची शक्यता वाढते. माती कोरडी वाटल्यावरच पाणी द्यावे आणि तेही सकाळच्या वेळेतच.
थंडीमध्ये थंड वारे झाडांचे जास्त नुकसान करतात. सतत थंड वाऱ्याच्या संपर्कात राहिल्याने पाने सुकतात आणि झडू लागतात. त्यामुळे कुंडीतील झाडांना थेट थंड वाऱ्यापासून संरक्षण देणे गरजेचे आहे. झाडे बाल्कनीत किंवा गच्चीवर असतील तर त्यांना जाळी, कापड किंवा प्लास्टिक शीटचा हलका आडोसा देता येतो. मात्र पूर्णपणे बंदिस्त करू नये, हवा खेळती राहणे आवश्यक असते.
हिवाळ्यात सूर्यप्रकाशाचे तास कमी असतात. त्यामुळे झाडांना पुरेसा ऊन मिळेल याची काळजी घ्यावी. सकाळचे कोवळे ऊन झाडांसाठी खूप फायदेशीर असते. रोज किमान ३–४ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कुंड्या ठेवाव्यात. खूप थंड प्रदेशात दुपारच्या उन्हात झाडे ठेवणे अधिक चांगले ठरते.
थंडीच्या काळात खत देताना देखील सावधगिरी बाळगावी. जास्त किंवा रासायनिक खत दिल्यास झाडांवर ताण येतो. त्यामुळे या काळात हलके, सेंद्रिय खत जसे की शेणखत, कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट थोड्या प्रमाणात देणे योग्य ठरते. झाड पूर्णपणे कोमेजले असेल तर खत देण्याऐवजी पाणीच वापरा. हिवाळ्यात काही झाडांची पाने नैसर्गिकरित्या झडतात. त्यामुळे घाबरुन जास्त उपाय करु नयेत. सुकी पाने काढून टाकावीत, म्हणजे झाडाची ऊर्जा वाया जात नाही.
Web Summary : Winter challenges potted plants. Protect roots from cold, water sparingly in the morning, shield from wind, ensure sunlight, and use light organic fertilizer. Avoid over-fertilizing to keep plants healthy.
Web Summary : सर्दियों में गमले के पौधों को परेशानी होती है। जड़ों को ठंड से बचाएं, सुबह कम पानी दें, हवा से बचाएं, धूप सुनिश्चित करें, और हल्का जैविक खाद डालें। पौधों को स्वस्थ रखने के लिए अधिक खाद से बचें।