>हिरवा कोपरा > इनडोअर प्लांट्स दिसतात छान, पण असतात नाजूक! इनडोअर प्लांट्सनी कसं सजवाल घर, कशी घ्यायची काळजी?

इनडोअर प्लांट्स दिसतात छान, पण असतात नाजूक! इनडोअर प्लांट्सनी कसं सजवाल घर, कशी घ्यायची काळजी?

इनडोअर प्लांट्स घरात आणले आणि अवघ्या काही दिवसात कोमेजून गेले असा तुमचाही अनुभव आहे का? मग इनडोअर प्लांट्सची काळजी घेण्याच्या या काही टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 07:07 PM2021-09-30T19:07:02+5:302021-09-30T19:08:25+5:30

इनडोअर प्लांट्स घरात आणले आणि अवघ्या काही दिवसात कोमेजून गेले असा तुमचाही अनुभव आहे का? मग इनडोअर प्लांट्सची काळजी घेण्याच्या या काही टिप्स.

Indoor plants look great, but are fragile! How to take care of indoor plants? | इनडोअर प्लांट्स दिसतात छान, पण असतात नाजूक! इनडोअर प्लांट्सनी कसं सजवाल घर, कशी घ्यायची काळजी?

इनडोअर प्लांट्स दिसतात छान, पण असतात नाजूक! इनडोअर प्लांट्सनी कसं सजवाल घर, कशी घ्यायची काळजी?

Next
Highlightsइनडोअर प्लांट्स सुकण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्याला त्या झाडांना पाणी किती द्यायचं, किती प्रकाशात त्यांना ठेवायचं, तापमान कसं हवं, हा अंदाज येत नाही.

घराबाहेर असलेल्या झाडांची कशी काळजी घ्यायची, पाणी कसं आणि किती द्यायचं, याचा अंदाज आपल्याला असतो. पण काही वेळेस हौस म्हणून किंवा मग घराची सजावट म्हणून इनडोअर प्लांट्स घरात आणले जातात. त्याची आपण व्यवस्थित काळजीही घेतो. पण तरीही ही झाडं महिनाभरातच सुकून जातात किंवा त्याची पानं सडू लागतात, असा अनुभव काही जणांना येतो. इनडोअर प्लांट्स सुकण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्याला त्या झाडांना पाणी किती द्यायचं, किती प्रकाशात त्यांना ठेवायचं, तापमान कसं हवं, हा अंदाज येत नाही. म्हणूनच इनडोअर प्लांट्सची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने केल्या पाहिजेत. 

 

अशी घ्या इनडोअर प्लांट्सची काळजी
१. घरातल्या सजावटीसाठी आणलेली झाडं कमी प्रकाशात ठेवावी. अनेकदा आपण ही झाडं घरात तर आणतो, पण मग आपल्याला प्रश्न पडतो की या झाडांना पुरेसा प्रकाश मिळत असेल का, म्हणून मग आपण ही झाडं घरातल्या अशा जागेत ठेवतो, तेथे भरपूर सुर्यप्रकाश येत असेल. पण आपल्याला वाटलेली ही काळजी झाडांसाठी घातक ठरते. या झाडांना कमी सुर्यप्रकाश हवा असतो. त्यामुळे त्यांना सुर्यप्रकाशात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. 

२. फिलॉडेंड्रॉन, ड्रॅकेना ही झाडं तुम्ही घरात लावू शकता. याशिवा पोथोस, डेव्हिस ही झाडं देखील घरात चांगली टिकतात. या झाडांना खूपच कमी सुर्यप्रकाश आणि पाणी लागतं. त्यामुळे ही झाडं घराचं सौंदर्य तर वाढवतातच पण जास्त काळ टिकतात आणि फ्रेश राहतात. 

 

३. पाणी जपून टाका
इनडोअर प्लांट्स सांभाळण्यासाठी ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. बाहेरच्या झाडांना जसे पाणी घालतो, तसे पाणी इनडोअर प्लांट्सला घालू नका. या झाडांच्या कुंड्यामधील माती केवळ ओलसर राहिली पाहिजे याची काळजी घ्या. या झाडांना रोज पाणी घालायचे नसते. आठवड्यातून दोन वेळेस केवळ दोन टेबलस्पून पाणी घाला. जर उन्हाळ्यात अति उष्णतेमुळे कुंडीतील माती सुकते आहे, असे वाटले, तर एखादा चमचा अधिक पाणी घाला. पावसाळ्यात हवामान दमट असते. अशावेळी घरातल्या झाडांच्या कुंडीतील माती लवकर कोरडी पडत नाही. त्यामुळे मातीचा ओलसरपणा पाहून आठवड्यातून एकदा पाणी घातले तरी चालते. 

 

४. जास्त खत नको
इनडोअर प्लांट्सला जास्त खताची आवश्यकता नसते. सुकलेले फुल किंवा उरलेल्या कोरड्या अन्नाचे कण जरी महिन्यातून एकदा कुंडीत टाकले तरी चालते. कार्बोनेटेड पाणी आणि चहा पावडर उकळून केलेले पाणी या दोन गोष्टी जर इनडोअर प्लांट्सला टाकल्या तर त्यांची वाढ पटकन होते आणि झाडं सशक्त होतात. 

 

Web Title: Indoor plants look great, but are fragile! How to take care of indoor plants?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Gardening Tips : घरच्याघरीच मिळवा फ्रेश, लालबुंद टोमॅटो; 'या' पद्धतीने लावा कुंडीत टोमॅटोचं झाड, मिळवा भरपूर टोमॅटो - Marathi News | Gardening Tips : Kitchen Garden Tips How to grow tomato in home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : घरच्याघरीच मिळवा फ्रेश, लालबुंद टोमॅटो; 'या' पद्धतीने लावा कुंडीत टोमॅटोचं झाड, मिळवा भरपूर टोमॅटो

Gardening Tips : . सध्या टोमॅटो महागलेत. यामुळे घरीच टोमॅटोचं झाड लावण्याचा प्रयत्न एकदा नक्की करून पाहायला हवा. ...

बागो में फिटनेस है! फिट व्हायचं तर बागकाम करा, बाल्कनीतली बाग वाढवते स्टॅमिना.. - Marathi News | Garden therapy : Benefits of gardening to health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बागो में फिटनेस है! फिट व्हायचं तर बागकाम करा, बाल्कनीतली बाग वाढवते स्टॅमिना..

Health benefits of gardening: आपण विचारही करत नाही, एवढा फायदा आपल्याला बाग काम करून मिळत असतो... म्हणूनच तर एकदा रमून बघा तुमच्या बाल्कनीतल्या (balcony) त्या हिरवाईच्या दुनियेत !! ...

उरलेलं वरण, ताक, कांद्याची टरफले फेकू नका; झाडांसाठी खत म्हणून 'असा' करा त्यांचा उपयोग - Marathi News | Use of onion, buttermilk and dal for plants, best fertilizer for your terrace garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उरलेलं वरण, ताक, कांद्याची टरफले फेकू नका; झाडांसाठी खत म्हणून 'असा' करा त्यांचा उपयोग

Gardening Tips: घरातले अनेक उरलेले पदार्थ तुमच्या बागेतल्या (balcony) झाडांसाठी उत्तम टॉनिक ठरू शकतात. म्हणूनच हे पदार्थ फेकून देऊ नका. या पदार्थांचा तुमच्या बागेतल्या झाडांसाठी (plants growth) 'असा' वापर करा...  ...

बाल्कनीत झाडं तर लावायची, पण कुंडीचा आकार कसा ठरवाल? ऊन, खत, पाण्याचं काय गणित? - Marathi News | Gardening Tips: How to take care of plants in terrace garden and balcony | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाल्कनीत झाडं तर लावायची, पण कुंडीचा आकार कसा ठरवाल? ऊन, खत, पाण्याचं काय गणित?

छोट्या जागेतही खूप छान गार्डनिंग (terrace gardening) करता येते. अगदी कुंडीतही (planters) झाडे जोमाने वाढतात. फक्त त्यासाठी कुंडीचा आकार, झाडांना घालायचं खत, पाणी आणि ऊन यांचं गणित जमलं पाहिजे... ...

छोट्या जागेत, अगदी छोट्या कुंडीत घरच्याघरी लावा मेथी-कोथिंबीर! ताजी कोवळी मस्त भाजी.. - Marathi News | Put fenugreek-cilantro in a small space, even in a small pot at home! Fresh Kovali Mast Bhaji .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छोट्या जागेत, अगदी छोट्या कुंडीत घरच्याघरी लावा मेथी-कोथिंबीर! ताजी कोवळी मस्त भाजी..

सोप्या पद्धतीने घरच्या घरी लावता येतील अशा भाज्या नक्की लावून बघा ...

डेझर्ट रोज, ॲडेनिअमचा घर प्रसन्न करणारा बहर! कशी घ्याल झाडाची योग्य काळजी - Marathi News | Gardening Tips: Dessert Rose, How to take proper care of the plant Adenium.... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डेझर्ट रोज, ॲडेनिअमचा घर प्रसन्न करणारा बहर! कशी घ्याल झाडाची योग्य काळजी

Gardening Tips: डेझर्ट रोज (desert rose)किंवा रेगिस्तान का गुलाब म्हणून ओळखलं जाणारं ॲडेनिअमचं (adenium)झाड नुसतं पाहिलं तरी मन प्रसन्न होतं. टेरेस गार्डनिंगसाठी परफेक्ट असणारं हे झाड लावायचं कसं, वाढवायचं कसं याचं गणितही खूपच सोपं आहे बरं का... ...