ऑक्टोबर महिना सुरु झाला की, वातावरणात बदल होतो. पुन्हा उन्हाळ्याचे दिवस सुरु झाल्यासारखे वाटते. आपल्याला जसा उन्हाचा कडाका सोसवत नाही तसंच काहीसं रोपांचंही होतं.(rose plant care at home) घराच्या गॅलरीत, अंगणात किंवा खिडकीजवळ लावलेलं गुलाबाचं रोप म्हणजे जणू आपल्या घराचं सौंदर्य!(rose plant care in October) पण अनेकदा उन्हातान्हात मेहनत करुन लावलेलं गुलाबाचं झाड काही दिवसांनी कोमजतं, पानं सुकतात आणि फुलं येणं थांबतं. (how to revive wilted rose plant) अशावेळी आपल्याला वाटतं झाड मरतंय की काय?, पण खरंतर आपण थोडी काळजी घेतली तर झाडं पुन्हा नव्याने फुलांनी बहरु लागेल. (how to make rose plant bloom again)ऑक्टोबर महिना हा गुलाबाच्या झाडासाठी सगळ्यात योग्य काळ मानला जातो.(organic fertilizer for rose plants) उन्हाची तीव्रता कमी झालेली असते आणि हवेत हलकी थंडी सुरु होत असते. याच वेळी रोपाला पुन्हा बहरण्यासाठी योग्य वेळ असते.(rose gardening tips) या काळात माती, पाणी आणि खत याकडे थोडं लक्ष दिलं की गुलाबाचं रोप पुन्हा उठून दिसू लागतं. (rose plant care for beginners)
आपण गुलाबाच्या रोपांना नियमितपणे पाणी द्यायला हवं. परंतु, जास्त पाणी देणे टाळा, कारण जास्त ओलावा मुळांना कुजण्यास कारणीभूत ठरु शकतो. झाडांना सुर्यप्रकाश देखील मिळायला हवा. परंतु, कडक उन्हापासून रोपाचे संरक्षण करण्यासाठी हलकी सावली देखील आवश्यक असते.
ऑक्टोबरमध्ये झाडाच्या जुन्या फांद्या तोडणे आवश्यक आहे. अर्थात आपण फांद्यांची छाटणी आपण करायला हवी. त्यानंतर झाडांना बुरशी लागणार नाही यासाठी फवारणी करा. रोपाची माती थोडीशी सैल करा, ज्यामुळे त्यांना हवा आणि पोषकतत्वे मुळांपर्यंत सहज पोहोचू शकतील.
कॉटनची साडी नेसताना फुगते- निऱ्या घालताना त्रास? ५ टिप्स - १५ मिनिटांत नेसा कॉटनची साडी चापूनचोपून
गुलाबांच्या वाढीसाठी संतुलित पोषण खूप महत्त्वाचे आहे. यानंतर जुने शेणखत किंवा गांडुळ खत जमिनीत मिसळा. यात NPK (नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम) घाला. फॉस्फरस फुलांच्या आणि मुळांच्या विकासात मदत करतो. १५-२० दिवसांनी मोहरीच्या पेंडीचे द्रव खत देणे देखील रोपासाठी फायदेशीर आहे. गुलाबाच्या रोपाला दररोज किमान ६ त ८ तास थेट सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. ऑक्टोबर महिन्यात तापमान कमी होण्यास सुरुवात होते, म्हणून गुलाबांना जास्त पाणी देणे टाळा. केळीची साल,चहाची पाने किंवा गुळाचे पाणी फॉस्फरस आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे. ताक किंवा दह्याचे पाणी खतामध्ये घातल्यास जमिनीत बुरशी वाढण्यापासून रोखते.
Web Summary : October is ideal for rose plant revival. Prune, fertilize with NPK and organic options like banana peels, and ensure 6-8 hours of sunlight. Avoid overwatering. These steps will help your rose bush bloom beautifully.
Web Summary : अक्टूबर गुलाब के पौधे को पुनर्जीवित करने के लिए आदर्श है। छंटाई करें, एनपीके और केले के छिलके जैसे जैविक विकल्पों के साथ खाद डालें, और 6-8 घंटे धूप सुनिश्चित करें। अधिक पानी देने से बचें। ये उपाय आपके गुलाब के पौधे को खूबसूरती से खिलने में मदद करेंगे।