Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > शेंगा खा टरफले बागेला द्या! बागेतली माती कसदार करतात टरफले, 'असे ' वापरा आणि पाहा बागेचा कायापालट

शेंगा खा टरफले बागेला द्या! बागेतली माती कसदार करतात टरफले, 'असे ' वापरा आणि पाहा बागेचा कायापालट

How to Reuse Peanut Shell?: भुईमुगाच्या शेंगा खाऊन त्यांची टरफलं कचऱ्यामध्ये टाकत असाल तर लगेच थांबा आणि हे वाचा....(use of peanut shell for gardening)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2026 12:58 IST2026-02-04T12:58:02+5:302026-02-04T12:58:52+5:30

How to Reuse Peanut Shell?: भुईमुगाच्या शेंगा खाऊन त्यांची टरफलं कचऱ्यामध्ये टाकत असाल तर लगेच थांबा आणि हे वाचा....(use of peanut shell for gardening)

how to reuse peanut shell, benefits of peanut shell, use of peanut shell for gardening, gardening tips using peanut shell | शेंगा खा टरफले बागेला द्या! बागेतली माती कसदार करतात टरफले, 'असे ' वापरा आणि पाहा बागेचा कायापालट

शेंगा खा टरफले बागेला द्या! बागेतली माती कसदार करतात टरफले, 'असे ' वापरा आणि पाहा बागेचा कायापालट

Highlightsभुईमुगाच्या शेंगांची टरफलं आपल्याला गार्डनिंगच्या कामात खूप उपयोगी येऊ शकतात..

भुईमुगाच्या शेंगा हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. ज्या व्यक्तींना पोह्यातले, चिवड्यामधले शेंगदाणे आवडत नाहीत, अशा व्यक्तीही भुईमुगाच्या शेंगा अगदी आवडीने खातात. शिवाय या शेंगांचा मोह असा असतो की त्या एकदा खायला सुरुवात केली की पटकन थांबावेसे वाटतच नाही. त्यामुळे आपण भराभर शेंगा खातो आणि नंतर सगळे टरफलं कचऱ्यात टाकून देतो (how to reuse peanut shell?). पण असं करणं थांबवायला हवं (use of peanut shell for gardening). कारण भुईमुगाच्या शेंगांची टरफलं आपल्याला गार्डनिंगच्या कामात खूप उपयोगी येऊ शकतात.(gardening tips using peanut shell)

 

भुईमुगाच्या शेंगाच्या टरफलांचा उपयोग गार्डनिंगसाठी कसा करायचा?

१. आता काही दिवसांतच उन्हाळा येणार आहे. उन्हाळ्यात रोपांना अगदी रोजच्या रोज पाणी द्यावं लागतं. तरीही ते सुकून जातात. कारण उन्हामुळे माती लगेच कोरडी पडते.

घरीच करा अगदी रेस्टॉरंटसारखा चीज चिली टोस्ट! संध्याकाळची छोटीशी भूक भागविण्यासाठी सुपरटेस्टी पदार्थ..

यावेळी शेंगांची टरफलं खूप उपयोगी ठरतात. प्रत्येक कुंडींंमध्ये मातीच्या वर शेंगांची टरफलं व्यवस्थित पसरवून ठेवली तर त्यामुळे मातीला थेट ऊन लागत नाही आणि जमिनीतला ओलावा टिकून राहण्यास मदत होते. 

 

२. जेव्हा आपण नवं रोप लावण्यासाठी कुंडीमध्ये माती भरतो तेव्हा सगळ्यात खाली दगड- विटांचे तुकडे घालतो. कारण यामुळे पाण्याचा योग्य तो निचरा होण्यास मदत होते. रोपांची मुळं सडत नाहीत. अशावेळी दगड- विटांच्या ऐवजी आपण कुंडीमध्ये शेंगांची टरफलं घालू शकतो. पण हा प्रयोग छोटी रोपं लावण्यासाठी असणाऱ्या छोट्या कुंड्यांमध्येच करावा.

आधी नाश्ता करा! बॅड कोलेस्टेरॉल आणि शुगर कमी करायची तर ‘असा’ नाश्ता करा पोटभर निवांत

३. कुंडीतली माती चिकट न होता भुसभुशीत राहावी यासाठी मातीमध्ये कोकोपीट मिसळले जाते. कोकोपीटमध्ये पैसे खर्च करण्याऐवजी शेंगांची टरफलं थोडी उन्हामध्ये वाळवून घ्या. त्यानंतर ती मिक्सरमधून बारीक करून घ्या. आता हे मातीमध्ये मिसळा. यामुळे माती भुसभुशीत राहील आणि मुळापर्यंत व्यवस्थित ऑक्सिजन पोहोचेल. 

 

Web Title : स्वस्थ मिट्टी के लिए अपने बगीचे में मूंगफली के छिलके का उपयोग करें।

Web Summary : मूंगफली के छिलके नमी बनाए रखने, जल निकासी में सुधार करने और मिट्टी को हवादार बनाने में मदद करते हैं। बेहतर पौधे विकास के लिए उन्हें गीली घास, जल निकासी परत या मिट्टी संशोधन के रूप में उपयोग करें।

Web Title : Use peanut shells in your garden for healthier soil.

Web Summary : Peanut shells benefit gardens by retaining moisture, improving drainage, and aerating soil. Use them as mulch, drainage layers, or soil amendments for better plant growth.