Lokmat Sakhi >Gardening > कुंडीतल्या रोपांच्या अनेक समस्यांवर एक खास उपाय - इवलासा तुरटीचा खडा! पाहा ‘कसा’ वापरायचा...

कुंडीतल्या रोपांच्या अनेक समस्यांवर एक खास उपाय - इवलासा तुरटीचा खडा! पाहा ‘कसा’ वापरायचा...

How To Protect Plants From Ants Dryness & Fungus By Using Alum Or Fitkari In Winter : Alum use in Garden Plants to get Flowers Remove Ants : grow plant faster using alum Fitkari : Protect Plants By Using Alum : बागेत तुरटी वापरल्याने झाडांची वाढ चांगली होईल आणि फुलंसुद्धा भरपूर येतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2025 09:06 IST2025-01-21T08:49:33+5:302025-01-21T09:06:43+5:30

How To Protect Plants From Ants Dryness & Fungus By Using Alum Or Fitkari In Winter : Alum use in Garden Plants to get Flowers Remove Ants : grow plant faster using alum Fitkari : Protect Plants By Using Alum : बागेत तुरटी वापरल्याने झाडांची वाढ चांगली होईल आणि फुलंसुद्धा भरपूर येतील.

How To Protect Plants From Ants Dryness & Fungus By Using Alum Or Fitkari In Winter Alum use in Garden Plants to get Flowers Remove Ants grow plant faster using alum Fitkari | कुंडीतल्या रोपांच्या अनेक समस्यांवर एक खास उपाय - इवलासा तुरटीचा खडा! पाहा ‘कसा’ वापरायचा...

कुंडीतल्या रोपांच्या अनेक समस्यांवर एक खास उपाय - इवलासा तुरटीचा खडा! पाहा ‘कसा’ वापरायचा...

आजकाल आपल्यापैकी बहुतेकजणांना गार्डनिंगची आवड असते. आवड म्हणून आपण घराच्या बाल्कनीत किंवा खिडकीत वेगवेगळ्या प्रकारची रोपं छोट्याशा कुंडीत लावतो. या रोपांची तितकीच (Alum use in Garden Plants to get Flowers Remove Ants) विशेष काळजी देखील घ्यावी लागते. वेळच्यावेळी या रोपांची योग्य ती काळजी घेतली नाही तर तर रोपं कोमेजून जातात. एवढंच नाही तर रोपांच्या अनेक समस्या देखील निर्माण (How To Protect Plants From Ants Dryness & Fungus By Using Alum Or Fitkari In Winter) होतात. काहीवेळा रोपांची विशेष काळजी घेऊन देखील रोपं कोमेजतात, सुकतात. तर कधी फळं - फुलं येण्याचं प्रमाण कमी होत( grow plant faster using alum Fitkari).

कधी रोपांची वाढ खुंटते अशा अनेक समस्या निर्माण होतात. याचबरोबर, रोपांची मुळ खराब होऊन कुजू लागतात, रोपांच्या मुळाशी मुंग्या लागतात. अशा अनेक तक्रारी अनेकजण कायम करतात. रोपांच्या या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करुन पाहतो. कधी कीटकनाशक तर कधी खत आणि औषधी फवारणी असे अनेक नानाविविध (Protect Plants By Using Alum) उपाय करतो. परंतु रोपांच्या या वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळे उपाय करण्यापेक्षा आपण घरातील नेहमीची एक पांढरी वस्तू वापरुन रोपांच्या अनेक समस्या चटकन दूर करु शकतो. रोपांच्या या अनेक समस्यांवर एकच असरदार असा रामबाण उपाय नेमका कोणता आहे ते पाहुयात. 

रोपांच्या अनेक समस्यांवर एक खास उपाय... 

पाण्यातील अशुद्धता कमी करण्यासाठी तसेच गाळ खाली बसण्यासाठी आपण पांढऱ्याशुभ्र तुरटीचा वापर करतो. रोपांच्या अनेक समस्यांवर आपण याच तुरटीचा असरदार उपाय करु शकतो.तुरटीमध्ये असलेले ॲल्युमिनियम आणि पोटॅशियम सल्फेट रोपांच्या वाढीसोबतच मुळांना देखील मजबूत करतात. याशिवाय तुरटी कीटकनाशक म्हणून देखील काम करते. रोपांच्या कुंडीत तुरटी घातल्याने त्यावर अधिक फळं फुल येऊ लागतात. रोपांची निगा राखण्यासाठी तुरटी कोणत्या दोन प्रकारे रोपांसाठी वापरली जाऊ शकते ते पाहूयात. 

थंडीत रोपांभोवती मुंग्यांच्या रांगा दिसतात? कुंडीत ४ घरगुती पदार्थ घाला, मुंग्या जातील...

१. तुरटीचे पाणी :- रोपांसाठी तुरटीचे पाणी तयार करण्यासाठी प्रथम एका भांड्यात पाणी घ्या, तुरटी बारीक करा किंवा त्यात त्याचे तुकडे पाण्यांत घाला. आता चमच्याच्या मदतीने मिक्स करा आणि द्रावण तयार करा. तुम्ही हे द्रावण कोणत्याही रोपांवर फवारू शकता. तुरटीचे पाणी एक दिवसाआड रोपांवर फवारावे. 

थंडीत मनी प्लांटची मुळे कुजून खराब होतात? १ सिक्रेट पदार्थ, हिवाळ्यातही मनी प्लांट दिसेल तरतरीत...

२. तुरटीचे तुकडे :- तुरटीचे लहान आकाराचे तुकडे करुन आपण मातीत ठेवू शकता.  याशिवाय तुम्ही हे तुकडे कागदात गुंडाळून मातीतही ठेवू शकता. यामुळे रोपांना कीड लागणे, बुरशी येणे किंवा मुंग्या लागणे अशा समस्यांपासून सुटका मिळू शकते. रोपांना मुंग्या किंवा कीटकांपासून वाचवण्यासाठी तुरटीचा वापर करायचा असेल तर त्यासाठी तुरटी कुंडीच्या तळाशी देखील ठेवू शकता किंवा कुंडीच्या मातीत मिसळू शकता. हे कीटकनाशक म्हणून काम करेल, ज्यामुळे झाडे वाढण्यास मदत होईल.

बरणीतील कॉफी सुकून गोळा झाली ? फेकून न देता, गार्डनिंगसाठी 'असा' करा वापर, रोपं येतील बहरुन...

Web Title: How To Protect Plants From Ants Dryness & Fungus By Using Alum Or Fitkari In Winter Alum use in Garden Plants to get Flowers Remove Ants grow plant faster using alum Fitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.