Join us

मनी प्लांटची पानं पिवळी पडली - मुळं कुजली? हळदीचा करून पाहा ‘असा’ उपयोग; वेल वाढेल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2024 16:52 IST

How to Prevent Yellowing of Money Plant Leaves? 3 Tips : मनी प्लांट वारंवार खराब होत असेल तर, स्वयंपाकघरातल्या 'या' ३ गोष्टी वापरुन पाहा..

बाल्कनी किंवा घराच्या अंगणात विविध प्रकारचे झाडे आपण लावतोच (Money Plant). यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहते. भारतीय घरांमध्ये तुळशीच्या झाडाव्यतिरिक्त मनी प्लांटही लावण्यात येते (Gardening Tips). मनी प्लांटचे अनेक फायदे आहेत. पण काहींचे मनी प्लांट लवकर खराब होते. पानं सुकतात, पिवळी पडतात. वेलीची व्यवस्थित वाढ होत नाही.

मनी प्लांटची व्यवस्थित काळजी घेतली तर ते वर्षानुवर्ष चांगले टिकते. पण त्याकडे दुर्लक्ष केले तर, ते रोप सुकत जाते. जर पावसाळा असूनही घरातलं मनी प्लांटच रोपटे सुकले असेल तर, मातीत ३ गोष्टी मिसळा. मातीत या ३ गोष्टी मिसळल्याने मनी प्लांटची योग्य वाढ होईल. शिवाय वेलही छान बहरेल(How to Prevent Yellowing of Money Plant Leaves? 3 Tips).

हळद

मनी प्लांटच्या उत्तम वाढीसाठी हळदीचा वापर करा. यासाठी कुंडीतल्या मातीत हळद मिसळा. हळदीतील गुणधर्मामुळे झाडामध्ये बुरशी तयार होणार नाही. त्यातील पोषक तत्वांमुळे मनी प्लांट वेगाने वाढू लागेल. हवं असल्यास आपण त्यात एप्सम मीठ देखील घालू शकता. यामुळे मनी प्लांटची पाने दाट आणि हिरवी होतील.

साडी नेसल्यावर शोभून दिसणाऱ्या ८ सुंदर हेअरस्टाईल, सोप्या -झटपट पण देतात रॉयल लूक

चहापत्ती

मनी प्लांटच्या उत्तम वाढीसाठी आपण घरगुती चहापत्तीचा वापर करू शकता. मनी प्लांटसाठी चहाची पाने सेंद्रिय खत म्हणून काम करतात. चहा तयार झाल्यानंतर उरलेली चहापत्ती फेकून देऊ नका. चहाची पानं स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. नंतर चहापत्ती मातीत मिसळा. यातील पोषक घटकांमुळे मनी प्लांटची उत्तम वाढ होईल.

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

मनी प्लांट हिरवेगार ठेवण्यासाठी इतर टिप्स

मनी प्लांट थेट सूर्यप्रकाशाजवळ ठेवू नका. यामुळे पानं पिवळी पडू शकतात. मनी प्लांटच्या भांड्यातील माती सुमारे १ इंच सुकल्यावरच झाडाला पाणी द्या. जास्त पाणी दिल्याने मुळे कुजतात आणि पानं सुकतात. मनी प्लांटच्या उत्तम वाढीसाठी ऊन, पाणी आणि  खत या तिन्ही गोष्टींची काळजी घ्या.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल