Join us

जास्वंदाच्या झाडाला फुलंच येत नाही? कांद्याच्या सालीचा करा 'असा' वापर; झाड बहरेल फुलांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2024 20:16 IST

How to make Onion Peel Fertilizer at Hibiscus Plant : जास्वंदाच्या कुंडीत कांद्याच्या सालीचा वापर करताच झाली जादू

बाल्कनीमध्ये आपण बरेच झाडं लावतो. ज्यात जास्वंदाच्या फुलाचा देखील समावेश आहे (Hibiscus Plant). लाल किंवा गुलाबी रंगाच्या जास्वंदामुळे बाल्कनी सुंदर दिसते. जास्वंदाचा फुलांमध्येही अनेक प्रकार आहेत. पांढरे, पिवळे किंवा आणखी वेगळ्या रंगाचे जास्वंद सध्या बाजारात मिळतात (Gardening Tips). ही फुलं डोळ्यांना पाहायलाही अतिशय छान वाटतात. पण यांची योग्य काळजी घेतली नाही तर, फुल लवकर कोमेजतात. त्यांना कीड लागते.

एकदा किड लागली की ती पूर्ण जाईपर्यंत काही केल्या रोपाला फुलं येत नाहीत. अशावेळी रोपाची काळजी कशी घ्यायची आणि किड जाण्यासाठी नेमकं काय करायचं हे समजून घेऊया. यासाठी एक घरगुती उपाय पुरेसं आहे(How to make Onion Peel Fertilizer at Hibiscus Plant).

पावसाळ्यात जास्वंदाच्या रोपाची कशी काळजी घ्याल?

कांद्याची साल

कांद्याची साल झाडांना फुलं येण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यातील पोटॅशियमस फॉस्फरस, सल्फर झिंक, मॅग्नेशियम झाडांच्या वाढीस मदत करतात. कांद्याची साल आपण सहसा फेकून देतो. पण कांद्याची साल फेकून देण्याऐवजी याचा वापर आपण झाडांसाठीही करू शकता. कांद्याच्या साली खताचे काम करतात, तसंच कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून त्यांचा चांगला फायदा होतो.

भात गिचका, पुऱ्या तेलकट; चपात्या फुलत नाही? १० सोप्या किचन टिप्स; चवदार होईल स्वयंपाक

जास्वंदाच्या झाडांना मोठी आणि लाल गडद फुलं यावी असं वाटत असेल तर, कांद्याच्या सालीचा वापर नेमका कसा करावा? पाहा.

कांद्याच्या सालीचे खत करण्यासाठी, एका बाऊलमध्ये कांद्याची साल घ्या, त्यात पाणी घाला. दोन दिवसांसाठी भिजत ठेवा. दोन दिवसांनंतर या पाण्याचा रंग बदलेला दिसेल, म्हणजेच आपलं हे जे खत आहे ते तयार होईल. पण या पाण्याचा वापर थेट करणं टाळा. पाण्यामध्ये डायल्यूट करून याचा वापर  खत म्हणून झाडाला करा.

रव्याचे लाडू फसतात-कडक किंवा मऊ होतात? १ कप रव्याचे लाडू करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी

सर्वात आधी हे पाणी एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या सहाय्याने गाळून घ्या. जेणेकरून यातील कण स्प्रे बॉटलमध्ये अडकणार नाहीत. स्प्रे बॉटलमध्ये भरल्यानंतर त्यात पाणी आणि लिंबाचा रस घाला, आणि झाडावर स्प्रे करा. लिंबाचा रस कुंडीतील माती ॲसिडीक करण्याचे काम करते. ज्यामुळे झाडांना भरपूर फुलं येतात. 

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल