Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागडी खतं कशाला? पपईच्या सालीपासून करा 'मॅजिकल' लिक्विड फर्टिलायझर; झाडांची वाढ होईल वेगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2026 16:11 IST

Papaya Peel Fertilizer: Organic Liquid Fertilizer: Bio-fertilizer from Kitchen Waste: मॅजिकल खत घरच्या घरी कसे तयार करायचे पाहूया.

आपल्या घरात, बाल्कनीत किंवा टेरेसावरती आपण झाडे लावतो. कुंडीतील रोपांना प्रेमाने जपतो पण अनेकदा रोपांची वाढ खुंटते किंवा त्यांना फुले- फळे येत नाहीत. अशावेळी आपण नर्सरीमधून महागडी रासायनिक खते विकत आणतो. ही खते तात्पुरता रिझल्ट देतात.पण यामुळे मातीचा कस कमी होतो.(Papaya Peel Fertilizer) आपल्याही बागेतील रोप नैसर्गिकरित्या टवटवीत आणि सशक्त बनवायची असतील तर पपईच्या सालीचे मॅजिकल लिक्विड फर्टिलायझर हा एक चांगला पर्याय आहे. (Organic Liquid Fertilizer)उन्हाळ्यात आपण पपई खाऊन त्याचे साली कचऱ्यात फेकून देतो. पण या सालींमध्ये पोटॅशियम, फॉरस्फर आणि मॅग्नेशिअम यांसारखे भरपूर घटक असतात.(Bio-fertilizer from Kitchen Waste) जे रोपांच्या मुळांना मजबूत करण्याचे काम करतात. पपईच्या सालीपासून बनवलेले हे खत झाडांसाठी एनर्जी ड्रिंकसारखे काम करते. हे खत पूर्णपणे सेंद्रिय असल्याने झाडांना कोणतेही नुकसान होत नाही.(Zero cost gardening tips) गुलाब, मोगरा, जास्वंद यांसारख्या फुलांच्या झाडांसाठी आणि टोमॅटो, मिरची यांसारख्या भाज्यांच्या रोपांसाठी हे खत अत्यंत प्रभावी ठरते. हे मॅजिकल खत घरच्या घरी कसे तयार करायचे पाहूया. 

कुकरमध्ये शिजवताना भात चिकट होतो- पाणी राहते? ५ सोप्या ट्रिक्स, हॉटेलसारखा मोकळा - दाणेदार पांढराशुभ्र होईल भात

खत बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

पपईची साल - २ ते ३ तुकडे पाणी - १ लिटर प्लास्टिकची बाटली गाळणी

खत बनवण्याची कृती 

पपईची खाल्ल्यानंतर त्याच्या साली फेकून देऊ नका, त्या जमा करा. या सालीचे छोटे छोटे तुकडे करा. ज्यामुळे त्यातील पोषक तत्वे पाण्यात लवकर विरघळतील. एका प्लास्टिकच्या डब्यात किंवा बाटलीत १ लिटर पाणी घ्या. आणि त्यात हे सालीचे तुकडे घाला. डब्याचे झाकण घट्ट लावून हा डबा साधारण २४ ते ४८ तास सावलीत ठेवा. सूर्यप्रकाशात ठेवू नका. दोन दिवसानंतर पाण्याचा रंग बदलेल. हे पाणी गाळून घ्या. सालींचे उरलेले तुकडे कंपोस्ट खतात घालू शकता. तयार झालेले द्रावण खूप कॉन्सन्ट्रेटेड असते. हे पाणी रोपांना घालण्यापूर्वी १ कप पपईचे पाणी त्यात ५ कप साधे पाणी असं मिश्रण तयार करा. 

तयार केलेले मिश्रण झाडाच्या मुळाशी मातीत घाला. यामुळे मुळे मजबूत होतील. एका स्प्रे बाटलीत हे द्रावण भरून झाडाच्या पानांवर फवारा. यामुळे पानांना चकाकी येते आणि झाडाची वाढ वेगाने होते. पपईमध्ये भरपूर पोटॅशियम असते. जे झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असते. या खतामुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. रासायनिक खतांमुळे माती कडक होते, मात्र या सेंद्रिय खतामुळे माती भुसभुशीत राहते. हे खत १५ दिवसांतून एकदा वापरायला हवे. खत देण्यापूर्वी माती उकरुन घेतल्यास मुळांपर्यंत लवकर पोहोचते. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Papaya peel fertilizer: Boost plant growth naturally, save money.

Web Summary : Make liquid fertilizer from papaya peels for healthy plant growth. Rich in potassium, phosphorus, and magnesium, it strengthens roots, boosts immunity, and improves soil. Use every 15 days for best results.
टॅग्स :बागकाम टिप्स