Lokmat Sakhi >Gardening > पावसाळ्यापूर्वी घरीच करा रोपांसाठी 'हे' खत, तुमच्या कुंडीतल्या रोपांना वर्षभर येतील सुंदर फुलं

पावसाळ्यापूर्वी घरीच करा रोपांसाठी 'हे' खत, तुमच्या कुंडीतल्या रोपांना वर्षभर येतील सुंदर फुलं

How To Make Fertilizer For Plants At Home: राेपांसाठी घरगुती खत तयार करून ठेवण्यासाठी उन्हाळा हा सगळ्यात उत्तम ऋतू आहे..(best home made fertilizer for plant growth)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2025 16:21 IST2025-05-13T15:26:48+5:302025-05-13T16:21:51+5:30

How To Make Fertilizer For Plants At Home: राेपांसाठी घरगुती खत तयार करून ठेवण्यासाठी उन्हाळा हा सगळ्यात उत्तम ऋतू आहे..(best home made fertilizer for plant growth)

how to make fertilizer for plants at home, homemade fertilizer for plants, gardening tips before monsoon start, how to prepare plants for monsoon | पावसाळ्यापूर्वी घरीच करा रोपांसाठी 'हे' खत, तुमच्या कुंडीतल्या रोपांना वर्षभर येतील सुंदर फुलं

पावसाळ्यापूर्वी घरीच करा रोपांसाठी 'हे' खत, तुमच्या कुंडीतल्या रोपांना वर्षभर येतील सुंदर फुलं

Highlightsरोपांना अनेक पौष्टिक घटक मिळतात आणि त्यामुळे त्यांची जोमाने वाढ होते.

उन्हाळ्याचे आता मोजकेच काही दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर वातावरण बदलून जाते. उष्णता कमी झाली नाही तरीही सोसाट्याचा वारा सुटतो, अधूनमधून ढग येतात आणि त्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होऊनच जाते. पाऊस पडला की आपली बागही कशी हिरवीगार होऊन जाते. उन्हामुळे थोडी फिकी पडलेली रोपं पावसाळ्यात मस्त खुलून येतात. पण या रोपांना जर तुम्ही घरी तयार केलेल्या एका खास घरगुती खताची जोड दिली तर मग मात्र तुमची रोपं नेहमीच छान हिरवीगार राहतील (how to make fertilizer for plants at home?). एवढंच नाही तर फुलझाडांना नेहमीच फुलंही येतील (homemade fertilizer for plants). त्यासाठी उन्हाळ्यातच एक मात्र मात्र नक्की करायला हवं.. ते कोणतं ते पाहूया..(how to prepare plants for monsoon?)

 

उन्हाळ्यात रोपांसाठी घरगुती खत कसं तयार करावं?

उन्हाळ्यात रोपांसाठी घरगुती खत कसं तयार करून ठेवावं याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ zatpat05 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

५ मिनिटांत होणारे ५ सोपे व्यायाम, थायरॉईड असेल तर नक्की करा! थायरॉईड वाढणार नाही

आता या पद्धतीने जर घरच्याघरी झाडांसाठी अतिशय उत्तम दर्जाचं खत तयार करायचं असेल तर त्यासाठी कांदे, बटाटे चिरल्यानंतर किंवा लसूण सोलल्यानंतर त्यांची सालं किंवा टरफलं अजिबात टाकून देऊ नका. बटाट्याच्या साली तसेच कांदे आणि लसूणची टरफलं एकत्र जमा करा आणि ती उन्हात कडक वाळवून घ्या. पुर्णपणे वाळल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्यांची पावडर तयार करा. ही पावडर एका डब्यात भरून ठेवा आणि साधारण १५ दिवसांत एक चमचा याप्रमाणे कुंडीतल्या मातीत मिसळा. यातून रोपांना अनेक पौष्टिक घटक मिळतात आणि त्यामुळे त्यांची जोमाने वाढ होते.

 

हा उपायही करा..

वरीलप्रमाणे तयार केलेले घरगुती खत रोपांसाठी निश्चितच फायदेशीर आहे. पण त्यासाेबतच तुम्ही आणखी दोन गोष्टीही त्या खतात मिसळू शकता. पहिली गोष्ट म्हणजे केळीची सालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे चहा पावडर. यासाठी केळी खाल्ल्यानंतर सालं कचऱ्यात टाकून न देता उन्हात वाळवायला ठेवा.

व्यायामासाठी वेळ नाही? मलायका अरोरा म्हणते फक्त २ मिनीट व्यायाम करा- वजन, पोट उतरेल भराभर

ती कडक वाळल्यानंतर मिक्सरमधून फिरवून त्यांची पावडर करून घ्या. ही पावडर रोपांना दिल्यामुळे त्यांची वाढ अधिक झपाट्याने होते. तसेच चहा गाळल्यानंतर गाळणीमध्ये जी चहा पावडर जमा होते, ती एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि नंतर ती सुद्धा उन्हात वाळवायला ठेवा. वाळलेली चहा पावडर नियमितपणे कुंडीमध्ये घातल्यास मातीचा कस सुधारण्यास नक्कीच मदत होते. 

 

Web Title: how to make fertilizer for plants at home, homemade fertilizer for plants, gardening tips before monsoon start, how to prepare plants for monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.