lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > कडीपत्ता टराटरा वाढला पण पानांचा पत्ता नाही, पानांना सुगंध नाही? ३ गोष्टी करा, बहरेल झाड

कडीपत्ता टराटरा वाढला पण पानांचा पत्ता नाही, पानांना सुगंध नाही? ३ गोष्टी करा, बहरेल झाड

Gardening Tips For kadipatta or Curry Plant: कडिपत्त्याचं रोप नुसतंच उंच होत असेल आणि त्यावर पानांपेक्षा जास्त काड्याच दिसत असतील तर कडिपत्त्याला पुन्हा एकदा चांगला बहर येण्यासाठी काही सोपे उपाय करून पाहा... (How to make curry plant bushy?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 03:19 PM2024-04-26T15:19:44+5:302024-04-26T15:30:10+5:30

Gardening Tips For kadipatta or Curry Plant: कडिपत्त्याचं रोप नुसतंच उंच होत असेल आणि त्यावर पानांपेक्षा जास्त काड्याच दिसत असतील तर कडिपत्त्याला पुन्हा एकदा चांगला बहर येण्यासाठी काही सोपे उपाय करून पाहा... (How to make curry plant bushy?)

How to make curry plant bushy, gardening tips for the fast growth of kadipatta or curry plant, best homemade fertilizers for curry plant, what to do if curry patta is dying | कडीपत्ता टराटरा वाढला पण पानांचा पत्ता नाही, पानांना सुगंध नाही? ३ गोष्टी करा, बहरेल झाड

कडीपत्ता टराटरा वाढला पण पानांचा पत्ता नाही, पानांना सुगंध नाही? ३ गोष्टी करा, बहरेल झाड

Highlightsकडिपत्त्याच्या झाडाला नायट्रोजनयुक्त खताची गरज असते. नायट्रोजन असणारं खत मिळालं तर त्याची भराभर वाढ होते.

कडिपत्त्याचं रोप बहुतांश घरांमध्ये असतंच. कारण तो स्वयंपाकात अतिशय उपयोगी ठरतो. शिवाय आपल्या अंगणात फुललेला कडिपत्ता ताजा- ताजा तोडून भाजीमध्ये, वरणात घालण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे बरेचजण हौशीने कडिपत्त्याचं रोप कुंडीत लावतात. पण बऱ्याचदा असं होतं की कडिपत्ता नुसताच उंच वाढत जातो. त्याला पानं कमी आणि काड्याच जास्त दिसतात. तुमच्या कडिपत्त्याच्या बाबतीतही असंच होत असेल तर हे काही साधे, सोपे उपाय करून पाहा (How to make curry plant bushy?). यामुळे काही आठवड्यातच कडिपत्ता हिरव्यागार पानांनी बहरून छान भरगच्च दिसेल... (gardening tips for the fast growth of kadipatta)

 

कडिपत्ता भरगच्च बहरून यावा यासाठी टिप्स

१. सुर्यप्रकाश

कडिपत्त्याच्या झाडाला भरपूर सुर्यप्रकाशाची गरज असते. त्यामुळे तो अशा ठिकाणी ठेवा जिथे ५ ते ६ तास त्याला दररोज थेट सुर्यप्रकाश मिळेल. याशिवाय तो मोकळ्या हवेत असावा. जेणेकरून त्याची चांगली वाढ होईल.

 

 

 

फक्त १ चमचा हळद केसांवर करेल कमाल, केस होतील दाट- लांब, बघा कसा करायचा वापर

२. छाटणी 

कडिपत्त्याच्या रोपाची वेळोवेळी छाटणी करणे आवश्यक आहे. जर तो वेळोवेळी छाटला तरच त्याला नवी पालवी फुटेल आणि तो उंच वाढण्याऐवजी पसरट होऊन भरगच्च वाढायला लागेल. फेब्रुवारी ते ऑक्टोबर या दरम्यान कडिपत्त्याची वेळोवेळी छाटणी करावी.

 

३. माती

कडिपत्त्याच्या झाडाला थोडी भुसभशीत माती लागते. त्यामुळे दर २ ते ३ महिन्यांनी कुंडीतली माती आजुबाजुने थोडी उकरून घ्या आणि त्यामध्ये खत टाका. यामुळे झाडाला उत्तम पोषण मिळेल.

सुटीत मुलं सतत टीव्ही- मोबाईल बघतात? ५ गोष्टी करा, चांगल्या सवयी लागतील- स्क्रिनपासून दूर होतील

४. खत

कडिपत्त्याच्या झाडाला नायट्रोजनयुक्त खताची गरज असते. नायट्रोजन असणारं खत मिळालं तर त्याची भराभर वाढ होते. त्यासाठी तुम्ही बाजारात मिळणारे नायट्रोजनयुक्त खत टाकू शकता. किंवा ताक हे कडिपत्त्यासाठी सर्वोत्तम खत आहे. पण खराब वास येणारं ताक कडिपत्त्याला टाकू नका. ते त्यासाठी चांगलं नसतं. जे ताक तुम्ही पिऊ शकता, ज्याची चव चांगली आहे, तेच ताक कडिपत्त्यासाठी पोषक आहे. साधारण १ ग्लास ताक असेल तर ते १ लीटर पाण्यात मिसळून कडिपत्त्याला द्या. 

 

Web Title: How to make curry plant bushy, gardening tips for the fast growth of kadipatta or curry plant, best homemade fertilizers for curry plant, what to do if curry patta is dying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.