Join us  

कुंडीतल्या रोपांवर कीड पडणार नाही, घरीच तयार करा १००% ऑर्गेनिक किटकनाशक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 3:32 PM

How To Make Pesticide For Plants: घरातल्या बागेसाठी घरगुती पद्धतीने किटकनाशक औषध कसं तयार करायचं ते पाहूया... (Home remedies for healthy plants)

ठळक मुद्देझाडांवर कोणताही रोग पडलेला नसेल तरीही महिन्यातून एकदा सगळ्या रोपांवर हे पाणी शिंपडायला काहीच हरकत नाही.

घरासमोर किंवा घराच्या अवतीभवती हिरवीगार रोपं असतील तर आपोआपच घर, अंगण कसं फ्रेश वाटू लागतं. हिरवीगार, टवटवीत फुललेली झाडं पाहताच आपलं मनही प्रसन्न होतं. पण याच झाडांवर जर एखादा रोग पडला तर मात्र हिरवंगार रोपही सुकून जातं. कधी कधी रोग पडल्याने पानं गळू लागतात. रोपाला मुंग्या लागतात, फुलांचा आकार लहान होऊन जातो किंवा मग रोपांवर लहान- लहान बारीक किडे दिसू लागतात. फांद्यांवर, फुलांवर, पानांखाली कधी पांढरा मावाही दिसू लागतो (Home remedies for healthy plants). असा कोणताही रोप तुमच्या बागेतल्या झाडांवर पडला असेल तर घरच्याघरी हे एक किटकनाशक तयार करा (How to take care of plants) आणि काही दिवस रोपांवर शिंपडून पाहा. (How to make 100 percent organic homemade pesticide for plants)

 

झाडांसाठी किटकनाशक कसं तयार करायचं?

झाडांसाठी १०० टक्के ऑर्गेनिक किटकनाशक कसं तयार करायचं, याचा व्हिडिओ glitters.of.nature या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडिओमध्ये किटकनाशक तयार करण्यासाठी जे पदार्थ वापरायला सांगितले आहेत, ते सर्वसामान्यपणे कोणत्याही स्वयंपाक घरात अगदी सहज मिळतील असेच आहेत.

करिना कपूरच्या चमचमत्या अनारकलीवर १ लाखांपेक्षाही जास्त आरसे, बघा त्याची न्यारीच नजाकत...

त्यासाठी ७ ते ८ हिरव्या मिरच्या, आल्याचा एक लहानसा तुकडा आणि एखादा लसूण घ्या. हे तिन्ही पदार्थ मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करून घ्या. 

१ लीटर पाण्यामध्ये ही पेस्ट टाका आणि २ ते ३ दिवस हे पाणी उन्हामध्ये ठेवून द्या. २ ते ३ दिवसांनी हे पाणी चांगले फर्मेंट होईल. 

 

फर्मेंट झालेलं पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा भरून हळद टाका. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एक स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवून द्या.

पिठलं करताना त्यात बेसनाच्या गाठी होतात? पिठलं एकदम परफेक्ट होण्यासाठी लक्षात ठेवा ३ टिप्स 

ज्या रोपांवर रोग पडला आहे, त्या रोपांवर सायंकाळच्यावेळी हे पाणी शिंपडा.

झाडांवर कोणताही रोग पडलेला नसेल तरीही महिन्यातून एकदा सगळ्या रोपांवर हे पाणी शिंपडायला काहीच हरकत नाही. त्यामुळे रोपं नेहमीच चांगली टवटवीत आणि हिरवीगार राहतील. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सपाणी