आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाल्कनीत, अंगणात किंवा खिडकीजवळ कोरफडीची एक तरी कुंडी असते. हिरवागार कोरफड पाहिला की मनाला देखील प्रसन्न वाटते. कोरफड हे फक्त रोप नसून आरोग्याचा आणि सौंदर्याचा खजिना आहे. त्वचेची जळजळ कमी करणे, केसांचे आरोग्य सुधारणे यावर कोरफड रामबाण ठरते.(Summer gardening hacks for aloevera) त्यामुळे अनेकांच्या बाल्कनीत कोरफडचे रोप पाहायला मिळतं.(How to keep aloe vera green in summer) दिसायला राकट आणि कमी देखभालीचे वाटणारे हे रोप प्रत्यक्षात खूप संवेदनशील असते, विशेषतः उन्हाळ्यात. अनेकदा आपण नर्सरीतून हिरवेगार रोप आणतो, पण काही दिवसांतच ते पिवळे पडू लागते किंवा त्याची पाने सुकू लागतात.(gardening tips)कडक ऊन आणि पाण्याची चुकीची पद्धत कोरफडीच्या मुळांना सडवू शकते. जर तुमच्याही कुंडीतील कोरफड निस्तेज झाली असेल, तर घाबरण्याचे कारण नाही. कोरफड लावण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवल्या तर रोप नेहमीच हिरवेगार राहिल.
कोरफड हे वाळवंटी भागातील रोप असल्याने त्याला जास्त पाणी लागत नाही. पण अति उष्णतेपासून त्याचे रक्षण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोरफड पिवळी पडण्याचे कारण म्हणजे कुंडीत साचलेले पाणी. कोरफडीसाठी नेहमी पाणी वाहून जाणारी माती वापरा. साध्या मातीत थोडी वाळू किंवा कोळशाचे तुकडे मिसळल्यास पाण्याचा निचरा चांगला होतो. कुंडीला खाली छिद्र असल्याची खात्री करा. ज्यामुळे जास्तीचे पाणी बाहेर पडेल.
कोरफडच्या रोपाला सूर्यप्रकाश देणे महत्त्वाचं आहे. पण कडाक्याच्या उन्हात पाने जळतात, त्यामुळे ती पिवळी किंवा तपकिरी होतात. त्यासाठी उन्हाळ्यात कोरफडीची कुंडी अशा ठिकाणी ठेवा. जिथे फक्त सकाळी २ ते ३ तास ऊन मिळेल. दुपारच्या वेळी सावली मिळेल.
कुंडीत रोज पाणी घालू नका. फिंगर टेस्ट करा. कुंडीतील माती वरून १-२ इंच कोरडी वाटली तरच पाणी द्या. उन्हाळ्यात साधारणपणे २-३ दिवसातून एकदा पाणी देणे पुरेसे असते. पाणी नेहमी मुळाशी द्या, पानांवर साचू देऊ नका.
रासायनिक खतांऐवजी घरगुती खतांचा वापर करा. वापरून झालेली चहा पावडर किंवा तांदूळ धुतलेले पाणी महिन्यातून एकदा मातीत घाला. यामुळे मातीचा पोत सुधारतो आणि रोपाला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. जर कुंडीत रोपाच्या बाजूला छोटी छोटी नवीन रोपे येत असतील, तर ती दुसऱ्या कुंडीत लावा. गर्दी झाल्यामुळे मुख्य रोपाची वाढ खुंटते. जर पाने सुकली असतील, तर ती स्वच्छ कात्रीने कापून टाका, जेणेकरून रोपाची ऊर्जा नवीन पानांच्या वाढीसाठी वापरली जाईल.
Web Summary : Keep potted aloe vera green this summer with proper drainage, indirect sunlight, and infrequent watering. Use homemade fertilizer and repot crowded plants for healthy growth.
Web Summary : गमले में लगे एलोवेरा को गर्मियों में उचित जल निकासी, अप्रत्यक्ष धूप और कभी-कभार पानी देकर हरा-भरा रखें। स्वस्थ विकास के लिए घरेलू खाद का उपयोग करें और भीड़भाड़ वाले पौधों को दोबारा लगाएं।