Join us

लालचुटूक टोमॅटोने बहरुन जाईल रोप! कुंडीत ३ खतं घाला- कुंडीतल्या रोपालाही येतील भरपूर टोमॅटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 13:28 IST

How to grow tomato plant at home: Tomato plant growing fast: Home gardening tips for tomatoes: Tomato plant care tips:रोपाला टोमॅटो येण्यासाठी कोणती खतं घालावी ज्यामुळे त्याला चांगले पोषण मिळेल पाहूया.

हल्ली बऱ्यापैकी लोकांना ताजे आणि फ्रेश पदार्थ खायला आवडतात. बाजारात भाज्या आणि फळांवर मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते.(Secret tips to grow tomatoes faster at home) ज्यामुळे ती वापरताना आपल्या मनात शंका उभी राहाते. आपल्यापैकी अनेकांना बाल्कनीत झाडे लावण्याची आवड असते.(Best way to increase tomato plant growth) काही नाही तर निदान रोजच्या वापरतील फळभाज्या किंवा सुगंधित फुलाचे एक तरी झाड आपल्या बाल्कनीत असावं असं प्रत्येकाला वाटतं. (How to grow healthy tomato plants in pots)तुळशी, मोगरा, कढीपत्ता, लिंबू, कोथिंबीर यांसारखी रोप आपण हमखास लावतो.(Simple gardening hacks for tomato plants) पण टोमॅटोचे रोप लावताना ती अनेकदा लवकर पिकत नाही. हिरवीच राहातात किंवा रोप सुकून जाते.(Natural fertilizers for fast tomato growth) भाज्यांच्या बिया किंवा रोपे लावून जास्त फळे मिळवणे कोणालाही सोपे नाही. परंतु, त्याची व्यवस्थितरित्या काळजी घेतली तर आपल्या अंगणात लालचुटूक टोमॅटो नक्कीच बहरु शकतो.(How to make tomato plants grow taller and stronger) रोपाला टोमॅटो येण्यासाठी कोणती खतं घालावी ज्यामुळे त्याला चांगले पोषण मिळेल पाहूया. 

कापूर म्हणजे नवसंजीवनी! ४ खतं घाला- अंगणात दरवळेल कापूराचा सुगंध, पाहा काय करायचे..

1. खडूचा वापर 

आपल्या टोमॅटोच्या रोपाला भरपूर टोमॅटो येण्यासाठी आपल्याला खडूचा वापर करावा लागेल. यासाठी आपल्याला कुंडीत खडू पेरावा. जेव्हा आपण रोपाला पाणी घालू तेव्हा हा खडू मातीमध्ये विरघळेल. रोपाला पुरेशा प्रमाणात कॅल्शियम मिळत नसेल तर खडू त्याला पोषण देण्याचे काम करतो. पोषकतत्वांची कमतरता पूर्ण करते. जसे आपल्याला कॅल्शियमची आवश्यता असते तसेच रोपाला देखील कॅल्शियम हवे असते. त्यासाठी काही आवश्यक पोषक घटक वनस्पतीच्या मुळांमध्ये शोषण्यास मदत करतात. वनस्पतींच्या पेशी तयार करण्यास आणि त्या वाढवण्यास खडूचा वापर महत्त्वाचा ठरतो. 

2. ताक 

ताक आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्याचे द्रावण तयार करा. हे पाणी आपण रोपाला खत म्हणून घालू शकतो. आठवड्यातून एक दिवस हे पाणी रोपाला घालावे. उन्हाळ्यात रोपांसाठी ताक खत म्हणून कार्य करते. 

3. उपयुक्त असणारे खत 

बाजारात मिळणारे द्रवरुप शेणखत हे रोपाची वाढ करण्यास मदत करते. तसेच रोप सुकत देखील नाही. उन्हाळ्यात कडुलिंबाचा पेंड थंड खत म्हणून वापरला जातो. तसेच झाडे किंवा वनस्पतींची सुकलेली- गळलेली पाने देखील खत म्हणून वापरली जातात. 

टॅग्स :बागकाम टिप्स