Join us

पाण्याच्या बाटलीतही मनी प्लांट वाढेल टराटरा, ४ टिप्स- पैशाच्या वेलीला येईल बहर-घर दिसेल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2024 17:51 IST

How to Grow Money Plant in Water| About Money Plant Gardening Tips : पाण्याच्या खराब बाटल्या फेकून नका देऊ; त्यात सुंदर मनी प्लांट लावा..

बऱ्याच लोकांना घरात मनी प्लांट ठेवायला आवडतं (Money Plants). काही लोक कुंडीत तर काही जण पाण्यात मनी प्लांट लावतात. पण अनेकदा हे रोप सुकतं किंवा वेलीची व्यवस्थित वाढ होत नाही (Gardening Tips). मनी प्लांटची व्यवस्थित काळजी घेतली तर ते वर्षानुवर्ष चांगले राहते. घरात मनी प्लांट लावल्याने सकारात्मक वातावरण तयार होते.

जर मनी प्लांट घरात नसेल तर तुम्ही बााजाारातून लहान रोप आणू शकता किंवा काचेच्या पाण्याच्या बाटलीतही उगवू शकता. पण काहींना मनी प्लांट पाण्याच्या बाटलीमध्ये लावायचे कसे हा प्रश्न पडतो. जर आपण कुंडीत नसून पाण्याच्या बाटलीमध्ये मनी प्लांट लावत असाल तर, काही टिप्स लक्षात ठेवा. या टिप्समुळे मनी प्लांट वर्षानुवर्षे हिरवेगार राहील. आणि त्याची वाढही उत्तम होईल(How to Grow Money Plant in Water| About Money Plant Gardening Tips).

बाटलीत मनी प्लांट कसा लावायचा?

- सर्वात आधी मनी प्लांटची पिवळी पानं आणि फांद्या कटर किंवा कात्रीने छाटून घ्या.

'ये दूरियां भी है जरूरी!’ नात्यात ब्रेक घेण्याचा तरुण जोडप्यांचा नवा ट्रेण्ड, कचाकचा भांडण्यापेक्षा..

- जर आपण मनी प्लांट पाण्यात लावत असाल तर, दर १५ ते २० दिवसांनी पाणी बदलत राहा. शिवाय जेव्हा मनी प्लांटचे पाणी बदलाल तेव्हा त्यात एस्पिरिनची गोळी घाला. यामुळे मनी प्लांटची वाढ होण्यास मदत होईल.

- मनी प्लांटचा नोड नेहमी पाण्याखाली ठेवावा, अन्यथा वाढ योग्यरित्या होणार नाही.

पांढरे केस - हेअर फॉलही जास्त होतो? खोबरेल तेलात मिसळा २ गोष्टी; केस होतील दाट - दिसतील सुंदर

- मनी प्लांटची वाढ झपाट्याने व्हावी असे वाटत असेल तर, पाण्यात ४- ५ दाणे डीएपी खत घाला. पाण्यात उगवलेल्या मनी प्लांटला कोणत्याही खताची तशी गरज नसते. स्वच्छ पाण्यात ते चांगले वाढते.

- जर मनी प्लांट आपण कुंडीत लावत असाल तर, मोठ्या कुंडीत रोप लावा. नंतर त्यात माती भरा. खताचा लवकर वापर करू नका. कारण खतामुळे मुळे कुजू शकतात. शिवाय मनी प्लांटला दररोज पाणी देऊ नका. असे केल्याने त्याची वाढ चांगली होणार नाही. 

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल