Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > गार्डनिंगची हौस फार पण जागा नाही, बाल्कनीपण लहान? डोण्ट वरी-५ टिप्स, कमी जागेतही भरगच्च फुलेल सुंदर बाग

गार्डनिंगची हौस फार पण जागा नाही, बाल्कनीपण लहान? डोण्ट वरी-५ टिप्स, कमी जागेतही भरगच्च फुलेल सुंदर बाग

Gardening Tips For Small Balcony Spaces: ज्यांची बाल्कनी किंवा टेरेस खूप लहान आहे पण गार्डनिंगची खूप आवड आहे, अशा लोकांसाठी या काही टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील..(how to decorate small balcony with maximum plants?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2026 17:37 IST2026-01-10T15:42:28+5:302026-01-10T17:37:15+5:30

Gardening Tips For Small Balcony Spaces: ज्यांची बाल्कनी किंवा टेरेस खूप लहान आहे पण गार्डनिंगची खूप आवड आहे, अशा लोकांसाठी या काही टिप्स नक्कीच उपयोगी ठरतील..(how to decorate small balcony with maximum plants?)

how to grow maximum plants in small balcony? gardening tips for small balcony spaces, how to decorate small balcony with maximum plants | गार्डनिंगची हौस फार पण जागा नाही, बाल्कनीपण लहान? डोण्ट वरी-५ टिप्स, कमी जागेतही भरगच्च फुलेल सुंदर बाग

गार्डनिंगची हौस फार पण जागा नाही, बाल्कनीपण लहान? डोण्ट वरी-५ टिप्स, कमी जागेतही भरगच्च फुलेल सुंदर बाग

Highlightsघराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्येही छान- छान रोपं ठेवून तुम्ही गार्डनिंगची हौस भागवू शकता. 

घराभोवती मोकळं अंगण असलं की त्यात आपल्याला हवी तशी रोपं लावता येतात आणि घराभोवती छान बाग फुलवता येते. पण हल्ली मात्र अशी मोकळी घरं खूप कमी होत आहेत आणि त्या तुलनेत फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशावेळी मग ज्यांना गार्डनिंगची किंवा खूप सारी रोपं लावून घर सजविण्याची हौस असते त्यांची फार कुचंबना होते. जागेअभावी त्यांना त्यांची गार्डनिंगची हौस भागवता येत नाही (how to grow maximum plants in small balcony?). अशावेळी काय करावं आणि छोट्याशा बाल्कनीचा किंवा टेरेसचा वापर करूनही आहे त्या लहान जागेत छान बाग कशी फुलवावी (gardening tips for small balcony spaces) यासाठी या काही खास टिप्स.(how to decorate small balcony with maximum plants?) 

लहानशा बाल्कनीमध्ये किंवा टेरेसमध्ये जास्तीतजास्त रोपं कशी लावावी?

 

१. जर तुमच्याकडे रोपं लावण्यासाठी जागा कमी असेल तर तुम्ही अशी रोपं निवडायला हवी जी लहान आकाराच्या कुंडीतही भरपूर वाढतात. त्यामुळे मग तुलनेने त्या कुंड्या ठेवण्यासाठी जागा कमी लागते.

२. हँगिंग कुंड्याचा वापर करूनही तुम्हाला तुमची बाल्कनी छान सजवता येईल. त्या कुंड्यांमध्ये तुम्ही ऑफिस टाईम, चिनी गुलाब, स्पायडर प्लांट अशी रोपं लावू शकता.

कोल्हापूरचा प्रसिद्ध व्हेज पांढरा रस्सा, हिवाळ्यात करून खायलाच हवा- शाकाहारी लोकांसाठी झणझणीत बेत

३. हल्ली व्हर्टिकल गार्डनिंगचा खूप ट्रेण्ड आहेत. त्यासाठीचे कित्येक आकर्षक स्टॅण्ड देखील बाजारात, नर्सरीमध्ये मिळतात. किंवा ऑनलाईन शाॅपिंग साईटवरूनही तुम्ही ते मागवू शकता. या स्टॅण्डचा वापर करून तुम्ही एकावर एक या पद्धतीने भरपूर वेगवेगळी रोपं लावू शकता.

 

४. तुमच्या बाल्कनीमध्ये ऊन किती प्रमाणात येतं, ते किती तास असतं याचंही एकदा निरिक्षण करा आणि त्यानुसार रोपांची खरेदी करा. जेणेकरून उन्हाअभावी रोपं खराब होणार नाहीत आणि वारंवार त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागणार नाही.

काळेभोर, लांब, दाट केस हवे? 'या' गुलाबी पाण्याने केस धुवा, केस गळणं थांबून भराभर वाढतील

५. बाल्कनी लहान असली तरी घरातही तुम्ही वेगवेगळे इनडोअर प्लांट्स ठेवू शकता. लिव्हिंग रूममध्ये, बेडरुममध्ये, किचनमध्ये अगदी बाथरुममध्येही हल्ली वेगवेगळी लहानलहान रोपं ठेवण्याचा ट्रेण्ड आहे. त्यांच्यामुळे तुमच्या घराला नक्कीच जिवंतपणा मिळतो. घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्येही छान- छान रोपं ठेवून तुम्ही गार्डनिंगची हौस भागवू शकता. 

 

Web Title : छोटी बालकनी में बागवानी: सीमित जगह में अधिकतम पौधे लगाएं।

Web Summary : इन टिप्स के साथ अपनी छोटी बालकनी के बगीचे को अधिकतम करें! कॉम्पैक्ट पौधे चुनें, हैंगिंग प्लांटर्स का उपयोग करें और वर्टिकल गार्डनिंग का पता लगाएं। धूप पर विचार करें और एक जीवंत घर के लिए इनडोर पौधे लगाएं।

Web Title : Small balcony gardening tips: Maximize plants in limited space.

Web Summary : Maximize your small balcony garden with these tips! Choose compact plants, use hanging planters, and explore vertical gardening. Consider sunlight and add indoor plants for a lively home.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.