Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Gardening > लहानशा कुंडीत 'या' पद्धतीने लावा अस्सल गावरान सुगंधी आलं! घरच्या ताज्या आल्याच्या चहाचा स्वाद काही औरच..

लहानशा कुंडीत 'या' पद्धतीने लावा अस्सल गावरान सुगंधी आलं! घरच्या ताज्या आल्याच्या चहाचा स्वाद काही औरच..

Gardening Tips for Growing Adrak or Ginger: घरच्याघरी आलं लावणं खूप सोपं आहे. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं...(how to grow ginger in terrace garden?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2026 18:12 IST2026-01-30T14:39:10+5:302026-01-30T18:12:30+5:30

Gardening Tips for Growing Adrak or Ginger: घरच्याघरी आलं लावणं खूप सोपं आहे. बघा त्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं...(how to grow ginger in terrace garden?)

how to grow ginger in terrace garden, how to grow adrak at home, gardening tips for growing adrak or ginger | लहानशा कुंडीत 'या' पद्धतीने लावा अस्सल गावरान सुगंधी आलं! घरच्या ताज्या आल्याच्या चहाचा स्वाद काही औरच..

लहानशा कुंडीत 'या' पद्धतीने लावा अस्सल गावरान सुगंधी आलं! घरच्या ताज्या आल्याच्या चहाचा स्वाद काही औरच..

आलं हा असा एक पदार्थ आहे जो आपल्या वेगवेगळ्या पदार्थांना त्याचा सुगंध देऊन आणखी खमंग करून टाकतो. त्यामुळे वेगवेगळ्या चटण्या, मसालेदार भाज्या, आमटी, काही प्रकारची लोणची यांच्यामध्ये हमखास आलं घातलंच जातं. आल्याचा गरमागरम सुगंधित चहा तर झटकन मन आणि शरीर दोन्हीही रिफ्रेश करून टाकतो. एवढंच नाही तर आलं खूप औषधीही आहे. त्यामुळे सर्दी, कफ, घसादुखी, खोकला, अपचन अशा आजारांवर आल्याचा काढा हा एक उत्तम उपाय आहे. या सर्व कारणांमुळे आपल्या स्वयंपाक घरात नेहमीच आलं असतं. ते आलं आता तुमच्या बाल्कनीतल्या छोट्याशा कुंडीमध्ये लावून टाका (Gardening Tips for Growing Adrak or Ginger). बघा काही दिवसांतच त्याची इतकी छान वाढ होईल की तुम्हाला विकतचं आलं घेण्याची गरजही पडणार नाही.(how to grow ginger in terrace garden?)

 

घरच्या कुंडीमध्ये आलं कसं लावायचं?

हल्ली बाजारात हायब्रिड प्रकारातलं आलं विकायला येतं. ते दिसायला आकर्षक असलं तरी त्याला सुगंध मात्र मुळीच नसतो. म्हणूनच असं आलं खाण्यापेक्षा घरच्याघरी कुंडीमध्ये आलं लावणं आणि तेच खाणं जास्त चांगलं.

फक्त 'हे' पदार्थ खाणं बंद करा, २ आठवड्यात वजन घटून दिसू लागाल स्लिम-काही दिवसात व्हाल चवळीची शेंग

आलं लावण्यासाठी मध्यम आकाराची कुंडी घ्या. कुंडीचा घेर साधारण १२ ते १८ इंच एवढा असायला हवा. या कुंडीला खालच्या बाजुने ५ते ६ छिद्रं पाडून घ्या. जेणेकरून पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल.

 

यानंतर आल्यासाठी माती व्यवस्थित तयार करणंही खूप गरजेचं आहे. आल्याला पाणी घट्ट धरून ठेवणारी माती नको असते. त्यामुळे माती तयार करताना ५० टक्के माती २० टक्के रेती, २० टक्के कोकोपीट आणि १० टक्के खत असं मिश्रण तयार करून कुंडीमध्ये भरा. 

इडलीसोबत करा अस्सल साऊथ इंडियन स्टाईल नीर चटणी, चव अशी भारी की सांबारचीही गरज नाही

कोंब फुटलेले आल्याचे तुकडे घ्या आणि ते मातीमध्ये २ ते ३ इंच खोल खाेचून द्या. त्यावरून हलकी माती पसरून द्या. यानंतर ही कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे तिला ४ ते ५ तास ऊन मिळेल. वेळोवेळी माती ओलसर राहील याची काळजी घ्या. २ ते ३ महिन्यांत आलं तयार होतं. 

 

Web Title : घर पर सुगंधित अदरक उगाएं; बाजार से खरीदने की जरूरत नहीं।

Web Summary : घर पर गमलों में अदरक उगाकर खाना पकाने और उपचार के लिए ताजा, स्वादिष्ट अदरक पाएं। अच्छी जल निकासी वाली मिट्टी का मिश्रण प्रयोग करें, अंकुरित टुकड़े लगाएं और धूप प्रदान करें। कुछ महीनों में आपके पास घर का बना अदरक होगा।

Web Title : Grow fragrant ginger at home; no need to buy from market.

Web Summary : Grow ginger in pots at home for fresh, flavorful use in cooking and remedies. Use well-draining soil mix, plant sprouted pieces, and provide sunlight. You'll have homegrown ginger in months.